Join us  

भरपूर भाज्या घालून केलेली चवदार पौष्टिक दलिया खिचडी, थंडीत करावाच असा गरमागरम बेत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2022 1:10 PM

Daliya Khichadi Recipe: थंडीमध्ये रात्रीच्या जेवणात हा गरमागरम बेत एकदा करून बघाच.. दही, पापड, तूप आणि लोणचं अशा पदार्थांसोबत दलिया खिचडी खाणं म्हणजे निव्वळ सुख...बघा सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर (Kunal Kapoor) यांनी शेअर केलेली ही स्पेशल रेसिपी

ठळक मुद्देभरपूर भाज्या घालून केलेली ही खिचडी चवीला तर उत्तम लागतेच, पण तब्येतीसाठीही अतिशय पौष्टिक असते.

बऱ्याचदा मुलं भाज्या खायला कंटाळा करतात. किंवा आपल्यालाही रोज रात्री तेच ते भाजी- पोळीचं जेवण नकोसं होतं. अशा वेळी गरमागरम खिचडी हा बेत मग सगळ्यांच्याच पसंतीला उतरतो. पण दरवेळी डाळ- तांदुळाची खिचडी करण्यापेक्षा आता कधीतरी ही दलिया खिचडी (Daliya Khichadi Recipe) करून बघा. भरपूर भाज्या घालून केलेली ही खिचडी चवीला तर उत्तम लागतेच, पण तब्येतीसाठीही अतिशय पौष्टिक असते. म्हणूनच बघा सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर (celebrity chef Kunal Kapoor) यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेली ही दलिया खिचडीची स्पेशल रेसिपी.

कशी करायची दलिया खिचडी?साहित्यतूप ३ टेबलस्पूनदलिया पाऊण कपमुगाची डाळ पाव कप१ टीस्पून हळदसाडेतीन कप पाणीचवीनुसार मीठ

चिमुटभर हिंग१ टीस्पून जीरेकिसलेलं आलं १ टीस्पून१ हिरवी मिरचीअर्धा कप चिरलेला कांदापाव कप चिरलेलं गाजरपाव कप बीन्सच्या शेंगापाव कप फ्लॉवरअर्धा कप टोमॅटोपाव कप उकडलेले मटार१ टीस्पून कसुरी मेथील पावडरथोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर

 

रेसिपी१. सगळ्यात आधी कुकर गॅसवर तापायला ठेवा. कुकर तापलं की त्यात तूप, जीरे, हिंग, हळद टाकून फोडणी करून घ्या.

मधुमेह, बीपी, कॅन्सर हे आजार कमी वयातच होऊ नयेत म्हणून.... बघा तज्ज्ञ काय सांगतात

२. यानंतर दलिया, मुगाची डाळ टाकून परतून घ्या. परतून झाले की पाणी टाकून दलिया आणि डाळ शिजवून घ्या.

३. आता गॅसवर एक कढई तापायला ठेव. कढई तापली की त्यात तूप, जीरे, हिंग, हळद टाकून पुन्हा एकदा फोडणी करून घ्या.

 

४. यानंतर आपण चिरलेल्या भाज्या एकेक करून परतून घ्या. सगळ्यात आधी कांदा आणि सगळ्यात शेवटी टोमॅटो टाका. आवडीनुसार भाज्यांमध्ये बदल किंवा कमी- जास्त करू शकता.

खाली डोकं- वर पाय, वयाच्या पन्नाशीतही भाग्यश्री करतेय बघा कसा जबरदस्त व्यायाम- वाचा त्याचे ५ फायदे

५. भाज्या परतून झाल्या की शिजवलेला दलिया आणि डाळ टाका, पुन्हा एखादं कप पाणी आणि चवीनुसार मीठ, तिखट घाला.

६. कढईवर झाकण ठेवून एक वाफ आली की झाली गरमागरम खिचडी तयार. वरतून कोथिंबीरीची पेरणी करा आणि दही, पापड, लोणचं यासोबत खिचडीचा आस्वाद घ्या. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.कुणाल कपूर