Join us  

बिना पाकाचे झटपट तयार होणारे पौष्टिक डिंक लाडू, महागड्या सुकामेव्याचीही गरज नाही- पाहा सोपी रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2023 11:48 AM

Winter Special Dink Or Gond Ladoo Recipe: डिंकाचे लाडू करायचे म्हणजे आता भरपूर पैसे खर्च करून सुकामेव्याची खरेदी करावी लागेल, असं नाही.... कोणताही सुकामेवा न वापरता अतिशय पौष्टिक डिंक लाडू करण्याची ही रेसिपी पाहा (Dink ladoo recipe in Marathi)....

ठळक मुद्देमोजके ४ ते ५ पदार्थ वापरून पाक न करता झटपट डिंक लाडू कसे करायचे ते पाहूया... रोज सकाळी हा १ लाडू जरी खाल्ला तरी भरपूर एनर्जी मिळेल. 

हिवाळा आता चांगलाच जाणवायला लागला आहे. वातावरणातील गारवा वाढू लागला की मग आठवण होते ती पौष्टिक अशा डिंक लाडूंची. हिवाळ्यात घरोघरी डिंकाचे लाडू केले जातात (How to make healthy gond ladoo for winter?). आता प्रत्येक घरानुसार वेगवेगळी रेसिपी असते. पण तरीही त्यातल्या त्यात सोपी अशी एक रेसिपी आपण आता पाहूया.. या रेसिपीनुसार लाडू करायचे असतील तर त्यासाठी पाक करावा लागत नाही. शिवाय बदाम, काजू असा कोणताही महागडा सुकामेवा वापरण्याचीही गरज नाही (Winter special gond ladoo recipe by chef Vishnu Manohar). मोजके ४ ते ५ पदार्थ वापरून पाक न करता झटपट डिंक लाडू कसे करायचे ते पाहूया (Dink ladoo recipe in Marathi)... रोज सकाळी हा १ लाडू जरी खाल्ला तरी भरपूर एनर्जी मिळेल. 

 

बिनापाकाचे पौष्टिक डिंक लाडू करण्याची सोपी रेसिपी

ही रेसिपी प्रसिद्ध सेलिब्रिटी शेफ विष्णू मनोहर यांनी शेअर केली आहे.

साहित्य 

१ वाटी शेंगदाणे

१ वाटी पांढरे तीळ

अर्धी वाटी डिंक

'हेल्दी' असतो म्हणून ब्राऊन ब्रेड खात असाल तर ३ गोष्टी लक्षात ठेवा- वाचा आहारतज्ज्ञांचा खास सल्ला 

२ चमचे तूप

१ वाटी गूळ

१ टेबलस्पून सुंठ पावडर

 

कृती

सगळ्यात आधी कढई गॅसवर तापायला ठेवा आणि शेंगदाणे भाजून घ्या. शेंगदाणे थंड झाले की शेंगदाण्याची टरफलं काढून टाका. 

शेंगदाणे भाजून झाले की मंद आचेवर तीळ भाजून घ्या.

हिवाळ्यात आऊटिंगसाठी करता येतील असे ७ स्टायलिश विंटर लूक- दिसाल एकदम कॅची- आकर्षक

यानंतर तीळ आणि शेंगदाणे थंड होऊ द्या. तोपर्यंत कढईमध्ये तूप टाकून डिंक तळून घ्या..

आता शेफ विष्णू मनोहर यांनी शेंगदाणे, तीळ आणि डिंक हे खलबत्त्यामध्ये कुटून घेतले आहेत आणि नंतर त्यात किसलेला गूळ टाकून लाडू वळले आहेत.

थंडीची हुडहुडी सुरू झालीये- उबदार स्वेटर घ्यायचंय? बघा ३ सुपरस्टायलिश पर्याय- दिसाल एकदम स्मार्ट 

पण तुमच्याकडे एवढा वेळ नसेल तर शेंगदाणे, तीळ, डिंक, गूळ, सुंठ पावडर आणि थोडंसं तूप हे सगळं एकाचवेळी मिक्सरमध्ये टाका आणि एकत्रितपणे बारीक करून घ्या. या मिश्रणाचे लाडू वळा. मिश्रण कोरडं वाटलं तर त्यात आणखी तूप टाका. भरपूर पोषण देणारे पौष्टिक लाडू तयार..

 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पाककृतीथंडीत त्वचेची काळजी