भाताशिवाय भारतीय थाळी अपूर्ण आहे. या देशात आपल्याला भातप्रेमी सर्वत्र सापडतील. काहींना भात खाल्ल्याशिवाय आपण जेवलो आहोत, असे वाटत नाही. काहींना भात प्रचंड आवडते तर, काहींना नाही. काहींना जेवणात विशिष्ट तांदळाचा भात आवडतो. प्रत्येकाची आवड वेगळी आहे. पण, आपल्याला बिर्याणी आणि पुलाव या पदार्थात विशिष्ट तांदूळ लागतोच. त्याशिवाय बिर्याणी आणि पुलाव हे पदार्थ चवीला उत्कृष्ट लागत नाही.
बिर्याणीसाठी बासमती तांदूळ बेस्ट आहे. पण पुलाव बनवण्यासाठी कोणता तांदूळ वापरावा? या प्रश्नावर महिलावर्ग गोंधळतात. सणासुदीच्या काळात आपण पुलाव हा पदार्थ घरी बनवतो. आज आम्ही पुलाव बनवण्यासाठी कोणता तांदूळ वापरावा याची माहिती देणार आहोत. या तांदळाचा वापर केल्याने पुलावची चव दुपट्टीने वाढेल(Which rice is best for pulav in India?).
आज भात-उद्या चपाती- असं केल्यानं खरंच वजन कमी होतं? आहारतज्ज्ञ सांगतात, कधी आणि काय खायचं..
जुन्या तांदळाचा करा वापर
चांगली बिर्याणी किंवा पुलाव बनवण्यासाठी नेहमी जुना तांदूळ वापरावा. असे म्हणतात की, जुना भात खूप चविष्ट असतो, ज्याची चव वेगळी लागते. तांदूळ सुमारे २ वर्षांचा असावा. जर आपण बाजारातून पॅकेट तांदूळ विकत घेत असाल तर, त्याची तारीख पाहूनच खरेदी करा.
जुना तांदूळ ओळखण्यासाठी टिप्स
बरेच लोक पाकिटांऐवजी सैल तांदूळ खरेदी करतात, अशा परिस्थितीत जुना तांदूळ ओळखायचा कसा? याबाबतीत मास्टर शेफ पंकज भदौरिया यांनी माहिती शेअर केली आहे.
‘नायरा’ फेम अभिनेत्री शिवांगी जोशीला किडनी इन्फेक्शनचा त्रास, ऐन तारुण्यात हा आजार होण्याचं कारण..
आयडिया १
जेव्हा बाजारात जाल तेव्हा हलक्या पिवळ्या रंगाचा तांदूळ खरेदी करा. हा तांदूळ फार जुनाच नाही तर चवीलाही उत्तम लागतो. पुलाव बनवण्यासाठी बासमती तांदळाचा वापर करू नये. बाजारात मिळणारे सैल तांदळाचा वापर करा. त्याचबरोबर तांदूळ हातात उचलून तपासा, जर तुमच्या हातावर पावडर पडत असेल तर, तांदूळ जुना झाला आहे.
आयडिया २
तांदूळ जुना आहे की नवा हे ओळखण्यासाठी आपण फूड बूस्ट पद्धतीचा वापर करू शकता. आता ही फूड बूस्ट पद्धत नेमकी काय? हे पाहूया. सर्वप्रथम, हातावर तांदूळ घ्या आणि दातांमध्ये एक तांदूळ दाबून पहा. जर तांदूळ दातांमध्ये चिकटला असेल तर, याचा अर्थ तांदूळ नवीन आहे. दुसरीकडे, जर ते दातांमध्ये चिकटत नसेल तर, तांदूळ जुना आहे.