Join us  

बटाट्याचे पापड कडक होतात, यंदा करा तोंडात टाकताच विरघळणारे बटाटा पापड, वाळवण स्पेशल रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2022 12:41 PM

Food And Recipe: यंदा वाळवण करायचं ठरवलंच असेल, तर हा एक चवदार पदार्थ आजच तुमच्या वाळवणाच्या (traditional food for summer) यादीत टाकून ठेवा..  करायला अगदी सोपा शिवाय जास्त काही तयारीही करावी लागल नाही...

ठळक मुद्देफक्त एका बटाट्याचे ५० पापड कसे करायचे, याची मस्त रेसिपी

उन्हाळा सुरू झाला म्हटल्यावर वाळवणाच्या (valvan) तयारीने घरोघरी जोर धरला असणार... खेडोपाडी किंवा छोट्या गावांमध्ये वाळवण करणे म्हणजे आजही एक उत्सव असतो. प्रत्येकाच्या गच्चीवर काहीतरी वाळत घातलेलं दिसतं. किंवा मग अंगणातला एखादा कोपरा स्वच्छ केला जातो. त्याठिकाणी बाज टाकली जाते आणि मग त्या बाजेवर वाळवणाचे पदार्थ मोठ्या सफाईदार पद्धतीने वाळत घातले जातात. वाळवणाच्या तयारीपासून ते पदार्थ तळून खाण्यापर्यंतचा सगळा सोहळाच मोठा देखणा असतो.. तर मग उन्हाळ्यात घरोघरी रंगणाऱ्या या वाळवण महोत्सवात (special summer food) तुम्हालाही सहभागी व्हायचं असेल, तर हा पदार्थ करून बघायलाच हवा..

 

बाजरीच्या खारोड्या किंवा सांडगे, मुगाच्या डाळीचे वडे, बटाट्याचे चिप्स, कुरडया, साबुदाण्याचे पळीपानं, बटाट्याच्या पापड्या, शेवया, उडीद पापड असे अनेक पदार्थ उन्हाळ्यात केले जातात. हे प्रत्येक पदार्थ करण्याची रेसिपी आपापल्या प्रांतानुसार वेगवेगळी असते. त्यात बटाट्याचे पापड (potato papad) करण्याच्या तर अनेक पद्धती आहेत. यापैकीच एक रेसिपी इन्स्टाग्रामच्या ammakithaali या पेजवर शेअर करण्यात आली आहे. यामध्ये फक्त एका बटाट्याचे ५० पापड कसे करायचे, याची मस्त रेसिपी शेअर करण्यात आली आहे...

कोवळ्या लुसलुशीत हरबऱ्याचं बनवा खमंग धिरडं... नाश्त्यासाठी ठरेल हा परफेक्ट मेन्यू 

बटाट्याचे पापड करण्यासाठी लागणारे साहित्य (how to make potato papad)१ मध्यम आकाराचा बटाटा, १ वाटी साबुदाणा, ४ वाट्या पाणी, मिरची पावडर, चवीनुसार मीठ, आवडत असल्यास आणि थोडीशी कोथिंबीर, १ चमचा मैदा, अर्धा चमचा जीरे किंवा जीरेपूड.

 

कसे करायचे बटाटा पापड?- सगळ्यात आधी बटाट्याची सालं काढून त्याचे बारीक काप करून घ्या.- यानंतर साबुदाणा मिक्सरमध्ये फिरवून घ्या आणि त्याचे बारीक पीठ करून घ्या.- यानंतर बटाट्याचे कापही मिक्सरमधून फिरवून घ्यावेत आणि त्याची पेस्ट करावी. - चार कप पाणी उकळत ठेवा. पाण्याला उकळी येऊ लागली की त्यात साबुदाण्याचे पीठ टाका. - पीठ आणि पाणी व्यवस्थित एकजीव झाले की त्यात बटाट्याची पेस्ट टाका.

- मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या. खूप घट्ट वाटले तर त्यात थोडे पाणी टाका.- आता या मिश्रणात चवीनुसार मीठ, मिरची पावडर, थोडीशी कोथिंबीर आणि जीरे टाका. - यानंतर एका वाटीत मैदा घ्या, त्यात पाणी टाकून सारखे करा. हा पाण्यात भिजवलेला मैदा शिजणाऱ्या पिठात टाका.- मिश्रण शिजले आणि थोडे घट्ट झाले की गॅस बंद करा.- १० मिनिटांनी प्लॅस्टिकच्या कापडावर बटाट्याचे पापड पळीने टाका आणि ते उन्हात चांगले वाळू द्या.- अशा पद्धतीने केलेले पापड अर्धवट ओले असतानाही खाल्ले तरी खूपच चवदार लागतात. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीसमर स्पेशल