Join us  

थंडीसाठी डिंकाचे लाडू करायचा बेत आहे? घ्या सोपी रेसिपी; लाडू होतील झकास...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2022 10:08 AM

Dink Laddu Recipe Winter Special Food : डिंकामुळे थंडीत उद्भवणाऱ्या सांधेदुखी, हाडांचे जुने दुखणे, सर्दी-ताप यांसारख्या समस्या दूर होण्यास मदत होते.

ठळक मुद्देलहान मुलांपासून घरातील ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांसाठी पोषक ठरणारा हा लाडू झटपट करण्याची सोपी रेसिपीथंडीत शरीराला उष्णता मिळण्यासाठी उपयुक्त डिंक आवर्जून खायला हवा.

थंडीच्या दिवसांत घरोघरी आवर्जून खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे डिंकाचा लाडू. वर्षभर न खाल्ला जाणारा डिंक थंडीच्या दिवसांत आवर्जून खाल्ला जातो. थंडीमुळे शरीराची खर्च होणारी ऊर्जा भरुन काढण्यासाठी आणि शरीराला ताकद, पोषण देणारा हा डिंक या काळात आवर्जून खायला हवा. दिवसेंदिवस थंडी वाढत चालली असल्याने या काळात शरीराचे पोषण होण्याची आवश्यकता असते. त्यामुळे साधारणपणे उष्ण पदार्थ या काळात आवर्जून खाल्ले जातात. गूळ, खोबरे, सुकामेवा, तूप यांचा समावेश असलेला हा लाडू थंडीत खाल्ला तर सांधेदुखी, हाडांचे जुने दुखणे, सर्दी-ताप यांसारख्या समस्या दूर होण्यास मदत होते. आता डिंक खायला हवा हे जरी खरे असले तरी या डिंकाचा लाडू कसा तयार करायचा असा प्रश्न साहजिकच आपल्याला पडतो. लहान मुलांपासून घरातील ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांसाठी पोषक ठरणारा हा लाडू चांगला होण्यासाठी डिंकाचा लाडू करण्याची रेसिपी पाहूया (Dink Laddu Recipe Winter Special Food). 

(Image : Google)

साहित्य -

१. डिंक - पाव किलो

२. सुके खोबरे - पाव कीलो 

३. खारीक पूड - पाव किलो 

४. बदाम - १ वाटी 

५. खसखस - अर्धी वाटी 

६. गूळ - अर्धा किलो 

७. काजू - १ वाटी 

८. पिस्ते - अर्धी वाटी 

९. साजूक तूप - १ वाटी 

(Image : Google)

कृती - 

१. कढईत तूप घालून त्यामध्ये डिंक तळून घ्यायचा. 

२. तळलेला डींक थंड झाल्यानंतर मिक्सरमधून बारीक करुन घ्यायचा.

३. उरलेल्या तूपामध्ये बदाम, काजू, पिस्ते तळून घ्यायचे

४. खोबरे किसून त्यामध्ये खसखस आणि खारीक पूड घालायची. 

६. बदाम, काजू आणि पिस्ते यांची मिक्सरवर बारीक पूड करुन घ्यायची. 

७. आता डिंकाची पूड, सुकामेवा पूड आणि खोबरे, खसखस व खारीक सगळे एकत्र करुन घ्यायचे.

८. यामध्ये गूळ किसून किंवा बारीक पूड करुन घालायचा आणि तूप घालून सगळे मिश्रण हाताने एकत्र करुन लाडू वळायचे. 

 

 

टॅग्स :अन्नपाककृतीथंडीत त्वचेची काळजीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.