सकाळचा नाश्ता (Breakfast) हा दिवसातील सर्वात महत्त्वाचा आहार. यामुळे दिवसभर काम करण्याची ऊर्ज मिळते. मात्र घाई गडबडीच्या जीवनात अनेकांना सकाळचा नाश्ता करायला वेळ मिळत नाही. त्यामुळे बरेच जण नाश्ता स्किप करतात. पण असे करणे योग्य नाही. नाश्त्यामध्ये चपाती-भाजी, इडली, डोसा, पोहा, उपमा आपण खातोच. पण रोजचे हे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर, ढोकळा (Dhokla) तयार करून पाहा.
ढोकळा तयार करायला देखील साधारण खूप वेळ लागतो. पण झटपट ढोकळा तयार करायचा असेल तर, आप्पे पात्रात ढोकळा तयार करून पाहा. आप्पे पात्रातील ढोकला झटपट व कमी वेळात तयार होतो. आपण हा नाश्ता टिफिनलाही घेऊन जाऊ शकता(Dhokla In Appam Pan | Soft & Spongy Appe Dhokla ).
आप्पे पात्रात मिनी ढोकळा करण्यासाठी लागणारं साहित्य
बेसन
हिरवी मिरची
हिंग
साखर
हळद
२ टोमॅटोची करा आंध्रा स्टाईल चटपटीत चटणी, जेवणाची वाढेल चव, २ घास खाल जास्त
लिंबाचा रस
तेल
पाणी
इनो
मोहरी
जिरं
कडीपत्ता
मीठ
कृती
सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये एक कप बेसन घ्या. त्यात ठेचलेली हिरवी मिरची, चवीनुसार मीठ, चिमुटभर हिंग, अर्धा चमचा साखर, चिमुटभर हळद, लिंबाचा रस व एक चमचा तेल घालून चमच्याने मिक्स करा. नंतर त्यात अर्धा कप पाणी घालून साहित्य एकजीव करा. पाणी जसे लागेल तसे घाला, आपण ज्याप्रमाणे ढोकळा करण्यासाठी बॅटर तयार करतो. त्याचप्रमाणे सरसरीत बॅटर तयार करा.
बॅटर तयार झाल्यानंतर दुसरीकडे आप्पे पात्राला ब्रशने तेल लावून ग्रीस करा. बॅटरमध्ये एक पॅकेट इनोचं घाला. नंतर त्यावर थोडं पाणी घालून मिक्स करा. जेणेकरून ढोकळा छान फुलेल. आप्पे पात्रात चमच्याने बॅटर सोडा. गॅसवर पॅन गरम करण्यासाठी ठेवा. त्यावर आप्पे पात्र ठेवा, त्यानंतर त्यावर झाकणही ठेवा. मध्यम आचेवर ढोकळा पाच ते सात मिनिटांसाठी शिजवून घ्या. सात मिनिटानंतर ढोकळा शिजला आहे की नाही हे चेक करा. नंतर आप्पे पात्रातून ढोकळा चमच्याने हळुवारपणे काढा.
शिळ्या भाकरीची करा झणझणीत ‘फोडणीची भाकरी’! -खा चविष्ट गरमागरम पदार्थ
फोडणीसाठी कढईत दोन चमचे तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात एक चमचा मोहरी, एक चमचा जिरं, कडीपत्त्याची पानं, हिरवी मिरची घालून परतवून घ्या. त्यात अर्धा कप पाणी, एक चमचा साखर आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करा. तयार फोडणी ढोकळ्यावर पसरवा. अशा प्रकारे आप्पे पात्रातील मिनी ढोकळा खाण्यासाठी रेडी.