Lokmat Sakhi >Food > भरपूर भाज्या घालून केलेली चवदार पौष्टिक दलिया खिचडी, थंडीत करावाच असा गरमागरम बेत 

भरपूर भाज्या घालून केलेली चवदार पौष्टिक दलिया खिचडी, थंडीत करावाच असा गरमागरम बेत 

Daliya Khichadi Recipe: थंडीमध्ये रात्रीच्या जेवणात हा गरमागरम बेत एकदा करून बघाच.. दही, पापड, तूप आणि लोणचं अशा पदार्थांसोबत दलिया खिचडी खाणं म्हणजे निव्वळ सुख...बघा सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर (Kunal Kapoor) यांनी शेअर केलेली ही स्पेशल रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2022 01:10 PM2022-12-29T13:10:08+5:302022-12-29T13:11:18+5:30

Daliya Khichadi Recipe: थंडीमध्ये रात्रीच्या जेवणात हा गरमागरम बेत एकदा करून बघाच.. दही, पापड, तूप आणि लोणचं अशा पदार्थांसोबत दलिया खिचडी खाणं म्हणजे निव्वळ सुख...बघा सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर (Kunal Kapoor) यांनी शेअर केलेली ही स्पेशल रेसिपी

Daliya khichadi recipe by celebrity chef Kunal Kapoor, How to make daliya khichadi? | भरपूर भाज्या घालून केलेली चवदार पौष्टिक दलिया खिचडी, थंडीत करावाच असा गरमागरम बेत 

भरपूर भाज्या घालून केलेली चवदार पौष्टिक दलिया खिचडी, थंडीत करावाच असा गरमागरम बेत 

Highlightsभरपूर भाज्या घालून केलेली ही खिचडी चवीला तर उत्तम लागतेच, पण तब्येतीसाठीही अतिशय पौष्टिक असते.

बऱ्याचदा मुलं भाज्या खायला कंटाळा करतात. किंवा आपल्यालाही रोज रात्री तेच ते भाजी- पोळीचं जेवण नकोसं होतं. अशा वेळी गरमागरम खिचडी हा बेत मग सगळ्यांच्याच पसंतीला उतरतो. पण दरवेळी डाळ- तांदुळाची खिचडी करण्यापेक्षा आता कधीतरी ही दलिया खिचडी (Daliya Khichadi Recipe) करून बघा. भरपूर भाज्या घालून केलेली ही खिचडी चवीला तर उत्तम लागतेच, पण तब्येतीसाठीही अतिशय पौष्टिक असते. म्हणूनच बघा सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर (celebrity chef Kunal Kapoor) यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेली ही दलिया खिचडीची स्पेशल रेसिपी.

कशी करायची दलिया खिचडी?
साहित्य

तूप ३ टेबलस्पून
दलिया पाऊण कप
मुगाची डाळ पाव कप
१ टीस्पून हळद
साडेतीन कप पाणी
चवीनुसार मीठ


चिमुटभर हिंग
१ टीस्पून जीरे
किसलेलं आलं १ टीस्पून
१ हिरवी मिरची
अर्धा कप चिरलेला कांदा
पाव कप चिरलेलं गाजर
पाव कप बीन्सच्या शेंगा
पाव कप फ्लॉवर
अर्धा कप टोमॅटो
पाव कप उकडलेले मटार
१ टीस्पून कसुरी मेथील पावडर
थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर

 

रेसिपी
१. सगळ्यात आधी कुकर गॅसवर तापायला ठेवा. कुकर तापलं की त्यात तूप, जीरे, हिंग, हळद टाकून फोडणी करून घ्या.

मधुमेह, बीपी, कॅन्सर हे आजार कमी वयातच होऊ नयेत म्हणून.... बघा तज्ज्ञ काय सांगतात

२. यानंतर दलिया, मुगाची डाळ टाकून परतून घ्या. परतून झाले की पाणी टाकून दलिया आणि डाळ शिजवून घ्या.

३. आता गॅसवर एक कढई तापायला ठेव. कढई तापली की त्यात तूप, जीरे, हिंग, हळद टाकून पुन्हा एकदा फोडणी करून घ्या.

 

४. यानंतर आपण चिरलेल्या भाज्या एकेक करून परतून घ्या. सगळ्यात आधी कांदा आणि सगळ्यात शेवटी टोमॅटो टाका. आवडीनुसार भाज्यांमध्ये बदल किंवा कमी- जास्त करू शकता.

खाली डोकं- वर पाय, वयाच्या पन्नाशीतही भाग्यश्री करतेय बघा कसा जबरदस्त व्यायाम- वाचा त्याचे ५ फायदे

५. भाज्या परतून झाल्या की शिजवलेला दलिया आणि डाळ टाका, पुन्हा एखादं कप पाणी आणि चवीनुसार मीठ, तिखट घाला.

६. कढईवर झाकण ठेवून एक वाफ आली की झाली गरमागरम खिचडी तयार. वरतून कोथिंबीरीची पेरणी करा आणि दही, पापड, लोणचं यासोबत खिचडीचा आस्वाद घ्या. 

 

Web Title: Daliya khichadi recipe by celebrity chef Kunal Kapoor, How to make daliya khichadi?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.