Lokmat Sakhi >Food > Diwali 2022 : धनत्रयोदशीला धणे आणि गुळ किंवा धणे आणि खडीसाखरेचाच नैवैद्य का महत्त्वाचा? आरोग्यासाठी पाहा फायदे

Diwali 2022 : धनत्रयोदशीला धणे आणि गुळ किंवा धणे आणि खडीसाखरेचाच नैवैद्य का महत्त्वाचा? आरोग्यासाठी पाहा फायदे

Benefits of Jaggery And Coriander Dhanteras Naivedya Diwali: आपल्याकडे असलेल्या धनाची पूजा करण्याचा, ते वाढण्यासाठी प्रार्थना करण्याचा दिवस म्हणजे धनतेरस किंवा धनत्रयोदशी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2022 10:20 AM2022-10-22T10:20:02+5:302022-10-22T10:25:01+5:30

Benefits of Jaggery And Coriander Dhanteras Naivedya Diwali: आपल्याकडे असलेल्या धनाची पूजा करण्याचा, ते वाढण्यासाठी प्रार्थना करण्याचा दिवस म्हणजे धनतेरस किंवा धनत्रयोदशी.

Diwali 2022 Benefits of Jaggery And Coriander Dhanteras Naivedya : Why is coriander and jaggery or coriander and jaggery only important for Dhantrayodashi? See the health benefits | Diwali 2022 : धनत्रयोदशीला धणे आणि गुळ किंवा धणे आणि खडीसाखरेचाच नैवैद्य का महत्त्वाचा? आरोग्यासाठी पाहा फायदे

Diwali 2022 : धनत्रयोदशीला धणे आणि गुळ किंवा धणे आणि खडीसाखरेचाच नैवैद्य का महत्त्वाचा? आरोग्यासाठी पाहा फायदे

Highlightsअतिरिक्त कष्ट झाल्याने थकवा आला असेल तर धणे आणि गूळ हा उत्तम उपाय सांगितला आहे. धण्याचे औषधी गुण आणि खडीसारखरेचा गोडवा जगण्यात रहावा, आरोग्य लाभावे ही त्यामागची भावना असते. 

दीपावलीची सुरुवात वसुबारसेपासून होते. धनत्रयोदशी हा दिवाळीच्या महत्त्वाच्या दिवसांपैकी दुसरा दिवस. धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज असे सण या एकामागोमाग असतात. दिवाळीमध्ये धनत्रयोदशीला विशेष महत्त्व असून आपल्याकडे असलेल्या संपत्तीची, धनाची या दिवशी आवर्जून पूजा केली जाते. बरेच जण या दिवशी धनाची वृद्धी व्हावी या हेतूने सोन्याची खरेदी करतात. आपल्याकडे असलेल्या धनाची पूजा करण्याचा, ते वाढण्यासाठी प्रार्थना करण्याचा दिवस म्हणजे धनतेरस किंवा धनत्रयोदशी (Benefits of Jaggery And Coriander Dhanteras Naivedya Diwali). 

(Image : Google)
(Image : Google)

सामान्य लोक घरातील सोन्या-नाण्याची या दिवशी आवर्जून पूजा करतात. तर व्यापारी, सराफ आणि शेतकऱ्यांमध्ये या सणाला विशेष महत्त्व दिलं जातं. शेतकऱ्यांसाठी धान्य हे धन तर व्यापाऱ्यांकडे येणारं धन अशा दोन्ही अर्थानं या धनाची पूजा या दिवशी केली जाते. या दिवशी पूजा करून आरोग्य, उत्तम धन आणि संपदा लाभावी यासाठी प्रार्थना केली जाते. या दिवशी नैवेद्य म्हणून धणे आणि गुळ किंवा धणे आणि खडीसाखर ठेवले जाते. आता धणे आणि गूळ किंवा खडीसाखरच का? तर त्यालाही शास्त्रीय महत्त्व आहे. भारतीय परंपरेत नैवेद्य म्हणजे त्या त्या ऋतूनुसार व्यक्तीला आवश्यक असलेला आणि साजेसा असा आहार. पाहूयात धणे आणि गुळाचे महत्त्व..

१. पोषणतज्ज्ञ हिवाळ्यात गुळ खाण्याचे अनेक फायदे सांगतात. हे सुपरफूड केवळ चयापचय आणि प्रजनन क्षमता सुधारत नाही, तर हाडे मजबूत देखील करते. साखरेमुळे लोकांच्या आरोग्याला हानी पोहोचते, त्यामुळे गूळ साखरेला उत्तम पर्याय ठरू शकतो. यामध्ये व्हिटॅमिन-बी, कॅल्शियम, जस्त, तांबे आणि फॉस्फरस यांसारखी अनेक मिनसल्स आढळतात. त्यामुळे गुळ शरीरासाठी हितकारक ठरतो. 

२. धण्यासोबत गुळ खाल्ल्याने मासिक पाळीवेळी होणारा रक्तस्त्राव कमी होतो आणि वेदनांमध्ये आराम मिळतो. याशिवाय गुळ आणि धने यांचे मिश्रण मासिक पाळी सुरू करण्यासाठी उपयुक्त आहे. पीसीओडीमध्ये महिलांसाठी देखील हे मिश्रण चांगले मानले जाते.

(Image : Google)
(Image : Google)

३. धनत्रयोदशीला धणे आणि खडीसाखरेचाही नैवैद्य अनेक ठिकाणी दाखवला जातो. पत्री खडीसाखर, शरीराला थंडावा देणे, पचनाचे विकार ते मूत्रविकार यासाठी उपयुक्त असते. त्यासोबत उष्णतेचा त्रास होणे, तोंड कोरडे पडणे यासाठी खडीसाखरही महत्त्वाची. धण्याचे औषधी गुण आणि खडीसारखरेचा गोडवा जगण्यात रहावा, आरोग्य लाभावे ही त्यामागची भावना असते. 

४. अॅसिडीटी, अपचन यांसाठी धणे अतिशय चांगले असतात. पचनसंस्थेच्या तक्रारी दूर होण्यासाठी आयुर्वेदात धणे खाण्याचा सल्ला दिला जातो. आमविकार, जुलाब यांसारख्या तक्रारींवरही धणे आणि खडीसाखर अतिशय उपयुक्त ठरते. वयामुळे किंवा सततच्या ताणामुळे, अतिरिक्त कष्ट झाल्याने थकवा आला असेल तर धणे आणि गूळ हा उत्तम उपाय सांगितला आहे. 

Web Title: Diwali 2022 Benefits of Jaggery And Coriander Dhanteras Naivedya : Why is coriander and jaggery or coriander and jaggery only important for Dhantrayodashi? See the health benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.