Lokmat Sakhi >Food > पोह्यांचा टेस्टी डाएट चिवडा आता करा घरीच, ५ मिनिटात खमंग चिवडा तयार

पोह्यांचा टेस्टी डाएट चिवडा आता करा घरीच, ५ मिनिटात खमंग चिवडा तयार

Diet Chivda, Diet free Roasted Chivda हेल्दी आणि टेस्टी खायचं आहे? आजच करा क्रिस्पी हेल्दी डाएट चिवडा, विकतचा आणण्यापेक्षा घरीच करा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2023 11:02 AM2023-05-10T11:02:35+5:302023-05-10T11:04:04+5:30

Diet Chivda, Diet free Roasted Chivda हेल्दी आणि टेस्टी खायचं आहे? आजच करा क्रिस्पी हेल्दी डाएट चिवडा, विकतचा आणण्यापेक्षा घरीच करा..

Diet Chivda, Diet free Roasted Chivda, healthy recipe | पोह्यांचा टेस्टी डाएट चिवडा आता करा घरीच, ५ मिनिटात खमंग चिवडा तयार

पोह्यांचा टेस्टी डाएट चिवडा आता करा घरीच, ५ मिनिटात खमंग चिवडा तयार

स्वतःला मेन्टेन ठेवण्यासाठी लोकं पौष्टीक आहाराचे सेवन करतात. पण कधी न कधी डाएट हा फस्तोच. त्याला कारणीभूत स्टॉलवरचे चमचमीत चटकदार पदार्थ आहे. सायंकाळी बाहेर पडताच रस्त्यावर विविध स्नॅक फूडचा घमघमाट पसरतो. ज्यामुळे हे पदार्थ खाण्याची इच्छा तीव्र होते. छोटी भूक लागली की आपल्याला चिवडा, चकली, नमकीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. पण त्यात देखील फॅट्सचे प्रमाण जास्त असते.

चटकदार पदार्थ खाण्याची इच्छा होत असेल, व ही इच्छा मोडू नये असे वाटत असेल तर, डाएट चिवडा ही रेसिपी घरी ट्राय करून पाहा. डाएट चिवडा ही रेसिपी घरच्या साहित्यात - कमी वेळात तयार होते. क्रिस्पी डाएट चिवडा बनवणे खूप सोपे आहे. पोह्यांचा हा चमचमीत चिवडा डाएटसाठी बेस्ट आहे. चला तर मग या पदार्थाची कृती पाहूयात(Diet Chivda, Diet free Roasted Chivda).

डाएट चिवडा करण्यासाठी लागणारं साहित्य

पोहे

पिवळी बारीक शेव

तेल

ना पाक करण्याची झंझट, ना लाडू फसण्याची भीती, झटपट करा रव्याचे लाडू!

मीठ

कृती

सर्वप्रथम, पोहे चांगले चाळून - निवडून घ्या. त्यानंतर एका कापडावर पसरवून पुसून घ्या. आता बेकिंग प्लेटवर पोहे पसरवा. त्यावर चवीनुसार मीठ, एक टेबलस्पून तेल घालून मिक्स करा. आता ही प्लेट मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये ठेवा, व एक मिनिटांसाठी बेक करा. पोहे बेक्ड झाले की नाही, हे तपासा. पोहे बेक्ड झाले नसतील तर, एक मिनिटांसाठी पुन्हा बेक करण्यासाठी ठेवा.

गावरान पद्धतीने घरीच करा झणझणीत बटाट्याचे भरीत, चव अशी की म्हणाल क्या बात..

पोहे चांगले बेक्ड झाल्यानंतर एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घ्या. व त्यात पिवळी बारीक शेव घालून मिक्स करा. पोहे बेक्ड करण्यासाठी आपल्याकडे ओव्हन नसेल तर, आपण पॅनमध्ये देखील पोहे भाजून घेऊ शकता. अशा प्रकारे पोह्यांचा हेल्दी डाएट चिवडा खाण्यासाठी रेडी.

Web Title: Diet Chivda, Diet free Roasted Chivda, healthy recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.