Join us  

जेवताना तोंडी लावण्यासाठी करा कांद्याच्या ४ प्रकारच्या चटपटीत चटण्या, ५ मिनिटांत चविष्ट चटणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2023 12:23 PM

Different Type Of Onion Chutney Recipe For Dosa, Idli & Chapathi एक कांद्यापासून करा ४ प्रकारच्या चटण्या, चव अशी की म्हणाल लाजवाब..

कांद्याचा वापर जवळपास प्रत्येक घरात होतो. कांदा जरी रडवत असला तरी चवीला उत्कृष्ट लागतो. कांद्याशिवाय फोडणी अपूर्ण आहे. कांदा आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. कांद्यामध्ये व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, झिंक, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फायबर, सोडियम आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात आढळते. कांद्याचे अनेक प्रकार केले जातात.

कांद्याची भाजी, कांद्याची भजी, कांद्याचा पराठा, पण आपण कधी कांद्याची चविष्ट चटणी खाऊन पाहिली आहे का? जेवताना तोंडी लावण्यासाठी कांद्याची चटणी हा बेस्ट ऑप्शन आहे. आज आपण कांद्याच्या ४ प्रकारच्या चविष्ट चटण्या कशा तयार करायच्या हे पाहूयात(Different Type Of Onion Chutney Recipe For Dosa, Idli & Chapathi).

कांद्याची चटणी प्रकार १

साहित्य

बारीक चिरलेला कांदा

कोथिंबीर

लाल तिखट

मीठ

लिंबाचा रस

तेल

हिंग

कृती

सिमला मिरचीची चविष्ट चटणी खाऊन तर पाहा, रेसिपी सोपी - तोंडाला येईल चव

सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये बारीक चिरलेला कांदा घ्या. त्यात कोथिंबीर, एक चमचा लाल तिखट मसाला, चवीनुसार मीठ, लिंबाचा रस, हे सर्व साहित्य एकत्र करून मिक्स करा. आता फोडणीच्या भांड्यात एक चमचा तेल गरम करा, तेल गरम झाल्यानंतर त्यात एक छोटा चमचा हिंग घालून कांद्याच्या मिश्रणावर तडका द्या. व सर्व मिश्रण एकत्र मिक्स करा. अशा प्रकारे कांद्याची चटणी खाण्यासाठी रेडी.

कांद्याची चटणी प्रकार २

साहित्य

कांदा

कोथिंबीर

लाल तिखट

मीठ

लिंबाचा रस

कृती

सर्वप्रथम, कांदा गोलाकारमध्ये कापून घ्या, त्याचे स्लाईज वेगळे करा. कांदा क्रिस्पी ठेवण्यासाठी थंड पाणी घ्या, त्यात हा चिरलेला कांदा काही वेळासाठी बुडवून ठेवा. २ मिनिटानंतर बर्फाच्या पाण्यातून कांदा एका प्लेटमध्ये काढून घ्या. त्यात एक चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेला कांदा, लिंबाचा रस घालून कांद्यात मिक्स करा. अशा प्रकारे हॉटेलस्टाईल लच्छा प्याज खाण्यासाठी रेडी.

कांद्याची चटणी प्रकार ३

साहित्य

कांदा

लाल तिखट

गरम मसाला

कोथिंबीर

मीठ

तेल

लिंबाचा रस

पापड

कृती

सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये बारीक चिरलेला कांदा घ्या, त्यात एक चमचा लाल तिखट, एक चमचा गरम मसाला, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. आता त्यात एक चमचा गरम तेल, व लिंबाचा रस घालून मिक्स करा. दुसरीकडे उडदाच्या डाळीचे पापड भाजून घ्या व त्याचा चुरा कांद्याच्या चटणीत घालून मिक्स करा. अशा प्रकारे कांदा - पापड चटणी खाण्यासाठी रेडी.

नागपुरी तर्री पोहे घरीच करण्याची झणझणीत रेसिपी, चव अशी की खातच राहावे..

कांद्याची चटणी प्रकार ४

साहित्य

कांदा

लसूण

तेल

जिरं

शेंगदाण्याचं कूट

मीठ

लाल तिखट

कोथिंबीर

कृती

सर्वप्रथम, एका कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा, तेल गरम झाल्यानंतर त्यात एक चमचा जिरं, बारीक चिरलेला लसूण, व बारीक चिरलेला कांदा घालून सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या. आता त्यात २ चमचे लाल तिखट, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून परतवून घ्या. नंतर त्यात भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालून मिक्स करा. ५ मिनिटे परतल्यानंतर एका बाऊलमध्ये काढून घ्या. अशा प्रकारे कांदा - शेंगदाण्याची चटणी खाण्यासाठी रेडी.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स