Join us  

काळी बुरशी लागलेला कांदा खावा की फेकून द्यावा? आरोग्य बिघडते? नक्की खरं काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2024 7:28 PM

Did You Know Black Moulds On Onions Can Be Toxic And Casue Allergic Reactions? : तुम्ही काळी बुरशी आलेला कांदा खात असाल तर आधी...

कांद्याशिवाय भाजीला किंवा कोणत्या विशिष्ट पदार्थाला चव येत नाही (Onion). कांद्याची फोडणी घालताच, पदार्थाची चव वाढते. पावसाळ्यात आपण कांद्याची भजी हमखास करतो. कांद्याशिवाय सॅलडही चांगलं लागत नाही (Food). कांदा कच्चा खाण्याचे, शिजवून खाण्याचे अनेक फायदे आहेत. कांद्यामध्ये पोटॅशियम, कार्बोहायड्रेट, सोडियम, व्हिटॅमिन सी, बी ६, व्हिटॅमिन डी, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह हे घटक असतात.

कांदे हे दोन प्रकारचे असतात. लाल आणि पांढरा. पण कांदा चिरताना त्यात अनेक काळे डाग दिसतात, काही जण ते कापून टाकतात, तर काही जण धुतात. पण बुरशी लागलेला कांदा खावा का?(Did You Know Black Moulds On Onions Can Be Toxic And Casue Allergic Reactions?).

एक रुपयाही खर्च न करता स्ट्रेच मार्क्स होतील गायब; फक्त 'या' ४ तेलांचा करा असा सोपा वापर..

कांदा खाण्याचे अनेक फायदे आहेत. यात व्हिटॅमिन सीचे प्रमाण जास्त असते. जे इम्युनिटी वाढवतं. यातलं पोटॅशियम हृदयाचं आरोग्य राखतं. ज्यामुळे बॅड कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहते. कांद्याचे साल काढल्यानंतर आपण पाहिलं असेल, त्यावर बुरशी लागलेली असते. हे काळे डाग काढून किंवा ती पाकळी काढून आपण खातो. पण अशा प्रकारचा कांदा खावा का?

वजन कमी होईल आणि हाडेही राहतील बळकट? मग 'या' लाल कडधान्याची उसळ खा; प्रोटीन इतकं मिळेल की..

कांद्यावरच्या या काळ्या बुरशीला अॅस्परजिलस नायजर असं म्हणतात. ही बुरशी मातीत आढळते. ही काळी बुरशी म्युकॉर्मायकॉसिस नव्हे; पण ती एक प्रकारचं विष सोडते असं संशोधनात आढळलं आहे. काळी बुरशी असलेला भाग कांद्यातून काढून आपण खाऊ शकता. पण ज्यांना ॲलर्जीचा त्रास आहे, त्यांनी खाणं टाळावं.

कांदे फ्रिजमध्ये साठवणं टाळावे. बहुतांश कांद्यावर काळी बुरशी असते. ही बुरशी विषारी असते. बुरशी असलेला कांदा खाल्ल्याने डोकेदुखी, उलट्या, मळमळ होणे, अतिसार या समस्या उद्भवू शकतात. शिवाय आतून जर कांद्याला काळी बुरशी लागली असेल तर, खाणं टाळावे.

टॅग्स :अन्नकिचन टिप्सहेल्थ टिप्स