अपचन, अॅसिडिटी, बद्धकोष्ठता, पोटात गॅस होणे यांसारख्या समस्या अनेकांना सतावतात. आपल्यापैकी कित्येकांना जेवणानंतर पोटाशी संबंधित अनेक समस्या होण्याचा हा कॉमन त्रास असतोच. खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि चुकीच्या वेळा यामुळे आजकाल अनेकांना गॅस, अॅसिडिटी, बद्धकोष्ठता, आंबट ढेकर, पोट फुगणं अशा वेगवेगळ्या समस्यांचा नेहमीच (Probiotic Buttermilk and their Health Benefits) सामना करावा लागतो. पचन तंत्र बिघडलं की, या समस्या होतात. या समस्या दूर करण्यासाठी लोक वेगवेगळी औषधंही घेतात. पण नेहमी (Probiotic Buttermilk Drink Recipes For A Healthy Gut) घेतल्या जाणाऱ्या या औषधांमुळे इतरही काही समस्या होण्याचा धोका असतो. अशात या समस्या दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय करणं अधिक फायदेशीर ठरत असतं(Different Types of Buttermilk For Improve Digestion).
हेल्थ एक्सपर्ट शीनम कालरा मल्होत्रा यांनी इन्स्टाग्रामवर असाच एक घरगुती उपाय सांगितला आहे. जेवल्यानंतर अन्नाचे नीट पचन होत नाही तसेच पोटाशी संबंधित अनेक लहान - मोठ्या समस्या त्रास देतात. यासाठी हेल्थ एक्सपर्ट शीनम कालरा मल्होत्रा यांनी ताक पिण्याचा फायदेशीर सल्ला दिला आहे. आपल्याकडे जेवण झाल्यानंतर सगळ्यांत शेवटी ताक पिण्याची परंपरा फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. परंतु अपचन, अॅसिडिटी, बद्धकोष्ठता, पोटात गॅस होणे यांसारख्या समस्या सतावत असतील तर नुसते ताक नाही तर, कडीपत्ता आणि बीटरुटयुक्त ताक पिण्याचा सल्ला हेल्थ एक्सपर्ट शीनम देतात. कडीपत्ता आणि बीटरुटयुक्त ताक कसे तयार करायचे ते पाहा.
अपचन, अॅसिडिटी, बद्धकोष्ठता, गॅस होऊ नये म्हणून प्या ताक...
१. कडीपत्ता ताक :- कडीपत्त्याचे ताक तयार करण्यासाठी आपल्याला कडीपत्त्याची पाने ८ ते १०, १ कप दही, १ ग्लास पाणी, १ हिरवी मिरची, आल्याचा लहान तुकडा , १ चमचा जिरे आणि चवीनुसार काळे मीठ इतक्या साहित्याची गरज लागणार आहे. कडीपत्त्याची पानं, हिरवी मिरची आणि आलं मिक्सरच्या भांड्यात घालूंन एकत्रित वाटून त्याची पेस्ट तयार करून घ्या. या पेस्टमध्ये दही, पाणी, भाजलेले जिरे पावडर आणि काळे मीठ घाला. फेस येईपर्यंत सर्व साहित्य चांगले फेटून घ्या. कडीपत्त्याचे ताक पिण्यासाठी तयार आहे.
२. बीटरुट ताक :- बीटरुट ताक तयार करण्यासाठी आपल्याला १ कप दही , १ ग्लास पाणी, १ कप किसलेलं किंवा उकळवून घेतलेलं बीटरुट, १/२ चमचा जिरेपूड, चवीनुसार काळे मीठ, चवीनुसार चाट मसाला, ३ ते ४ पुदिन्याची पाने इतके साहित्य लागणार आहे. बीटरुट ताक तयार करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात वरील सर्व साहित्य एकत्रित घालून मिक्सर फिरवून घ्यावा. त्यानंतर ताक पिण्यासाठी तयार आहे, हे ताक ग्लासमध्ये काढून पिण्यासाठी सर्व्ह करावे.
झटपट कणिक भिजवून हवी आहे, पाहा मिक्सरमध्ये कणिक भिजवण्याची ट्रिक! घाईच्या वेळी सोपा पर्याय...
हे कडीपत्ता आणि बीटरुट ताक पिण्याचे फायदे...
१. कडीपत्त्यामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म असतात. जे पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते. कडीपत्त्याच्या पानांत फायबर असते, जे अन्नाचे पचन सुलभ करण्यास फायदेशीर ठरते.
२. हे प्रोबायोटिक्सयुक्त ताक प्यायल्याने आतड्यांचे कार्य सुरळीत चालण्यास मदत होते. त्यामुळे शौचाची प्रक्रिया सोपी होते.
३. ताक हे एक उत्कृष्ट प्रोबायोटिक आहे, जे आतड्यांमध्ये चांगल्या बॅक्टेरियांच्या वाढीस प्रोत्साहन देऊन हानिकारक बॅक्टेरियांना दूर ठेवते.
४. हे ताक प्यायल्याने पोटात एंजाइम्सचा स्राव सुरळीतपणे होण्यास प्रोत्साहन देते, ज्यामुळे गॅस आणि अपचन, अॅसिडिटी सारख्या समस्या टाळता येतात.