Lokmat Sakhi >Food > ढाबा स्टाईल वांग्याचं भरीत, बघा सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांची झणझणीत भरीत रेसिपी

ढाबा स्टाईल वांग्याचं भरीत, बघा सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांची झणझणीत भरीत रेसिपी

Food And Recipe: वांग्याचं भरीत- भाकरी आणि तोंडी लावायला ठेचा, चटणी, कांदा असा बेत तर या दिवसांत व्हायलाच पाहिजे. म्हणूनच तर ही बघा कुणाल कपूर यांनी सांगितलेली भरीत रेसिपी.(vangyacha bharit recipe)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2022 02:34 PM2022-11-28T14:34:37+5:302022-11-28T14:35:11+5:30

Food And Recipe: वांग्याचं भरीत- भाकरी आणि तोंडी लावायला ठेचा, चटणी, कांदा असा बेत तर या दिवसांत व्हायलाच पाहिजे. म्हणूनच तर ही बघा कुणाल कपूर यांनी सांगितलेली भरीत रेसिपी.(vangyacha bharit recipe)

Dhaba style baingan bharta recipe by Chef Kunal Kapur, How to make spicy, delicious baingan bharta? | ढाबा स्टाईल वांग्याचं भरीत, बघा सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांची झणझणीत भरीत रेसिपी

ढाबा स्टाईल वांग्याचं भरीत, बघा सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांची झणझणीत भरीत रेसिपी

Highlightsसेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांनी शेअर केलेली ही अस्सल झणझणीत ढाबा स्टाईल भरीत रेसिपी एकदा बघूनच घ्या.

वांग्याचं भरीत आणि त्याच्या जोडीला बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी (Dhaba style baingan bharta recipe) हा अनेक जणांचा आवडीचा मेन्यू.. भरीत आणि भाकरीच्या जोडीला ठेचा, चटणी आणि हिरवीगार कांद्याची पात असली की हा बेत तर मग बघायलाच नको. शिवाय चातुर्मास संपून अनेक जण या दिवसांत कांदे- वांगे खायला सुरुवातही करतात. म्हणूनच तर भरीत करायचा विचार असेल तर सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांनी शेअर केलेली ही अस्सल झणझणीत ढाबा स्टाईल भरीत रेसिपी (How to make spicy, delicious baingan bharta?) एकदा बघूनच घ्या. जेवणात आणखी रंगत येईल हे नक्की. 

 

भरीत रेसिपी
साहित्य

२ वांगी, 
६ लसूण पाकळ्या
तूप किंवा तेल २ टीस्पून
वाळलेल्या लाल मिरच्या २
जिरे २ टीस्पून
१ टेबलस्पून बारीक चिरलेला लसूण
२ टीस्पून आलं
१ हिरवी मिरची
पाव कप बारीक चिरलेला कांदा
पाव कप बारीक चिरलेला टोमॅटो
चिमुटभर हळद
चवीनुसार तिखट आणि मीठ
२ टेबलस्पून कोथिंबीर

 

रेसिपी
१. सगळ्यात आधी वांग्याला चाकुने ६ ते ७ बारीक छिद्र करून घ्या आणि त्या छिद्रांमध्ये लसूण पाकळ्या अडकवून टाका.

७ वर्षे हाऊसवाईफ होते, करिअर सुरु करताना वाटलं होतं, जमेल आपल्याला हे? रुपाली गांगुली सांगतेय, अनुपमाची गोष्ट

२. वांग्याला बाहेरच्या बाजूने तेल लावा आणि वांगे गॅसवर भाजायला ठेवून द्या.

३. वांगे चांगले भाजून झाले की ते थंड होऊ द्या. थंड झाल्यानंतर त्याची साले काढून टाका आणि वांग्याचा गर ठेचून घ्या.

४. आता एका कढईमध्ये तुमच्या आवडीनुसार तेल किंवा तूप तापायला ठेवा. तापल्यानंतर त्यात लाल मिरच्या टाका आणि जिरे टाकून फोडणी करून घ्या.

 

५. फोडणी झाल्यानंतर त्यात लसूण, आलं, हिरव्या मिरच्या आणि कांदा टाकून परतून घ्या. सगळ्यात शेवटी टोमॅटो टाकून परतून घ्या.

६. टोमॅटो परतून झाला की त्यात भाजलेल्या वांग्याचा गर आणि चवीनुसार तिखट, मीठ टाका. झाकण ठेवून वाफ येऊ द्या. त्यानंतर कोथिंबीर टाका आणि गरमागरम भरीत भाकरी- पोळीसोबत खाण्याचा आनंद घ्या. 


 

Web Title: Dhaba style baingan bharta recipe by Chef Kunal Kapur, How to make spicy, delicious baingan bharta?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.