जेवणातील नेहमीचा पांढराशुभ्र भात हा कित्येकांच्या अतिशय आवडीचा असतो. भात नसेल तर काहीवेळा अनेकांना जेवल्यासारखेच वाटत नाही. नेहमीच्या भातासोबतच अनेकांना भाताचे वेगवेगळे प्रकार (Deepika Padukone's Favorite Rasam Rice Recipe) खायला खूप आवडतात. काहीवेळा आपण घाई गडबडीच्या वेळी किंवा कधी जेवण करायचा कंटाळा आला की पटकन एकच भाताचा प्रकार करतो. यात आपण खिचडी, पुलाव किंवा मसाले भात, दालखिचडी असे अनेक प्रकार करतो. परंतु भाताचे असे नेहमीचे तेच ते प्रकार खाऊन देखील कंटाळा येतो, अशावेळी आपण झटपट तयार होणारा आणि चवीला मस्त चमचमीत, आंबट - गोड असा 'रस्सम राईस' (Rasam Rice Recipe) घरच्याघरीच तयार करु शकतो (Deepika Padukone's Favorite Meal Rasam Rice Recipe).
खरंतरं, 'रस्सम' हा दक्षिण भारतीय जेवणातील सांबरासारखाच एक पातळ रस्सेदार असा पदार्थ. रस्समला त्यात असणाऱ्या मसाल्यांमुळे एक वेगळीच चव येते. रस्सम गरम भातासोबत खाता येतो किंवा थंड प्यायलाही चांगला लागतो. अशाच या रस्सम फ्लेव्हरची झटपट होणारी 'रस्सम खिचडी' किंवा 'रस्सम राईस' कसा करायचा त्याची सोपी रेसिपी पाहूयात. सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण हिला देखील 'रस्सम राईस' फार आवडतो. दीपिका तिच्या डाएटमध्ये आवडीने 'रस्सम राईस' या खास दाक्षिणात्य भाताच्या प्रकारचा समावेश करते(Deepika Padukone Loves Rasam Rice, How To Make This Comfort Dish At Home).
साहित्य :-
१. तांदुळ - १ कप
२. तूर डाळ - १ कप
३. पिवळी मूग डाळ - १ कप
४. टोमॅटो - १ (मध्यम आकारात चिरलेला)
५. हिरव्या मिरच्या - ४ ते ५ (मध्यम आकारात चिरलेल्या)
६. काळीमिरी पूड - १/२ टेबलस्पून
७. जिरेपूड - १/२ टेबलस्पून
८. हळद - १/२ टेबलस्पून
९. मीठ - चवीनुसार
१०. पाणी - गरजेनुसार
११. चिंचेचा कोळ - १/२ कप
१२. रस्सम पावडर - १ टेबलस्पून
१३. तूप - १ टेबलस्पून
१४. लाल सुक्या मिरच्या - २ मिरच्या
१५. जिरे - १/२ टेबलस्पून
१६. मोहरी - १/२ टेबलस्पून
१८. हिंग - चिमुटभर
१९. कडीपत्ता - १० ते १२ पान
२०. कोथिंबीर - ३ टेबलस्पून (बारीक चिरलेली)
मसूर पुलाव खा, रविवार करा दणक्यात साजरा, पाहा झटपट मसूर पुलाव करण्याची रेसिपी...
१० मिनिटांत करा सोया चंक्सचा चमचमीत पराठा, सकाळचा नाश्ता - टिफिनसाठी प्रोटीनरीच हेल्दी पर्याय...
कृती :-
१. सगळ्यात आधी एका मोठ्या बाऊलमध्ये पाणी घेऊन त्यात तांदुळ, तूर डाळ, पिवळी मूग डाळ एकत्रित करून अर्धा तास भिजवून घ्यावी.
२. एका कुकरमध्ये भिजवलेली डाळ, तांदुळ घेऊन त्यात मध्यम आकारात चिरलेला टोमॅटो, हिरव्या मिरच्या, काळीमिरी पूड, जिरेपूड, हळद, चवीनुसार मीठ गरजेनुसार पाणी घालून ३ ते ४ शिट्ट्या काढून व्यवस्थित शिजवून घ्यावे.
कपभर ज्वारीच्या लाह्यांची करा पौष्टिक चिक्की, हिवाळ्यात खायला हवा असा हेल्दी खाऊ...
३. भात व्यवस्थित शिजवून झाल्यानंतर त्यात चिंचेचा कोळ व रस्सम पावडर घालून सगळे जिन्नस एकत्रित ढवळून एकजीव करून घ्यावे.
४. आता भाताला खमंग फोडणी देण्यासाठी एका छोट्या भांड्यात साजूक तूप घेऊन त्यात लाल सुक्या मिरच्या, जिरे, मोहरी, हिरव्या मिरच्या, चिमुटभर हिंग व कडीपत्ता घालावा. अशी तयार फोडणी गरम भातावर ओतून घ्यावी.
५. सगळ्यात शेवटी भात आणि फोडणी एकत्रित चमच्याने ढवळून सगळे जिन्नस एकजीव करून घ्यावे. त्यानंतर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरवून घालावी.
गरमागरम रस्सम राईस खाण्यासाठी तयार आहे. हा रस्सम राईस लोणचं, पापड यांसोबत खाण्यासाठी सर्व्ह करावा.