Join us  

तिळाची परफेक्ट चटणी करण्याची रेसिपी, कमी वेळात-कमी साहित्यात करा चटकदार चटणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2023 9:32 AM

Delicious Dry Sesame Garlic Chutney Recipe जेवणात तोंडी लावण्यासाठी पौष्टिक तिळाची चटणी तर हवीच..

भारतीय जेवणाची थाळी विविध प्रकारच्या चटण्यांशिवाय अपूर्ण आहे. जेवणात तोंडी लावण्यासाठी चटणी हवीच. भारतातील प्रत्येक भागात विविध प्रकारच्या चटण्या फेमस आहे. सुकी व ओली अशा दोन्ही पद्धतींची चटणी आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीत आढळतात. महाराष्ट्रात देखील विविध प्रकारच्या चटण्या करण्यात येते. ज्यात तिळाची चटणी ही फार फेमस आहे.

तीळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये तांबे, मँगनीज, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, फॉस्फरस, व्हिटामिन बी१, बी६, थायामिन फोलेट, नियासिन, सेलेनियम, झिंक यासारखे पौष्टिक तत्व असतात. त्यामुळे ही चटणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. चला तर मग आरोग्यदायी चटकदार तिळाची चटणी या पदार्थाची कृती पाहूयात(Delicious Dry Sesame Garlic Chutney Recipe).

तिळाची चटणी करण्यासाठी लागणारं साहित्य

तीळ

शेंगदाणे

लसणाच्या पाकळ्या

अक्षय्य तृतीया स्पेशल : ताज्या ताज्या रसाळ आंब्यांचं करा आम्रखंड, नैवेद्यासाठी स्पेशल पदार्थ

जिरं

मीठ

लाल तिखट

तिळाची चटणी करण्याची कृती

सर्वप्रथम, कढई गरम करण्यासाठी ठेवा, त्यात एक कप तीळ घालून भाजून घ्या. तीळ भाजल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्या. याच कढईत एक कप शेंगदाणे भाजून घ्या. व त्यातच लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमचा जिरं घालून खरपूस भाजून घ्या. हे साहित्य भाजून झाल्यानंतर प्लेटमध्ये काढा. व थंड होण्यासाठी ठेवा.

साऊथ इंडियन कारा चटणीची झटपट कृती, इडली-डोशासोबत खाण्यासाठी चटकदार चटणी

आता मिक्सरच्या भांड्यात भाजलेले शेंगदाणे, जिरं आणि लसणाच्या पाकळ्या घालून बारीक वाटून घ्या. मिश्रण वाटून झाल्यानंतर त्यात भाजलेले तीळ, मीठ, लाल तिखट घालून मिश्रण वाटून घ्या. व ही चटणी एका हवाबंद डब्यात झाकून ठेवा. अशा प्रकारे तिळाची खमंग चटकदार रेसिपी खाण्यासाठी रेडी. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स