Lokmat Sakhi >Food > आता रविवारी घरीच करा ढाबा स्टाइल मसालेदार ग्रेव्ही पनीर भूर्जी, चमचमीत बेत जमणारच

आता रविवारी घरीच करा ढाबा स्टाइल मसालेदार ग्रेव्ही पनीर भूर्जी, चमचमीत बेत जमणारच

Dhaba Style Paneer Bhurji Recipe - Quick Dinner or Lunch Recipe हॉटेलमध्ये जायचं नाही आणि घरचं रोजचं टिपिकल काही नको असा मूड असेल तर हा पदार्थ करुन पाहाच.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2023 05:21 PM2023-04-07T17:21:53+5:302023-04-07T17:22:47+5:30

Dhaba Style Paneer Bhurji Recipe - Quick Dinner or Lunch Recipe हॉटेलमध्ये जायचं नाही आणि घरचं रोजचं टिपिकल काही नको असा मूड असेल तर हा पदार्थ करुन पाहाच.

Dhaba Style Paneer Bhurji Recipe - Quick Dinner or Lunch Recipe | आता रविवारी घरीच करा ढाबा स्टाइल मसालेदार ग्रेव्ही पनीर भूर्जी, चमचमीत बेत जमणारच

आता रविवारी घरीच करा ढाबा स्टाइल मसालेदार ग्रेव्ही पनीर भूर्जी, चमचमीत बेत जमणारच

भारतीय पदार्थात पनीरचा वापर जास्त होतो. पनीरचा वापर करून अनेक पदार्थ बनवले जातात. पनीर मसाला, पनीर टिक्का, कढाई पनीर, पनीर पसंदा, मटर पनीर, असे व अनेक पदार्थ बनवले जातात. अनेकांना पनीर भुर्जी प्रचंड आवडते. पनीरमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम आणि फॉस्फरस आढळते, जे हाडांच्या मजबुतीसाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे लहान मुलांसाठी, महिलांसाठी आणि वृद्धांसाठी पनीर खूप फायदेशीर आहे.

जर झटपट काहीतरी खायची इच्छा झाली असेल तर, पनीर भुर्जी ही रेसिपी ट्राय करून पाहा. सकाळचा नाश्ता किंवा लंचसाठी हा हेल्दी उत्तम ऑप्शन आहे. ढाबा स्टाईल मसालेदार ग्रेवी पनीर भुर्जी कशी बनवायची पाहा(Dhaba Style Paneer Bhurji Recipe - Quick Dinner or Lunch Recipe).

ढाबा स्टाईल ग्रेवी पनीर भुर्जी बनवण्यासाठी लागणारं साहित्य

तेल 

बटर 

जिरं

कांदा 

आलं - लसूण पेस्ट 

हळद 

लाल तिखट 

धणे पूड 

जिरं पावडर 

मीठ

१ कप मैद्याची इन्स्टंट जिलेबी आता करा घरी, खास हनुमान जयंती प्रसाद

बेसन 

टोमॅटो

ढोबळी मिरची 

पाणी 

पनीर 

गरम मसाला 

कसुरी मेथी 

कोथिंबीर 

या पद्धतीने बनवा ढाबा स्टाईल ग्रेवी पनीर भुर्जी

सर्वप्रथम, एका पॅनमध्ये २ टेबलस्पून तेल घालून गरम करा, त्यात एक टेबलस्पून बटर, एक टेबलस्पून जिरं, बारीक चिरलेला १ मोठा कांदा, एक टेबलस्पून आलं - लसूण पेस्ट घालून मिश्रण मिक्स करा. कांदा लालसर होईपर्यंत भाजून घ्या. आता त्यात हळद, लाल तिखट, धणे पूड, जिरं पावडर, चवीनुसार मीठ, एक टेबलस्पून बेसन घालून मिश्रण मिक्स करा.

आता त्यात ३ बारीक चिरलेले टोमॅटो घालून चमच्याने सतत ढवळत राहा. टोमॅटो शिजत नाही तोपर्यंत मिक्स करा. मिश्रणाला तेल सुटल्यानंतर त्यात एक बारीक चिरलेली ढोबळी मिरची घालून मिक्स करा. २ मिनिटानंतर त्यात एक कप पाणी घालून मिश्रण शिजवण्यासाठी ठेवा.

भजी तर आवडतात पण बेसन पचत नाही? करा ज्वारीची कुरकुरीत कांदा भजी, खा बिंधास्त पोटभर

दुसरीकडे २०० ग्राम पनीर घ्या, त्याला हाताने कुसकरून बारीक करा. ग्रेवीला उकळी आल्यानंतर त्यात कूसकरून घेतलेलं पनीर घालून मिक्स करा. त्यावर २ मिनिटांसाठी झाकण ठेवा, २ मिनिटं झाल्यानंतर त्यात एक चमचा गरम मसाला, कसुरी मेथी, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करा. अशा प्रकारे ढाबा स्टाईल मसालेदार ग्रेवी पनीर भुर्जी रेडी. आपण ही रेसिपी चपाती, पाव किंवा भातासह खाऊ शकता.

Web Title: Dhaba Style Paneer Bhurji Recipe - Quick Dinner or Lunch Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.