Lokmat Sakhi >Food > थंडीच्या दिवसात इम्युनिटी वाढवतील डिंकाचे पौष्टीक लाडू; ही घ्या सोपी, स्वादीष्ट रेसिपी

थंडीच्या दिवसात इम्युनिटी वाढवतील डिंकाचे पौष्टीक लाडू; ही घ्या सोपी, स्वादीष्ट रेसिपी

How to Make Gond Laddu : डिंकाचे लाडू अँटी-ऑक्सिडेंट आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांनी समृद्ध असतात, त्यामुळे डिंकांच्या लाडूचे सेवन केल्यास रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. ज्यामुळे तुम्ही व्हायरस आणि बॅक्टेरियाचा संसर्ग टाळू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 12:29 AM2022-12-12T00:29:22+5:302022-12-12T16:48:30+5:30

How to Make Gond Laddu : डिंकाचे लाडू अँटी-ऑक्सिडेंट आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांनी समृद्ध असतात, त्यामुळे डिंकांच्या लाडूचे सेवन केल्यास रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. ज्यामुळे तुम्ही व्हायरस आणि बॅक्टेरियाचा संसर्ग टाळू शकता.

Dinkache ladoo : How to Make Gond Laddu : Dinkache ladoo healthy recipe | थंडीच्या दिवसात इम्युनिटी वाढवतील डिंकाचे पौष्टीक लाडू; ही घ्या सोपी, स्वादीष्ट रेसिपी

थंडीच्या दिवसात इम्युनिटी वाढवतील डिंकाचे पौष्टीक लाडू; ही घ्या सोपी, स्वादीष्ट रेसिपी

हिवाळ्यात वातावरणातील बदलामुंळे रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत झाल्यानं सर्दी, खोकला यांसारखे त्रास उद्भवतात.  (How to make Healthy Laddu) तब्येत उत्तम राहण्यासाठी फक्त व्यवस्थित जेवणं पुरेसं नसतं. फळं, बिया, सुकामेवा यांसारख्या पदार्थांचाही आहारात समावेश करायला हवा. थंडीत मेथीचे, डिंकाचे लाडू अनेक घरांमध्ये बनवले जातात. यामुळे तब्येत तर चांगली राहतेच याशिवाय अनावश्यक क्रेव्हींग्सही टाळता येतात. पौष्टीक लाडू तयार करण्याची सोपी पद्धत या लेखात पाहूया. (Dinkache laddu healthy recipe)

डिंकाचे लाडू खाण्याचे फायदे

1) डिंकाचे लाडू अँटी-ऑक्सिडेंट आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांनी समृद्ध असतात, त्यामुळे डिंकांच्या लाडूचे सेवन केल्यास रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. ज्यामुळे तुम्ही व्हायरस आणि बॅक्टेरियाचा संसर्ग टाळू शकता.

2) थकवा, अशक्तपणा जाणवत असताना डिंक लाडू खाणे खूप फायदेशीर मानले जाते. कारण डिंकाचे लाडू हे पोषक तत्वांनी परिपूर्ण असतात, जे तुमच्या शरीरात ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत करतात.

३) डिंकाचे लाडू खाणे हाडांसाठी खूप फायदेशीर मानले जाते. डिंकाच्या लाडूमध्ये भरपूर कॅल्शियम असते, त्यामुळे डिंकाचे लाडू खाल्ल्यास हाडे मजबूत होतात. त्यामुळे हाडांशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.

४) बद्धकोष्ठतेची तक्रार असल्यास डिंकाच्या लाडूचे सेवन करणे फायदेशीर मानले जाते. कारण गोंड लाडूमध्ये फायबर आढळते, ज्यामुळे मल मऊ होतो, ज्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.

५) सांधेदुखीची तक्रार असताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. पण सांधेदुखीची तक्रार असताना गोंडाचे लाडू खाल्ल्यास दुखण्याची तक्रार दूर होते.

Web Title: Dinkache ladoo : How to Make Gond Laddu : Dinkache ladoo healthy recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.