आषाढ अमावस्या दीप (Deep Amavasya 2022) अमावस्या म्हणूनही ओळखला जाते. या दिवशी घरातले सगळे दिवे घासून लख्ख केले जातात. आणि सुंदर आरास मांडून त्यांची मनोभावे पूजा करतात. (Kankiche Dive Recipe) या दिवसाचं आकर्षण म्हणजे कणकेचे दिवे... पूजेसाठी आणि प्रसादासाठी दीप अमावस्येला कणकेच्या दिव्याचे खूप महत्व असते. या लेखात कणकेचे दिवे बनवण्याची योग्य, सोपी पद्धत सांगणार आहोत. (How to make kankeche dive)
साहित्य
1 वाटी कणीक, दीड वाटी पाणी, अर्धी वाटी गूळ, 1 टीस्पून वेलची पूड, अर्धा टीस्पून जायफळ पूड, अर्धा टीस्पून मीठ, अर्धा टीस्पून तूप, 1 टेबलस्पून रवा
कृती
१) सगळ्यात आधी पाणी आणि गूळ घालून एक उकळी काढून घ्या आणि हे पाणी थंड होऊ द्या
२) एका परातीमध्ये गव्हाचं पीठ, रवा, मीठ, जायफळ पावडर आणि १ टेबलस्पून गरम तूप घालून एकजीव करा. त्यानंतर त्यात थंड झालेलं गुळाचं पाणी घाला. १० मिनिटे गोळा झाकून ठेवावा.
३) इडलीच्या भांड्यात किंवा मोठ्या टोपात पाणी गरम करायला ठेवा आणि इडलीच्या साच्यांना तुपाचा हात लावा आणि दिवे हव्या त्या आकारात बनवून स्टॅण्डमध्ये ठेवून झाकण बंद करा. पंधरा ते वीस मिनिटांनी वाफवून घ्या आणि नंतर तूप, वात घालून दीपपूजा करून प्रसाद खायला घ्या