Lokmat Sakhi >Food > हिरवी-लाल की पिवळी? कोणती ढोबळी मिरची तब्येतीसाठी ठरते वरदान, वाचा रंगात दडलेलं सिक्रेट

हिरवी-लाल की पिवळी? कोणती ढोबळी मिरची तब्येतीसाठी ठरते वरदान, वाचा रंगात दडलेलं सिक्रेट

Difference between red, yellow, orange and green capsicum : रंगबिरंगी ढोबळ्या मिरच्या आपण खातो, पण त्यातली तब्येतीसाठी पोषक नक्की कोणती?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2024 06:22 PM2024-01-05T18:22:12+5:302024-01-05T18:22:53+5:30

Difference between red, yellow, orange and green capsicum : रंगबिरंगी ढोबळ्या मिरच्या आपण खातो, पण त्यातली तब्येतीसाठी पोषक नक्की कोणती?

Difference between red, yellow, orange and green capsicum | हिरवी-लाल की पिवळी? कोणती ढोबळी मिरची तब्येतीसाठी ठरते वरदान, वाचा रंगात दडलेलं सिक्रेट

हिरवी-लाल की पिवळी? कोणती ढोबळी मिरची तब्येतीसाठी ठरते वरदान, वाचा रंगात दडलेलं सिक्रेट

आपल्या सगळ्यांच्याच घरी हिरवी ढोबळी मिरचीची (Capsicum) भाजी होत असेल. ढोबळी मिरचीला काही जण सिमला मिरची देखील म्हणतात. ढोबळी मिरचीचा वापर अनेक पदार्थांमध्ये केला जातो. शिवाय ढोबळी मिरचीमध्ये अनेक प्रकार आहेत.

सहसा आपण बाजारात हिरवी ढोबळी मिरची पाहिली असेल. पण कधी लाल, पिवळ्या, नारंगी ढोबळी मिरचीचा वापर पदार्थांमध्ये केला आहे का? त्याचे आरोग्यदायी फायद्यांबद्दल आपल्याला ठाऊक आहे का? चला तर मग कोणत्या रंगाच्या ढोबळी मिरचीचा वापर कोणत्या पदार्थ करावा? शिवाय याचे आरोग्यदायी फायदे किती पाहूयात(Difference between red, yellow, orange and green capsicum).

ढोबळी मिरची खाण्याचे फायदे

हिरवी सिमला मिरची

काही जण ढोबळी मिरची खाताना नाकं मुरडतात. पण यातील गुणधर्म आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. त्यात कॅलरीजचे प्रमाण कमी असते. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. याशिवाय त्यात प्रथिने, कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन ए, सी, के, पोटॅशियम आणि पायरीडॉक्सिन असतात. ज्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. आपण याचा वापर भाजी, पिझ्झावर टॉपिंग, किंवा इतर भाज्यांमध्ये मिक्स करून खाऊ शकता.

गुडघ्यातून करकर आवाज, ऐन तारुण्यात हाडं ठणकतात? कपभर दूधात ‘हा’ सुकामेवा घाला, हाडं होतील दणकट

लाल सिमला मिरची

लाल सिमला मिरचीमध्ये भरपूर प्रमाणात लोह आढळते, जे हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यास मदत करते. शिवाय त्यात व्हिटॅमिन सी असते. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. यासह शरीराला विषाणू आणि बॅक्टेरियापासून सरंक्षण करते. लाल सिमला मिरचीमध्ये नैसर्गिक गोडवा असतो. ज्यामुळे जर आपण झणझणीत कोणताही पदार्थ करणार असाल तर, त्यात लाल सिमला मिरची घाला.

पिवळी सिमला मिरची खाण्याचे फायदे

लाल, हिरवी यासह पिवळी ढोबळी मिरची खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यात फोलेट, मॅग्नेशियम, कॉपर, कार्बोहायड्रेट्स, कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस इत्यादी घटक असतात. यात फायबरचे प्रमाण जास्त असतात. ज्यामुळे पोटाचे विकार दूर होतात. शिवाय पचनक्रिया सुधारते. आपण याचा वापर भाजीमध्ये किंवा पिझ्झा टॉपिंगसाठी करू शकता.

रसायनयुक्त गुळ कसा ओळखायचा? ३ टिप्स, गुळात भेसळ नाही हे सहज ओळखा..

नारंगी सिमला मिरची

नारंगी सिमला मिरची क्वचित बाजारात सापडेल. यात बीटा कॅरोटीन आढळते. ज्यामुळे या सिमला मिरचीचा रंग नारंगी होतो. बीटा कॅरोटीन डोळ्यांसाठी खूप फायदेशीर ठरते. ते रेटिनाचे संरक्षण करते. आपण नारंगी सिमला मिरची रोस्टेड फ्राय करून खाऊ शकता. याला जास्त शिजवण्याची गरज नाही. सॉससोबत ही सिमला मिरची अप्रतिम लागते.

Web Title: Difference between red, yellow, orange and green capsicum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.