उत्तम प्रकृतीसाठी आपला आहार चांगला असणे अतिशय महत्त्वाचे असते. मात्र आहारात कोणते पदार्थ कसे खावेत याबाबत माहिती असायला हवी. त्यामुळे विषिष्ट पदार्थांचे पोषण जास्त वाढते आणि शरीराला त्याचा निश्चितच फायदा होतो. भाज्यांच्या बाबतीत त्या करण्याचे काही नियम पाळल्यास त्यातून जास्त पोषण मिळू शकते. काही सलाड किंवा भाज्या कच्च्या स्वरुपात खाल्लेल्या जास्त चांगल्या असे आपण ऐकतो (Diet Tips). तर काही पदार्थ शिजवून, त्यामध्ये विशिष्ट पदार्थ घातल्यावरच त्याचे पोषण वाढते असेही म्हटले जाते. काहीवेळा पदार्थावर प्रक्रिया झाली की त्यातील पोषणमूल्य तुलनेने कमी होते असेही म्हटले जाते. (Cooking Tips)हे खरे असले तरी काही भाज्या कच्च्या खाणे आरोग्यासाठी त्रासदायक ठरु शकते. अशावेळी या भाज्या शिजवून खाल्ल्या तरच आरोग्यासाठी त्या अधिक पोषक ठरतात आणि शरीराला त्याचा चांगला फायदा होतो. आता अशा कोणत्या भाज्या आहेत ज्या शिजवल्याशिवाय खाऊ नयेत ते पाहूया (4 Vegetables healthier for you when cooked).
१. पालक
पालकामधून आपल्याला लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक हे घटक चांगल्या प्रमाणात मिळतात. मात्र हे घटक चांगल्या प्रमाणात मिळावेत यासाठी पालक चांगला शिजवणे आवश्यक असते. शिजवल्यानंतर उष्णतेमुळे पालकातील पोषक घटक चांगल्या प्रकारे निर्माण होण्यास मदत होते आणि त्याचा शरीराला चांगला फायदा होतो.
२. टोमॅटो
टोमॅटो आपण अनेकदा सलाड म्हणून कच्चे खातो किंवा कधी कोशिंबीर, ग्रेव्हीसाठी वापरतो. पण अने न करता टोमॅटो शिजवायला हवे. त्यामुळे त्यातील अँटीऑक्सिडंटसचे प्रमाण वाढते. टोमॅटोमध्ये असणारे अँटीऑक्सिडंटस हृदयरोग आणि कर्करोगासाठी अतिशय उपयुक्त असतात. टोमॅटो शिजवल्यानंतर निर्माण होणारे हे अँटीऑक्सिडंटस शरीरातील अनेक गोष्टींसाठी उपयुक्त असल्याने टोमॅटो न शिजवता खाण्यापेक्षा शिजवून खाणे केव्हाही फायद्याचे ठरते.
३. ढोबळी मिरची
ढोबळी मिरची ही अनेकांची आवडती भाजी आहे. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ढोबळी मिरची एक उत्तम सोर्स आहे. यामध्ये असणारे वेगवेगळ्या प्रकारचे अँटीऑक्सिडंटस तब्येत चांगली ठेवण्यास मदत करतात. ढोबळी मिरचीमध्ये असणारे व्हिटॅमिन्स ही भाजी शिजवल्याने पाण्यात मिसळतात आणि वाया जातात. मात्र हीच मिरची भाजल्यास त्याचे पोषणमूल्य वाढते.
४. गाजर
आपण गाजर अनेकदा सलाड म्हणून खातो, त्यामुळे ते कच्चे खातो. मात्र गाजर शिजवले तर त्यामध्ये बेटा कॅरोटीनचे प्रमाण वाढते. या घटकामुळे शरीराला व्हिटॅमिन ए चांगल्या प्रमाणात मिळते आणि त्याचा हाडांच्या वाढीसाठी, दृष्टी सुधारण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती चांगली राहण्यासाठी फायदा होतो. तसेच गाजराच्या फोडी करण्याआधी आणि साल न काढता ते शिजवल्यास जास्त चांगले.