Lokmat Sakhi >Food > सकाळच्या घाईत शाळेच्या डब्याला रोज वेगळं काय द्यायचं कळत नाही? ३ चविष्ट पर्याय, डबा होईल फस्त...

सकाळच्या घाईत शाळेच्या डब्याला रोज वेगळं काय द्यायचं कळत नाही? ३ चविष्ट पर्याय, डबा होईल फस्त...

Different Healthy and Tasty Options for Morning School Tiffin : झटपट करता येतील आणि मुलांना आवडतील असे पर्याय कोणते ते पाहूया.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2023 12:10 PM2023-06-20T12:10:04+5:302023-06-20T12:12:02+5:30

Different Healthy and Tasty Options for Morning School Tiffin : झटपट करता येतील आणि मुलांना आवडतील असे पर्याय कोणते ते पाहूया.

Different Healthy and Tasty Options for Morning School Tiffin : Don't know what to put in the school box in the morning rush? 3 tasty options, the box will be fast... | सकाळच्या घाईत शाळेच्या डब्याला रोज वेगळं काय द्यायचं कळत नाही? ३ चविष्ट पर्याय, डबा होईल फस्त...

सकाळच्या घाईत शाळेच्या डब्याला रोज वेगळं काय द्यायचं कळत नाही? ३ चविष्ट पर्याय, डबा होईल फस्त...

मुलांच्या शाळा सुरू होऊन आता जवळपास आठवडा होत आला. रोज सकाळी घाईच्या वेळी शाळेच्या डब्यासाठी काय करायचा असा एक मोठा प्रश्न तमाम आई वर्गापुढे असतो. मुलांचं पोट भरेल, ते आवडीने खातील आणि त्यांचं पोषणही होईल असे पदार्थ द्यायचे असतात. काही शाळांमध्ये पोळी-भाजी सक्तीची असते. पण काही शाळांमध्ये मात्र तुम्ही दुसरे काहीही दिले तरी चालते. इतकेच नाही तर मूल लहान असेल तर त्यांना खाऊचाच डबा द्यावा लागतो. अशावेळी रोजच्या पोळी भाजीपेक्षा वेगळं काहीतरी देण्यासाठी झटपट काय करता येईल हे अनेकदा आपल्याला सुचत नाही. अशावेळी झटपट करता येतील आणि मुलांना आवडतील असे पर्याय कोणते ते पाहूया. इतकेच नाही तर वेगळं छान काहीतरी दिल्याने मुलंही खूश होतील आणि सगळा डबा संपवतील. पाहूयात असे पर्याय कोणते (Different Healthy and Tasty Options for Morning School Tiffin)...

१. भाज्यांचे पराठे

साधारणपणे मुलं पराठ्याला नाही म्हणत नाहीत. आपण साधारणपणे मेथी, पालक, बटाटा यांचे पराठे करतो. पण त्याशिवाय आपण कोबी, बीट, गाजर, दुधीभोपळा, कोथिंबीर अशा सगळ्या भाज्या किसून पराठे करु शकतो. यासोबत दही, सॉस किंवा चटणी दिली तर मूल आवडीने डबा खाते. त्यामुळे घरात असतील त्या भाज्या कणकेत किसून घालायच्या, त्यामध्ये आलं-लसूण पेस्ट घालून पराठा करुन द्यायचा. हा पराठा करताना त्याला भरपूर तूप लावल्यास तो खरपूस भाजला जातो आणि चवीलाही छान लागतो. 

(Image : Google)
(Image : Google)

२. फ्रँकी 

बाहेर गेल्यावर मुलं अनेकदा फ्रँकीसाठी हट्ट करतात. यालाच रॅप किंवा रोल असेही म्हटले जाते. आपण केलेलीच भाजी, त्यामध्ये थोडा परतलेला कांदा, कॉर्न, पनीर अशा फॅन्सी गोष्टी घालून थोडे मिक्स्ड हर्ब आणि सॉस घातला की त्याला छान विकतच्या फ्रँकीसारखी चव येते. पोळी-भाजीचाच थोडा हटके प्रकार असल्याने नकळत पोळी भाजीही मुलांच्या पोटात जाते. खायला आणि कॅरी करायलाही सोपा असलेला हा प्रकार मुलं अगदी आवडीने खातात. 

(Image : Google)
(Image : Google)

३. डोसे किंवा धिरडे

डोसा हा मुलांच्या आवडीचा प्रकार असतो. आपण साधारणपणे तांदळाच्या पीठाचे डोसे करतो. पण नाचणीचे पीठ, रवा आणि दही किंवा ज्वारीचे पीठ, रवा आणि दही, याचप्रमाणे डाळीचे पीठ, गव्हाचे पीठ असे कोणतेही पीठ घेऊन त्यात रवा आणि दही घालून त्याचे छान डोसे निघू शकतात. यामध्ये चवीसाठी ओवा, मीठ, लसूण, कोथिंबीर घातल्यास त्याची चव आणखी वाढते. हे डोसे डब्यातही छान मऊ राहत असल्याने डब्यासाठी उत्तम पर्याय आहे.

 

Web Title: Different Healthy and Tasty Options for Morning School Tiffin : Don't know what to put in the school box in the morning rush? 3 tasty options, the box will be fast...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.