Join us  

२ मिनिटांत करा झटपट इन्स्टंट पोहे? १ ट्रिक; नूडल्सपेक्षा झटपट करा पौष्टिक पोहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2024 4:30 PM

Delicious and Easy Instant Poha Recipe : २ मिनिटात इन्स्टंट पोहे करण्याची पाहा झटपट कृती

महिलांना सकाळच्या नाश्त्याला काय बनवावं सुचत नाही (Pohe Recipe). सकाळी नाश्ता ते दुपारी लंच करणं कठीण वाटते. सकाळी नाश्त्याला काहीतरी झटपट पदार्थ व्हावे असं प्रत्येक महिलेला वाटतं (Cooking Tips). पण पोहे, उपमा, साऊथ इंडियन पदार्थ करताना बराच वेळ जातो. पोहे या पदार्थाला महाराष्ट्रीयन (Maharashtrian People) लोकांकडून पसंती हमखास मिळते. पोहे खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. पण पोहे करायलाही बराच वेळ जातो.

नूडल्सप्रमाणेच पोह्यासारखा नाश्ताही पाण्यात विरघळवून तयार करता आला असता तर बरे झाले असते.  असं महिलावर्गाच्या मनात येते. जर आपल्याला  नूडल्सप्रमाणे इन्स्टंट पोहे करायचे असतील तर, ही रेसिपी नक्की फॉलो करून पाहा. आपण हे पोहे २ महिने साठवून ठेऊ शकता. आणि २ मिनिटात तयारही करू शकता(Delicious and Easy Instant Poha Recipe).

इन्स्टंट पोहे करण्यासाठी लागणारं साहित्य

पोहे

कडीपत्ता

बाथरूमच्या टाइल्स बुळबुळीत झाल्या, पिवळे डागही निघत नाहीत? ३ टिप्स; जुन्या टाइल्स चमकतील नव्यासारख्या

शेंगदाणे

जिरं

मोहरी

हिरवी मिरची

धणे

असे तयार करा चमचमीत इन्स्टंट पोहे

- इन्स्टंट पोहे तयार करण्यासाठी सर्वात आधी कढई गरम करण्यासाठी ठेवा. नंतर त्यात तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात जिरं, मोहरी आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची घाला.

भाजलेले की भिजवलेले? चणे नेमके कसे - केव्हा खाणे योग्य? वजन कमी करायचा फायदा हवा तर..

- हिरवी मिरची भाजून झाल्यानंतर त्यात कडीपत्ता आणि कोथिंबीर घाला. साहित्य भाजून झाल्यानंतर त्यात कोरडे पोहे घाला. सामान्य पोह्यासारखे भिजवलेले पोहे घालू नका. त्यात पोहे चांगले भाजून घ्या. नंतर त्यात चवीनुसार मीठ, आमचूर पावडर, भाजलेले शेंगदाणे आणि पिठीसाखर घालून भाजून घ्या.

- साहित्य भाजून घेतल्यानंतर एका एअर टाईट बरणीमध्ये भरून ठेवा. तयार  इन्स्टंट पोहे २ महिने आरामात टिकतात. पोहे खाण्यापूर्वी त्यात गरम पाणी घाला. पोहे शोषून घेतील तेवढेच पाणी घाला. अशा प्रकारे २ मिनिटात इन्स्टंट पोहे तयार. 

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सअन्न