Lokmat Sakhi >Food > साऊथस्टाइल परफेक्ट डाळ वडा करण्याची सोपी - झटपट रेसिपी, खा पौष्टिक आणि पोटभर चविष्ट

साऊथस्टाइल परफेक्ट डाळ वडा करण्याची सोपी - झटपट रेसिपी, खा पौष्टिक आणि पोटभर चविष्ट

Dal Vada Recipe - How To Make Dal Vada At Home : यंदाच्या भाऊबीजेनिमित्त घरीच नाश्त्याला करा खास डाळ वडा, भाऊ होतील खुश-पौष्टीक रेसिपी आरोग्यासाठी उत्तम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2023 11:10 AM2023-11-13T11:10:25+5:302023-11-13T11:14:48+5:30

Dal Vada Recipe - How To Make Dal Vada At Home : यंदाच्या भाऊबीजेनिमित्त घरीच नाश्त्याला करा खास डाळ वडा, भाऊ होतील खुश-पौष्टीक रेसिपी आरोग्यासाठी उत्तम

Dal Vada Recipe - How To Make Dal Vada At Home | साऊथस्टाइल परफेक्ट डाळ वडा करण्याची सोपी - झटपट रेसिपी, खा पौष्टिक आणि पोटभर चविष्ट

साऊथस्टाइल परफेक्ट डाळ वडा करण्याची सोपी - झटपट रेसिपी, खा पौष्टिक आणि पोटभर चविष्ट

दाक्षिणात्य पदार्थ (South-Indian Recipe) संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. नाश्त्याला लोकं आवर्जून इडली, डोसा, मेदू वडा आणि डाळ वडा (Daal Vada) खातात. हे पदार्थ पौष्टीक घटकांनी परिपूर्ण असतात. जर आपल्याला नाश्त्याला तेच-तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर, डाळ वडा ही रेसिपी करून पाहा. डाळ वडा फक्त चवीला नसून, आरोग्यासाठी पौष्टीक मानले जाते.

चणा डाळमध्ये फायबर आणि प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. जे शरीराला निरोगी ठेवण्यासोबत उर्जाही देते. त्यामुळे डाळ वडा खाण्याचे अनेक फायदे आहेत. बऱ्याच जणांना दाक्षिणात्य पद्धतीचा डाळ वडा तयार करायला जमत नाही. जर आपल्यालाही घरच्या घरी दाक्षिणात्य पद्धतीचा डाळ वडा (Cooking Tips) तयार करायचा असेल तर, ही रेसिपी नक्की करून पाहा(Dal Vada Recipe - How To Make Dal Vada At Home).

डाळ वडा करण्यासाठी लागणारं साहित्य

चणा डाळ

लाल सुक्या मिरच्या

अण्णाच्या ठेल्यावर मिळते तशी जाड तांदुळाची इडली करा घरीच, पाहा मऊ-लुसलुशीत इडलीची सोपी रेसिपी

हिरवी मिरची

जिरं

बडीशेप

कडीपत्ता

कांदा

आलं-लसूण पेस्ट

मीठ

तेल

कृती

सर्वप्रथम, एक कप चणा डाळ ५ ते ६ तासांसाठी पाण्यात भिजत ठेवा. नंतर मिक्सरच्या भांड्यात भिजलेली चणा डाळ, २ लाल सुक्या मिरच्या, २ हिरव्या मिरच्या, एक चमचा जिरं, एक चमचा बडीशेप घालून बारीक वाटून घ्या. पेस्ट गुळगुळीत करू नये, भरड तयार करावी, जेणेकरून खाताना डाळ वडा क्रिस्पी लागेल. वाटलेली चणा डाळीच्या पेस्टमध्ये एक कप भिजलेली चणा डाळ, बारीक चिरलेला कडीपत्ता, बारीक चिरलेला कांदा, एक चमचा आलं-लसूण पेस्ट आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. नंतर हाताला थोडे तेल लावा, व हातावर थोडे तयार मिश्रण घेऊन टिक्की तयार करा.

कुकरमध्ये इडली किंवा खिचडी होते, दही कधी लावून पाहिलं आहे का? १ सोपी ट्रिक- दही करण्याची नवी युक्ती

दुसरीकडे तेल गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात तयार टिक्की सोडून दोन्ही बाजूने मध्यम आचेवर तळून घ्या. वड्यांना सोनेरी रंग आल्यानंतर वडे टिश्यू पेपरवर काढून घ्या. अशा प्रकारे दाक्षिणात्य पद्धतीचा डाळ वडा खाण्यासाठी रेडी. आपण हा डाळ वडा चटणी, सांबारसोबत खाऊ शकता.

Web Title: Dal Vada Recipe - How To Make Dal Vada At Home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.