थंडीमध्ये आंबट ताक प्यायला जात नाही. किंवा खूप आंबट असलेलं दहीही खाल्लं जात नाही. कारण मग ते खाऊन अनेक जणांना सर्दीचा, ॲसिडिटीचा त्रास हाेतो. मग आंबट ताकाची किंवा दह्याची आपण छान गरमागरम कढी करतो. पण आता ही कढी नेहमीचीच. म्हणूनच यावेळी आंबट ताक किंवा आंबट दही घरात असेल तर आता कढीपेक्षा वेगळं काहीतरी करून बघा. चटपटीत खमंग ताकातल्या मिरच्या (Delicious chili cooked in curd or butter milk). ही रेसिपी अतिशय सोपी आहे. जेवणात लोणचं, ठेचा याप्रमाणे तोंडी लावायला खाऊ शकता. ज्यांना मिरच्यांचा झणझणीतपणा सहन होत नाही पण हलकासा तिखटपणा मात्र आवडतो, त्यांच्यासाठी ही रेसिपी (Marathi Recipe- Takatali mirchi) उत्तम आहे.
कशा करायच्या ताकातल्या मिरच्या?
साहित्य
१५ ते २० हिरव्या मिरच्या
अमृता खानविलकरने शेअर केलं तिचं फिटनेस सिक्रेट, बघा जबरदस्त वर्कआऊट व्हिडिओ
५ वाट्या ताक
१ टीस्पून हळद
चवीनुसार मीठ
रेसिपी
१. सगळ्यात आधी मिरच्या धुवन स्वच्छ कोरड्या करून घ्या.
२. मिरच्यांची देठं काढायची गरज नाही. तशाच ठेवल्या तरी चालतात.
थंडीच्या दिवसांत रोपट्यांची काळजी कशी घ्यायची? ४ टिप्स... बाग दिसेल फ्रेश हिरवीगार
३. प्रत्येक मिरचीवर एक उभा काप मारून घ्या. असं करताना मिरचीचे पुर्णपणे २ तुकडे होणार नाहीत, याची मात्र काळजी घ्या.
४. आता गॅसवर कढई गरम करायला ठेवा आणि त्यात ताक टाका.
५. ताकामध्ये हळद आणि मीठ टाका. ताकाला उकळी यायला लागली की त्यात मिरच्या टाका.
६. मिरच्या पुर्णपणे ताकात बुडाल्या पाहिजेत, साधारण अशा पद्धतीने मिरच्यांचं आणि ताकाचं प्रमाण ठेवावं.
तुमच्याही नखांवर पांढरे ठिपके दिसतात? सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ पुजा माखिजा सांगतात त्यामागचं खरं कारण..
७. ताक आटेपर्यंत मिरच्या ताकात शिजू द्या. अधून मधून हलवत रहा.
८. ताक आटून गेलं आणि मिरच्यांचा रंग बदलला की मिरच्या तयार झाल्या असं समजावं. या मिरच्या फ्रिजमध्ये ठेवल्यास ५ ते ६ दिवस चांगल्या टिकतात.