Join us  

मुठभर शेंगदाण्याची आमटी वाढवेल उपवास फराळाची चव, ' अशी ' करा झणझणीत आमटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2023 10:49 AM

Danyachi Amti, Maharashtra's Nutritious Fasting Food : वरीच्या तांदुळाच्या पदार्थांसोबत खा झणझणीत शेंगदाण्याची आमटी, चव अशी की, दिवसभर जिभेवर रेंगाळत राहील

नवरात्रीच्या (Navratri) ९ दिवसात बरेच जण उपवास धरतात. देवीची उपासना करतात. नऊ दिवसात बरेच जण विविध पदार्थ खातात. काहीजण फक्त फळं खातात. तर काही जण उपवासाचे पदार्थ खातात. या दिवसात अनेक जण साबुदाण्याचे पदार्थ करतात. यासह वरीच्या तांदुळाचे देखील पदार्थ केले जातात.

वरीच्या तांदुळाचा भात, डोसा, खिचडी, इडली आपण खाल्लीच असेल. पण या पदार्थांसोबत उपवासाची शेंगदाण्याची आमटी चविष्ट लागते. मुख्य म्हणजे या चटणीमुळे वरीच्या तांदळाचा वापर करून तयार केलेल्या पदार्थांची चव दुपट्टीने वाढते. जर आपण नवरात्रीत वरीच्या तांदळाचे विविध पदार्थ तयार करणार असाल तर, त्यासोबत चमचमीत शेंगदाण्याची आमटी ही नक्कीच करून खा. ही आमटी आपल्याला नक्कीच आवडेल(Danyachi Amti, Maharashtra's Nutritious Fasting Food).

उपवासाची शेंगदाण्याची आमटीसाठी लागणारं साहित्य

शेंगदाणे

हिरवी मिरची

जिरं

पाणी

बटाटा

आजचा रंग पिवळा : पाहा पिवळ्या रंगाचे ६ पौष्टीक-चविष्ट पदार्थ, आहारात यांचा समावेश कराच, कारण..

तेल

मीठ

कृती

उपवासाची शेंगदाण्याची आमटी करण्यासाठी सर्वपथम, मिक्सरच्या भांड्यात मुठभर भाजलेले शेंगदाणे, ३ ते ४ हिरव्या मिरच्या, एक चमचा जिरं व अर्धा कप पाणी घालून पेस्ट तयार करा.

२ टॉमेटो-कपभर शेंगदाण्याची करा चमचमीत चटणी, डोसा-पराठ्यासोबत लागेल चविष्ट - खा पोटभर

दुसरीकडे कढई गरम करण्यासाठी ठेवा. त्यात २ चमचे तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात अर्धा चमचा जिरं व १ कच्च्या बटाट्याचा किस घालून परतवून घ्या. बटाट्याचा किस साधारण २ मिनिटापर्यंत परतवून घ्या. बटाट्याचा किस परतवून झाल्यानंतर त्यात शेंगदाण्याची पेस्ट घाला, नंतर एक कप पाणी घालून मिक्स करा.

नंतर त्यात चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करा. आमटीला उकळी आल्यानंतर गॅस बंद करा. अशा प्रकारे उपवासाची चमचमीत शेंगदाण्याची आमटी खाण्यासाठी रेडी. आपण ही आमटी वरीच्या तांदुळाचा भात, डोसा, किंवा उपवासाच्या इडलीसोबत खाऊ शकता.  

टॅग्स :शारदीय नवरात्रोत्सव 2023नवरात्री उपवास आणि पदार्थ २०२३कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.अन्न