रोज सारख्याच चवीचा डाळ भात खाऊन कंटाळा आला की काहीतरी नवीन खाण्याची इच्छा होते. बाहेरून आणलेली डाळ खिचडी किंवा पुलाव खाल्ल्यानंतर छान वाटत असलं तरी वारंवार बाहेरचं खाणं योग्य नाही. बऱ्याचजणींची तक्रार असते की घरात बनवलेले पदार्थ हॉटेलसारखे परफेक्ट चवीचे लागत नाहीत. (How to make Dhaba Style Dal Fry)
ढाबास्टाईल डाळ तडका बनवण्याची सोपी रेसिपी पाहूया. यामुळे घरच्याघरी तुम्हाला बाहेरसारख्या चवीचा आस्वाद घेता येईल. घरी बनवलेलं असल्यामुळे हा पदार्थ पौष्टीक असेल आणि सगळेजण पोटभर खाऊ शकतील. डाळींमध्ये अनेक पोषक घटक असतात. रोजच्या जेवणात डाळींचा समावेश केल्यास प्रोटीन्सची कमरता भरून निघते. (Dhaba Style Dal Tadka Recipe) बाहेरच्या पदार्थांमध्ये अनेकदा तेलाचा जास्त वापर केला जातो. घरी बनवताना तुम्ही आवडीनुसार तेल किंवा इतर पदार्थांचा वापर करु शकता.
1) हॉटेलस्टाईल डाळ तडका बनवण्यासाठी सगळ्यात आधी भिजवलेली मुगाची डाळ घ्या. तुम्ही तूर किंवा मसूरच्या डाळीचाही वापर करू शकता.
2) कुकरमध्ये थोडं पाणी घालून भिजवलेली डाळ घाला. त्यात टोमॅटोचे २ मोठे काप, कांद्याचे काप, ३ ते ४ लसूण आणि हिरव्या मिरच्या, तेल, हळद घाला. हे मिश्रण एकत्र करून शिजवून घ्या.
3) कुकरच्या ३ शिट्ट्यांनंतर गॅस बंद करा. कुकर थंड होऊ द्या. नंतर झाकण उघडून हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक पेस्ट तयार करा.
4) एका कढईत तेल गरम करून त्यात डाळीची बारीक पेस्ट आणि पाणी घालून ढवळून घ्या. यात एक चमचा मीठ, लाल तिखट, गरम मसाला, धणे पावडर, जीरे पावडर घाला.
लसूण पटापट सोलण्याच्या ४ ट्रिक्स; लसणाचं चटपटीत लोणचं करा १० मिनिटात
5) एकदा ढवळल्यानंतर उरलेली डाळ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. सगळ्यात शेवटी तडका द्या. यासाठी फोडणी देण्याच्या भांड्यात तेल गरम करून मोहोरी, जीरं, कढीपत्ता, लाल तिखट, लाल मिरची घालून फोडणी तयार करा आणि गरमागरम फोडणी डाळीच्या कढईत घाला.
6) फोडणी दिल्यानंतर सर्व डाळीला लागेल अशी ढवळून घ्या. ढाबास्टाईल डाळ तडका तुम्ही भात, चपाती किंवा पराठ्यांसह खाऊ शकता.