Lokmat Sakhi >Food > कोबीची भाजी खाऊन कंटाळा आलाय? करून पाहा कुरकुरीत वडी; १० मिनिटात वडी रेडी

कोबीची भाजी खाऊन कंटाळा आलाय? करून पाहा कुरकुरीत वडी; १० मिनिटात वडी रेडी

Delicious Kobichi Vadi| Savoury Cabbage Cakes Recipe : कोण म्हणते कोबी बेचव लागते? एकदा कुरकुरीत वड्या खाऊन पाहा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2024 10:00 AM2024-11-05T10:00:00+5:302024-11-05T10:00:02+5:30

Delicious Kobichi Vadi| Savoury Cabbage Cakes Recipe : कोण म्हणते कोबी बेचव लागते? एकदा कुरकुरीत वड्या खाऊन पाहा..

Delicious Kobichi Vadi| Savoury Cabbage Cakes Recipe | कोबीची भाजी खाऊन कंटाळा आलाय? करून पाहा कुरकुरीत वडी; १० मिनिटात वडी रेडी

कोबीची भाजी खाऊन कंटाळा आलाय? करून पाहा कुरकुरीत वडी; १० मिनिटात वडी रेडी

कोबीचे (Cabbage) पदार्थ प्रत्येकाला आवडतीलच असे नाही (Kobichi Vadi). कोबीची भाजी म्हटलं की अनेकजण नाक मुरडतात (Cabbage Vadi). कोबीचे अनेक पदार्थ केले जातात. कोबीची भाजी, कोबीचे पराठे, कोबीची भजी देखील केली जाते (Food). कोबी हे फायबर, फोलेट, पोटॅशियम, मॅग्नेशियम, जीवनसत्त्वे ए आणि के तसेच इतर अनेक पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे (Cooking Tips). कोबी रोगप्रतिकारशक्ती सुधारते (Healthy Tips). त्यात संत्र्यापेक्षा जास्त व्हिटॅमिन सी आढळते. ही भाजी कच्ची, सॅलडच्या स्वरूपातही खाल्ली जाते.

जर आपल्याला कोबीची भाजी खायला आवडत नसेल तर, आपण कोबीची कुरकुरीत वडीही करून खाऊ शकता. वडी साधारण कोथिंबीर किंवा पालकाची करतात. पण आपण कधी कोबीची वडी करून पाहिली आहे का? जर नाही तर, ही रेसिपी नक्कीच फॉलो करून पाहा. अगदी काही मिनिटात कोबीची कुरकुरीत वडी तयार होईल. कोबीची कुरकुरीत वडी नेमकी करायची कशी? पाहा(Delicious Kobichi Vadi| Savoury Cabbage Cakes Recipe).

कोबीची कुरकुरीत वडी करण्यासाठी लागणारं साहित्य


कोबी

हिरवी मिरची

आलं

लसूण

कोथिंबीर

पांढरे तीळ

ओवा

ज्वारीचे पीठ

फराळ खाल्ले नी वजन वाढले? करा ५ सोप्या गोष्टी; पचनक्रिया होईल सुरळीत - वजन घटेल

बेसन

तांदुळाचं पीठ

हळद

लाल तिखट

मीठ

कृती

सर्वात आधी कोबी बारीक चिरून घ्या. चिरलेल्या कोबीमध्ये पाणी घालून धुवून घ्या. किंवा किसून घ्या. नंतर त्यात हिरवी मिरची, आलं - लसणाची पेस्ट घाला. बारीक चिरलेली कोथिंबीर, पांढरे तीळ, ओवा, एक वाटी ज्वारीचे पीठ, अर्धी वाटी बेसन आणि पाव वाटी तांदुळाचं पीठ घालून मिक्स करा.

शाहरुख खान आणि गौरीचा ३३ वर्षांचा संसार, गरिबीतही तिने त्याची साथ सोडली नाही आणि..

नंतर त्यात चिमुटभर हळद, २ चमचे लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालून साहित्य हाताने एकजीव करा. शेवटी चमचाभर तेल घालून ज्या पद्धतीने कणिक मळतो, त्यापद्धतीने मळून घ्या. आता एक चाळण घ्या, त्याला ब्रशने तेल लावा. आणि मळलेल्या पीठाचे लांब गोळे तयार करून घ्या. आता हे गोळे एका भांड्यात किंवा इडली पात्रात चाळण ठेऊन चांगले वाफवून घ्या.

दुसरीकडे कढईत तेल घालून गरम करण्यासाठी ठेवा. वाफवलेली वडी थंड झाल्यानंतर सुरीने वडी कट करून घ्या. आणि तेलात सोडून दोन्ही बाजूने खरपूस तळून घ्या. अशा प्रकारे कुरकुरीत कोबीची वडी खाण्यासाठी रेडी. 

Web Title: Delicious Kobichi Vadi| Savoury Cabbage Cakes Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.