Lokmat Sakhi >Food > खमंग आणि खुसखुशीत मिरची पकोडा! अहाहा.. स्पेशल चटपटीत पकोड्याची कडक रेसिपी..

खमंग आणि खुसखुशीत मिरची पकोडा! अहाहा.. स्पेशल चटपटीत पकोड्याची कडक रेसिपी..

पाऊस पडू लागला की काहीतरी चटकदार, चमचमीत आणि चटपटीत खावं वाटतं ना? मग अशा वेळी हा खमंग, खुसखुशीत मिरची पकोडा करून बघाच.. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 06:43 PM2021-08-18T18:43:59+5:302021-08-18T18:44:50+5:30

पाऊस पडू लागला की काहीतरी चटकदार, चमचमीत आणि चटपटीत खावं वाटतं ना? मग अशा वेळी हा खमंग, खुसखुशीत मिरची पकोडा करून बघाच.. 

Delicious and crispy chili pakoda! Ahaha .. Special spicy mirchi pakoda recipe .. | खमंग आणि खुसखुशीत मिरची पकोडा! अहाहा.. स्पेशल चटपटीत पकोड्याची कडक रेसिपी..

खमंग आणि खुसखुशीत मिरची पकोडा! अहाहा.. स्पेशल चटपटीत पकोड्याची कडक रेसिपी..

Highlightsही स्पेशल रेसिपी वापरून जर तुम्ही मिरची पकोडा बनवला, तर खाणाऱ्यांची हमखास दाद मिळणार.

खमंग भज्यांमध्ये असणारा मिरचीचा झणका म्हणजे खवय्यांसाठी पर्वणी. असा बेत पावसाळ्यात तर सगळ्यांचाच ऑलटाईम फेव्हरेट असतो. अनेकदा आपण भजी करतो पण त्यात काही कमीजास्त राहून जातं आणि मग भजी आपल्याला हवी तशी स्वादिष्ट, क्रिस्पी बनत नाहीत. म्हणूनच तर मिरची पकोड्याची ही एक झणझणीत कडक रेसिपी ट्राय करून पहा. ही स्पेशल रेसिपी वापरून जर तुम्ही मिरची पकोडा बनवला, तर खाणाऱ्यांची हमखास दाद मिळणार.

 

मिरची पकोड्यासाठी लागणारे साहित्य
कमी तिखटाच्या असणाऱ्या ८- १० लांब मिरच्या. ३ ते ४ टेबलस्पून डाळीचे पीठ म्हणजेच बेसन. १ टेबलस्पून तांदळाचे पीठ, हळद, चवीनुसार मीठ, तेल, चिमुटभर खाण्याचा सोडा आणि उकडलेल्या बटाट्याची अद्रक- लसूण घालून केलेली खमंग भाजी. 

मिरची पकोडा रेसिपी
- मिरची पकोडा चवदार होण्यासाठी मध्यम तिखट असणाऱ्या पातळ सालीच्या लांबसर उभ्या मिरच्या निवडाव्या.


- सगळ्यात आधी तर मिरच्या धुवून घ्या आणि त्यानंतर प्रत्येक मिरचीला उभा छेद देऊन तिच्या पोटातल्या बिया काढून घ्या. 
- मिरचीच्या पोटातल्या रिकाम्या भागात आता उकडलेल्या बटाट्याची अद्रक- लसूण टाकून केलेली खमंग भाजी भरा. 
- भाजी खूप जास्त भरू नये. खूप जास्त भाजी भरली तर ती तळताना बाहेर येऊ शकते. 
- यानंतर डाळीचे पीठ, तांदळाचे पीठ, हळद आणि मीठ हे सगळे सामान एका बाऊलमध्ये टाका आणि व्यवस्थित एकत्र करा. आता थोडे थोडे पाणी टाकून पकोड्यांसाठी पीठ भिजवा. आपण नेहमीप्रमाणे भजी करताना जसे पीठ भिजवतो, साधारण तसेच पीठ भिजवा.


- पीठ भिजवून झाल्यानंतर भजी तळण्याच्या आधी या पीठात सोडा टाका आणि पुन्हा एकदा मिश्रण नीट हलवून घ्या.
- आता दोन चार मिरच्या या पिठात बुडवून ठेवा. मिरचीला सगळ्या बाजूंनी व्यवस्थित पीठ लागलेले आहे, हे तपासा आणि त्यानंतर कढईत तळणासाठी ठेवलेल्या तेलात अलगद एकेक करून मिरच्या सोडा. 
- मध्यम आचेवर छान लालसर होईपर्यंत तळले गेल्यावर मिरची पकोडा कढईतून काढा आणि सॉस किंवा दह्यासोबत गरमागरम सर्व्ह करा. 

 

Web Title: Delicious and crispy chili pakoda! Ahaha .. Special spicy mirchi pakoda recipe ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.