Join us  

दिल्लीचं 'मोहब्बत का शरबत' म्हणजे उन्हाळ्यात थंडगार झुळूकच! प्रेमाच्या माणसांसाठी तुम्हीही करा कुल रेसिपी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2024 1:55 PM

Super Cool Recipe Of Delhi's Famous Mohabbat Ka Sharbat: उन्हाळ्यात अगदी आवर्जून करायलाच पाहिजे असं हे खास सरबत... त्याची चव एकदा नक्की चाखून बघाच.

ठळक मुद्देया गारेगार पदार्थाचा आस्वाद घ्यायला विसरू नका.. बघा मुहाब्बत का शरबत करण्याची एकदम सोपी रेसिपी.

उन्हाळ्यात ऊन, गरमी, घाम यांचा खूप त्रास होतो हे मान्य.. पण एरवी वर्षभर कधीही मिळत नाही त्या थंड पदार्थांचा गारेगार आनंदही फक्त उन्हाळ्यातच घेता येतो. त्यामुळेच तर उन्हाळ्याची मजाही काही वेगळीच असते. वेगवेगळी सरबतं, आईस्क्रिम, कुल्फी, मिल्कशेक यांची उन्हाळ्यात चंगळ असते. या दिवसांत अगदी लहान मुलांनाही हे सगळे थंड पदार्थ खाऊ घालायला काही वाटत नाही. म्हणूनच तर दिल्लीचं प्रसिद्ध मुहाब्बत का शरबत हे पेय देखील यंदाच्या उन्हाळ्यात करून बघाच (how to make Delhi's famous mohabbat ka sharbat).. उन्हाळ्याचे आता मोजकेच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे या गारेगार पदार्थाचा आस्वाद घ्यायला विसरू नका.. बघा मोहब्बत का शरबत करण्याची एकदम सोपी रेसिपी. (mohabbat ka sharbat recipe for summer)

 

दिल्लीचं प्रसिद्ध मोहब्बत का शरबत करण्याची रेसिपी

साहित्य

४ कप दूध

८ ते १० बर्फाचे तुकडे

३ टेबलस्पून रुह अफ्जा

उन्हाळ्यात कॉन्स्टिपेशनचा त्रास वाढला? आलिया भटची फिटनेस ट्रेनर सांगतेय खास उपाय- पोट होईल साफ

पाव कप साखर, आवडीनुसार साखरेचे प्रमाण कमी- जास्त करू शकता.

२ टेबलस्पून सब्जा

२ कप बारीक चिरलेलं टरबूज

 

कृती

सगळ्यात आधी सब्जा पाण्यात भिजायला टाका. 

यानंतर एका मोठ्या भांड्यात थंडगार दूध घ्या. हे दूध क्रिमयुक्त असावं. साय काढलेलं दूध शक्यतो घेऊ नये. तसेच दूध थोडं आटवून घेतलं तर अधिक चांगलं.

कडक उन्हातून घरी आल्यावर लगेचच ३ गोष्टी चुकूनही करू नका, तब्येतीवर होईल वाईट परिणाम

यानंतर दुधामध्ये साखर, रुहअफ्जा, भिजवलेला सब्जा आणि बर्फाचे तुकडे टाका. सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या..

यानंतर टरबूजाच्या अतिशय बारीक फोडी करा. किंवा खूप बारीक फोडी सुरीने करणं तुम्हाला शक्य नसेल तर मिक्सरमधून फिरवून घ्या. जेवढं दूध असेल त्याच्या निम्म्या प्रमाणात टरबुजाच्या फोडी किंवा रस घ्यावा. 

टरबुजाचा रस किंवा मग बारीक केलेल्या फोडी दोन्हीपैकी जे वापरणार असाल ते किंवा दोन्हीही आधी तयार करून ठेवलेल्या दुधामध्ये टाका. सगळं मिश्रण एकदा व्यवस्थित हलवून घ्या आणि मग ग्लासमध्ये सर्व्ह करा.. वरतून थोडे टरबुजाचे तुकडे टाका... गारेगार मोहब्बत का शरबत झालं तयार..

 

टॅग्स :अन्नसमर स्पेशलपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.दिल्ली