सध्याच्या थंडीच्या दिवसांत बाजारात पेरु विकायला ठेवलेले दिसतात. हे बाहेरुन हिरवेगार असलेले पेरु विकायला असे एकावर एक या पद्धतीने छान रचून ठेवलेले असतात की पटकन एखादा पेरु उचलून खावासा वाटतो. दिवसाची सुरुवात आरोग्यदायी, पौष्टिक नाश्त्यानं करावी असं म्हटलं जात. पण सकाळच्या कामं आवरण्याच्या घाईगडबडीत नाश्त्यासाठीचे पौष्टिक पदार्थ करायला वेळ कुणाला असतो. पण कितीही घाईगडबड असली तरी चाटचे काही प्रकार नक्कीच करता येतील. हे वाचून सकाळच्या वेळी कोणी चाट खातं का असा प्रश्न पडल्याशिवाय राहाणर नाही. चाट हा संध्याकाळी स्नॅक्स म्हणून खाण्याचा प्रकार असला तरी सकाळच्या नाश्त्याला चाटचे पौष्टिक प्रकार करता येतात. फळं, भाज्या, मोड आलेली कडधान्यं यांचा वापर करुन चाटचे प्रकार करता येतात(Peru Chaat Recipe).
आंबट - गोड चवीचा पेरु (Guava Chaat) खाणे म्हणजे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने ते अतिशय फायदेशीर फळं आहे असेच म्हणावे लागेल. पेरुमध्ये फायबर आणि क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असतं. पेरु खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढते. ऋतू बदलताना होणारे त्रास पेरुच्या खाण्याने आटोक्यात राहतात. पेरुचा ग्लायसेमिक इंडेक्स हा कमी असतो, म्हणजे पेरु खाल्ल्यानंतर रक्तातील साखर पटकन वाढत नाही. पेरु खाल्ल्यानंतर पोट दीर्घकाळ (Amrood Chaat) भरलेलं राहातं. पेरुच्या या गुणधर्मामुळेच पेरु वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असतो. पेरुची कोशिंबीर, स्मूदी, रायतं जस चविष्ट आणि पौष्टिक असतं तसेच पेरु चाट देखील चवीला उत्तम लागते. एरवी आपण बाजारांतून पेरु आणला की तो कधी एकदा कापून त्यावर लाल तिखट मसाला व मीठ लावून खातो असं होत. परंतु पेरुला मीठ, मसाला लावण्याची हीच सोपी ट्रिक थोड्या वेगळ्या पद्धतीने वापरुन पेरूचे झटपट होणारे पेरु चाट बनवून खाऊ शकतो. पेरु चाट (Unique Guava Recipes) बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूयात(how to make chatpata guava chaat recipe).
साहित्य :-
१. पिकलेले पेरू - २ (मध्यम आकाराचे)
२. लाल तिखट मसाला - १ टेबलस्पून
३. मीठ - चवीनुसार
४. लिंबाचा रस - १ टेबलस्पून
५. चाट मसाला - १ टेबलस्पून
६. आमचूर पावडर - १ टेबलस्पून
हरबरे उकडलेले उरलेले पाणी फेकून देता ? ‘असा’ करा वापर, प्रोटीनचा खजिना - सुधारेल तब्येत...
कृती :-
१. सगळ्यात आधी पेरु स्वच्छ धुवून घेऊन तो बरोबर मधोमध कापून त्याचे दोन भाग करून घ्यावेत.
२. आता या दोन भागांवर आडवे - उभे काप देऊन पेरु कापून घ्यावेत.
३. त्यानंतर एक बरणी घेऊन त्यात हे पेरूचे कापलेले तुकडे घालावेत.
ना बटाटे उकडण्याची गरज - ना सारणाची भानगड, फक्त १० मिनिटांत करा गरमागरम आलू पराठे...
मेथीची भाजी कडवट होते ? ९ गोष्टी - मेथीची भाजी होईल एकदम चमचमीत - कडू अजिबात लागणार नाही...
४. आता यात प्रत्येकी १ टेबलस्पून लाल तिखट मसाला, मीठ, लिंबाचा रस, चाट मसाला, आमचूर पावडर घालावी.
५. त्यानंतर या बरणीचे झाकण लावून बरणी व्यवस्थित हलवून घ्यावी. जेणेकरुन हे सगळे जिन्नस एकजीव होतील.
दुधाचा वापर न करता पनीर बनवण्याची सोपी रेसिपी, आता घरच्या घरीच झटपट बनवा पनीर..
अशाप्रकारे आपले झटपट होणारे चटपटीत, मसालेदार, चमचमीत पेरुचे चाट खाण्यासाठी तयार आहे.