Join us  

पावसात फळं खावी की नाही? खायची तर, कोणती आणि कोणत्या वेळेला? तज्ज्ञ सांगतात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2022 11:42 AM

Diet Tips about Eating Fruits in Monsoon : पावसाळ्यात आजारी पडायची शक्यताच जास्त, अशावेळी आहारात फळांचे प्रमाण किती कसे असावे याविषयी...

ठळक मुद्देसंध्याकाळनंतर किंवा रात्रीच्या वेळी फळं खाणे शक्यतो टाळायला हवे. पावसाळ्याच्या िदिवसांत आहाराची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे...

राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. अशात आजारपणं वाढण्याची शक्यताच अधिक. सततचा ओलावा आणि गारठा यामुळे आजारांना आमंत्रण मिळण्याचा हा काळ. अशा काळात आहारात कोणकोणत्या गोष्टींचा समावेश करावा असा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडतो. पण साधारणपणे पचायला हलका, ताजा आणि गरम आहार या काळात घ्यायला हवा असे तज्ज्ञ सांगतात. फळं आरोग्यासाठी चांगली असतात. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन्स आणि आरोग्यासाठी आवश्यक घटक असतात. असे असले तरी पावसाळ्यात फळांचा आहारात समावेश करावा का? (Monsoon Special) या काळात भाज्या, फळे कमी प्रमाणात मिळतात, मिळाली तर खूप महाग मिळतात. मुख्य म्हणजे पचनशक्ती क्षीण झाल्याने या काळात फळं कितपत खावीत, खाल्ली तर कोणती फळं पावसाळ्यात चांगली, ही फळं दिवसाच्या कोणत्या वेळेला खायला हवीत. याविषयी आपल्याला अनेकदा प्रश्न पडतात. म्हणूनच याविषयी योग्य ती माहिती मिळावी यासाठी आपण पावसाळा आणि फलाहार यांबाबत माहिती घेणार आहोत. आहारतज्ज्ञ श्रुती देशपांडे यांनी या याविषयी आपल्याला काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत (Diet Tips about Eating Fruits in Monsoon). 

(Image : Google)

१. कोणती फळे खाऊ नयेत?

पावसाळ्याच्या काळात वातावरणात साधारणपणे गारठा असतो. त्यामुळे कफ होईल अशी फळे टाळायला हवीत. केळी, पेरू, सिताफळ यांसारख्या फळांमुळे कफ वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे ही फळे शक्यतो खाऊ नयेत. 

२. फळे खरेदी करताना...

पावसाळ्यात फळांना जास्त प्रमाणात माती असण्याची शक्यता असते. या मातीमुळे आपल्याला इन्फेक्शन्स होऊ शकतात. तसेच फळे आणताना थोडी कच्ची आणावीत. पूर्ण पिकेलेली फळे आणली तर पावसाळी वातावरणामुळे ती आतून खराब असण्याची शक्यता असते. अनेकदा पावसाच्या वातावरणात फळांमध्ये अळ्या, बारीक किडे असतात, अशी फळे पोटात गेल्यास इन्फेक्शन होऊ शकते. 

पावसाळ्यात खायलाच हवे चमचमीत ब्रेड पॅटिस! झटपट रेसिपी- चहासोबत गरमागरम खाऊ

३. कोणती फळे चालतील? 

या काळात पपई, डाळींब, सफरचंद, पेर ही फळे साधारणपणे खाऊ शकतो. मात्र ही फळे बाजारातून आणल्यावर स्वच्छ धुवून खावीत. तसेच खोकला नसेल तर संत्री आणि मोसंबी खायला हरकत नाही. मात्र ती जास्त आंबट असतील तर टाळलेली जास्त चांगली.  तसंच ही फळं आवडतात म्हणून अती प्रमाणात खाऊ नयेत तर योग्य त्या प्रमाणातच खायला हवीत.

४. कोणत्या वेळेला खावीत? 

फळं शक्यतो सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी खाल्लेली केव्हाही चांगली. दुपारच्या जेवणाआधी किंवा नाश्त्याच्या वेळेला फळं खाल्लेली चांगली. मात्र कोणत्याही जेवणानंतर फळं खाणे टाळावे. यामुळे पचनशक्ती क्कमजोर होण्याची शक्यता असते. फळं कच्ची असतात तर अन्न शिजवलेले असते. या दोन्ही गोष्टी एकावेळी खाल्ल्यास त्या योग्यरितीने पचत नाहीत. संध्याकाळनंतर किंवा रात्रीच्या वेळी फळं खाणे शक्यतो टाळायला हवे. 

टॅग्स :अन्नआहार योजनाआरोग्यफळेमानसून स्पेशल