Lokmat Sakhi >Food > तिळाच्या लाडूला द्या चवदार ट्विस्ट- तिळाचे व्हाईट चॉकलेट ट्रफल्स, बघा शिल्पा शेट्टीची खास हेल्दी रेसिपी

तिळाच्या लाडूला द्या चवदार ट्विस्ट- तिळाचे व्हाईट चॉकलेट ट्रफल्स, बघा शिल्पा शेट्टीची खास हेल्दी रेसिपी

How to Make White Chocolate and Sesame Seed Truffle: तिळाचे लाडू, तिळाच्या पोळ्या, तिळाच्या वड्या असे प्रकार आपण नेहमीच करताे. आता या संक्रांतीला तीळ वापरून व्हाईट चॉकलेट ट्रफल्स करा.. बघा शिल्पा शेट्टीने शेअर केलेली ही एक हेल्दी रेसिपी (healthy recipe by Shilpa Shetty).

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2023 01:04 PM2023-01-13T13:04:14+5:302023-01-13T13:05:04+5:30

How to Make White Chocolate and Sesame Seed Truffle: तिळाचे लाडू, तिळाच्या पोळ्या, तिळाच्या वड्या असे प्रकार आपण नेहमीच करताे. आता या संक्रांतीला तीळ वापरून व्हाईट चॉकलेट ट्रफल्स करा.. बघा शिल्पा शेट्टीने शेअर केलेली ही एक हेल्दी रेसिपी (healthy recipe by Shilpa Shetty).

Delicious and healthy twist to til ladoo, White Chocolate and Sesame Seed Truffle recipe, shared by Shilpa Shetty | तिळाच्या लाडूला द्या चवदार ट्विस्ट- तिळाचे व्हाईट चॉकलेट ट्रफल्स, बघा शिल्पा शेट्टीची खास हेल्दी रेसिपी

तिळाच्या लाडूला द्या चवदार ट्विस्ट- तिळाचे व्हाईट चॉकलेट ट्रफल्स, बघा शिल्पा शेट्टीची खास हेल्दी रेसिपी

Highlightsहे चॉकलेट ट्रफल्स खूप झटपट तयार होतात आणि दुसरं म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच हा पदार्थ आवडू शकतो.

संक्रांतीला तिळाचे कोणकोणते पदार्थ करायचे, याचे नियोजन घराघरांत झालेले असणारच. तुमच्या घरीही संक्रांतीचा (Makar Snkranti Special) मेन्यू ठरला असो किंवा नसो, हा एक वेगळा आणि हेल्दी पदार्थ त्या मेन्यूमध्ये लिहून ठेवा. कारण एकतर हे चॉकलेट ट्रफल्स (White Chocolate and Sesame Seed Truffle recipe) खूप झटपट तयार होतात आणि दुसरं म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच हा पदार्थ आवडू शकतो. शिवाय तीळगुळाच्या  पोळ्या, लाडू, वड्या अशा आपल्या पारंपरिक पदार्थांपेक्षा हा पदार्थ खूप वेगळा आहे. आणि आणखी विशेष गोष्ट म्हणजे ही रेसिपी फिटनेस फ्रिक अभिनेत्री शिल्पा शेट्टी (healthy recipe by Shilpa Shetty) हिने शेअर केली आहे. त्यामुळे हा पदार्थ सगळ्यांसाठीच पौष्टिक आहे, असंही ती सांगतेय. 

कसे करायचे तिळाचे व्हाईट चॉकलेट ट्रफल्स?
साहित्य

हा पदार्थ करण्यासाठी आपल्याला फक्त ४ पदार्थ लागणार आहेत.
१. ५०० ग्रॅम व्हाईट चॉकलेट

फक्त १० मिनिटांत करा तीळगुळाचे पौष्टिक लाडू, झटपट रेसिपी - पाक चुकायची भीतीच नाही

२. पाव कप ताहिनी सॉस. ताहिनी सॉस बाजारात मिळतो. पांढरे तीळ भाजून त्याची पावडर केली जाते, त्यात दही आणि इतर काही पदार्थ टाकून ताहिनी सॉस केला जातो. या सॉसमध्ये कॅल्शियम आणि प्रोटिन्स भरपूर प्रमाणात असल्याने तो तब्येतीसाठी चांगला असतो.

 

३. पाव कप बटर

४. पाव कप भाजलेले तीळ. काळे तीळ असले तरी चालेल. 

रेसिपी
१. सगळ्यात आधी तर व्हाईट चॉकलेट वितळवून घ्या.

२. चॉकलेट वितळलं की गॅस बंद करा आणि त्यात ताहिनी सॉस टाका. 

मुलांचं टीव्ही- मोबाईलचं वेड कमी करण्यासाठी काय करावं कळेना? बघा ३ उपाय- वाचा तज्ज्ञांचा सल्ला

३. ताहिनी सॉस आणि वितळलेलं चॉकलेट व्यवस्थित एकत्र केलं की त्यात बटर टाका. हे तिन्ही पदार्थ व्यवस्थित एकत्र करून झाले की ते मिश्रण एका दुसऱ्या भांड्यात काढा आणि ते भांडे फ्रिजमध्ये ४५ मिनिटांसाठी ठेवून द्या. 

 

४. तोपर्यंत तीळ भाजून घ्या आणि एका ताटात थंड होण्यासाठी ठेवून द्या.

दंड आणि कंबरेवरची चरबी कमी करायची? फक्त १ व्यायाम- रोज १० मिनिटे करा...

५. व्हाईट चॉकलेट आणि इतर पदार्थांचं मिश्रण सेट झालं की फ्रिजमधून काढा. त्याचे चॉकलेटच्या आकाराचे छोटे- छोटे गोलाकार लाडू वळा. ते लाडू तिळात घोळून घेतले की तिळापासून तयार झालेले व्हाईट चॉकलेट ट्रफल्स तयार... 

 

 

Web Title: Delicious and healthy twist to til ladoo, White Chocolate and Sesame Seed Truffle recipe, shared by Shilpa Shetty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.