आता महाशिवरात्रीचा उपवास म्हटलं की त्यानिमित्ताने घरोघरी उपवासाचे वेगवेगळे पदार्थ होणारचं. साबुदाण्याची खिचडी, वडे, भगर, आमटी, थालिपीठ असे उपवासाचे पदार्थ तर आपण नेहमीच करतो. आता यावेळी महाशिवरात्रीच्या दिवशी उपवासाचे कटलेट्स हा एक एकदम वेगळा पदार्थ करून पाहा. हे कटलेट्स घरातल्या लहान मुलांना तर आवडतीलच पण मोठी मंडळीही खूप चवीने खातील. या पदार्थाची खासियत अशी की तो करायला अतिशय सोपा आहे आणि त्यासाठी कोणतीही पुर्वतयारी करण्याची गरज नाही (cutlets recipe for mahashivratri fast). त्यामुळे उपवासाचे कटलेट्स रेसिपी एकदा पाहा (how to make cutlets for fast) आणि महाशिवरात्रीच्या दिवशी (Mahashivratri 2025) हा पदार्थ नक्की ट्राय करून पाहा..(simple and easy recipe for potato cutlets)
उपवासाचे कटलेट्स कसे करावे?
उपवासाचे कटलेट्स कसे करावे याची रेसिपी Cooking ticket marathi या यु ट्यूब चॅनलवर शेअर करण्यात आली आहे.
महाशिवरात्र विशेष रांगोळी डिझाईन्स- अवघ्या १० मिनिटांत काढून होतील अशा सोप्या, सुंदर रांगोळ्या
साहित्य
३ मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे
एक वाटी साबुदाणा
अर्धी वाटी भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचा कूट
४ ते ५ हिरव्या मिरच्या
कृती
सगळ्यात आधी बटाट्याची सालं काढून घ्या आणि ते किसून घ्या.
त्यानंतर साबुदाणा मिक्सरमधून बारीक फिरवून त्याची पावडर करून घ्या. कच्चा साबुदाणा घ्यायचा नसेल तर तो थोडा भाजून घ्या आणि थंड झाल्यानंतर मिक्सरमधून फिरवून त्याची पावडर करून घ्या.
साबुदाणा वडा तळताना फुटतो- तेल अंगावर उडून पोळतं? ४ टिप्स- न फुटता वडे खमंग तळून होतील
आता बटाट्याचा किस, साबुदाण्याचं पीठ, दाण्याचा कूट आणि हिरव्या मिरच्यांचे वाटण हे सगळे पदार्थ एकत्र करा आणि एकजीव होईपर्यंत मळून घ्या.
त्यानंतर हाताला तूप लावून त्याचे तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे कटलेट्स करा आणि नंतर गरम तेलात मध्यम आचेवर छान सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळून घ्या. हे कटलेट्स तुम्ही नुसतेही खाऊ शकता किंवा मग आंबट- गोड दह्यासोबत खायलाही ते छान लागतात.