Lokmat Sakhi >Food > नाश्त्याला करा खमंग डाळ वडे, प्रोटीन भरपूर - खा पोटभर, बघा परफेक्ट रेसिपी...

नाश्त्याला करा खमंग डाळ वडे, प्रोटीन भरपूर - खा पोटभर, बघा परफेक्ट रेसिपी...

Daal Vada Recipe : नाश्त्याला रोज पोहे, उपमा, इडली, खाऊन कंटाळा आला असेल तर डाळ वडे हा थोडासा वेगळ्या प्रकारचा नाश्ता आपण बनवू शकतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2023 11:12 AM2023-01-16T11:12:02+5:302023-01-16T11:13:41+5:30

Daal Vada Recipe : नाश्त्याला रोज पोहे, उपमा, इडली, खाऊन कंटाळा आला असेल तर डाळ वडे हा थोडासा वेगळ्या प्रकारचा नाश्ता आपण बनवू शकतो

dal vade for breakfast, rich in protein - eat your fill, see the perfect recipe... | नाश्त्याला करा खमंग डाळ वडे, प्रोटीन भरपूर - खा पोटभर, बघा परफेक्ट रेसिपी...

नाश्त्याला करा खमंग डाळ वडे, प्रोटीन भरपूर - खा पोटभर, बघा परफेक्ट रेसिपी...

थंडी म्हटलं की आपल्याला गरमागरम चहासोबत काहीतरी चटपटीत, तिखट, झणझणीत खायची इच्छा होतेच. थंडीत गरमागरम चहाचा एकमेव पार्टनर म्हणजे चटपटीत, कुरकुरीत, खमंग वडे. वड्यांचा विषय आला की घरातल्या लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटत. गरम वाफाळत्या चहासोबत बटाटा वडा किंवा डाळ वडा खाणे आपल्यापैकी अनेकजण पसंत करतात. खरंतर डाळ वडा हा पदार्थ कर्नाटकमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. डाळ वडा हा कर्नाटकमध्ये फारच प्रसिद्ध असला तरीही हा पदार्थ महाराष्ट्राच्या इतर भागात वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो. आपल्याला जर नाश्त्याला रोज पोहे, उपमा, इडली, खाऊन कंटाळा आला असेल तर डाळ वडे हा थोडासा वेगळ्या प्रकारचा नाश्ता आपण बनवू शकतो. डाळ वडा ही रेसिपी खूप कमी वेळात आणि घरात उपलब्ध होणाऱ्या साहित्यात झटकन बनेल अशी आहे. घरच्या घरी झटपट डाळ वडे कसे बनवायचे याचे साहित्य व कृती समजून घेऊयात(Daal Vada Recipe).

me_haay_foodie या इंस्टाग्राम पेजवरून डाळ वडे कसे बनवायचे याचे साहित्य व कृती नेमकी काय आहे. याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.   


साहित्य :- 
१. चणा डाळ - १ कप (२ ते ४ तास पाण्यात भिजवलेली)
२. आलं - २ इंचाचा छोटा तुकडा (बारीक किसून घेतलेला) 
३. हिरवी मिरची - २ (बारीक चिरलेल्या)
४. तांदुळाचे पीठ - २ टेबलस्पून 
५. हिंग - १/४ टेबलस्पून 
६. हळद - १/४ टेबलस्पून 
७. जिरं - १ टेबलस्पून 
८. कांदा - १ (बारीक चिरलेला)
९. कोथिंबीर - ४ टेबलस्पून 
१०. तेल - तळण्यासाठी
११. मीठ - चवीनुसार 
१२. कडीपत्ता - ७ ते ८ पान   

कृती :- 
१. २ ते ४ तास पाण्यात भिजवलेल्या चणा डाळींमधील १ टेबलस्पून चणा डाळ एका बाऊलमध्ये वेगळी काढून घ्या. 
२. उरलेली चणा डाळ मिक्सर मध्ये जाडसर वाटून घ्या. 
३. या जाडसर वाटून घेतलेल्या चणा डाळीच्या मिश्रणात, बारीक चिरलेला कांदा,कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं, कडीपत्ता, हळद, हिंग, जिरे, मीठ, तांदुळाचे पीठ, आणि १ टेबलस्पून भिजवून घेतलेली चणा डाळ घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे. 
४. एका केळीच्या पानाला किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीला तेल लावून त्यावर हे मिश्रण घेऊन गोल चपट आकाराचे वडे थापून घ्या. 
५. मग हे वडे तेलात सोडून गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्या.
६. हे गरमागरम डाळवडे तुम्ही मिरचीच्या हिरव्या चटणी सोबत किंवा लाल तिखट लसूण चटणी सोबत सर्व्ह करू शकता.  

गरमागरम डाळवडे खाण्यासाठी तयार आहेत.

Web Title: dal vade for breakfast, rich in protein - eat your fill, see the perfect recipe...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :foodअन्न