Join us

डाळभात की गरमागरम चपाती आणि डाळ, चांगल्या आरोग्यासाठी काय जास्त फायदेशीर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 19:48 IST

Dal Rice Vs Dal Roti : डाळ-भात खाणं आरोग्यासाठी चांगलं असतं की, डाळ चपाती खाणं जास्त फायदेशीर असतं? हेच जाणून घेऊ...

Dal Rice Vs Dal Roti : जेवण करायचं म्हटलं तर रोज सगळ्यांच्या घरात दाळ, भात, चपाती, भाजी बनवली जाते. जवळपास प्रत्येक घरांमध्ये रोज हेच जेवण असतं. फक्त डाळ-भात आणि त्यावरून थोडं तूप टाकलं तर जेवणाची मजाच वेगळी येते. काही लोक डाळ आणि चपाती खाणं पसंत करतात. पण जेव्हा आरोग्याचा विषय येतो तेव्हा या दोन्हीपैकी कोणतं कॉम्बिनेशन चांगलं ठरतं याबाबत लोक कन्फ्यूज असतात किंवा त्यांना याबाबत काही माहीत नसतं. डाळ-भात खाणं आरोग्यासाठी चांगलं असतं की, डाळ चपाती खाणं जास्त फायदेशीर असतं? हेच जाणून घेऊ...

डाळ-भात

वेगवेगळे सिनेमे किंवा व्हायरल व्हिडिओमध्ये बघायला मिळतं की, दक्षिण भारतातील लोक डाळ-भात खूप खातात. पण असं काही नाहीये. देशाच्या इतर भागातही डाळ-भात लोक आवडीनं खातात. डाळीमधून भरपूर प्रोटीन मिळतं आणि भातातून कार्ब्स मिळतात. त्यामुळे डाळ भाताला एक संपूर्ण आहार मानलं जातं. 

डाळ-भात खाण्याचे फायदे

भात पचन होण्यास खूप सोपा असतो. ज्यामुळे पचनक्रियेवर जास्त दबाव पडत नाही. भातातील कार्बोहायड्रेट शरीराला एनर्जी देतात. डाळीसोबत भात खाणं एक ग्लूटन फ्री पर्याय असतो. जे लोक वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असतात त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. डाळीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं. जेव्हा डाळ आणि भात एकत्र केला जातो तेव्हा अमीनो अॅसिड तयार होतं. जे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं.

डाळ आणि चपाती

डाळीसोबत चपाती खाणंही अनेकांना आवडतं. गरमागरम चपाती आणि तडका मारलेली डाळ खाण्यात एक वेगळीच मजा येते. सोबतच शरीराला भरपूर पोषणही मिळतं. 

डाळ आणि चपाती खाण्याचे फायदे

चपातीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं. त्यामुळे चपाती खाल्ल्यानंही पचन तंत्र मजबूत होतं. पोटासंबंधी अनेक समस्या दूर होण्यास चपातीनं मदत मिळते. चपातीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. त्यामुळे डायबिटीसच्या रूग्णांसाठी चपाती एक चांगला पर्याय आहे. भातापेक्षा चपाती पचायला थोडा जास्त वेळ लागतो. त्यामुळे चपाती खाल्ल्यावर पोट जास्त वेळ भरलेलं राहतं. 

काय जास्त फायदेशीर?

जर तुम्हाला शुगरची समस्या असेल तर तुमच्यासाठी डाळ आणि चपाती चांगला पर्याय ठरू शकतो. जर तुम्हाला वाटत असेल की, तुम्हाला एनर्जीची गरज आहे आणि पचन लवकर व्हावं आणि ग्लूटन शरीरात जाऊ नये तर डाळ भात निवडू शकता. तसेच वजन कमी करण्यासाठी देखील डाळ भात अधिक फायदेशीर ठरतो.

टॅग्स :अन्नहेल्थ टिप्स