Join us  

Diwali 2022 : वसुबारसेला करतात भाजी-भाकरीचा नैवेद्य, काय त्याचे महत्त्व...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2022 2:08 PM

Vasubaras Diet Importance Diwali First Day Worshiping Cow and Calf Govtsa Dwadashi : भाजी-भाकरीच का असा प्रश्न कदाचित आपल्याला पडला असते. तर त्याची कारणे आणि महत्त्व खालीलप्रमाणे

ठळक मुद्देभाज्यांमधून शरीराचे पोषण होत असल्याने भाज्या खाण्याची सुरुवात या काळात केली जात असल्याने या नैवेद्यामध्ये भाजी असण्याचे महत्त्व असते. गुळामुळे शरीराला ऊर्जा तर मिळतेच पण भाकरीसोबत गुळ आणि तूप घालून खाल्ल्यास दिवाळीतील थंडीच्या काळात हा अतिशय उत्तम आहार ठरु शकतो.  

आज दिवाळीचा पहिला दिवस म्हणजेच गोवत्स द्वादशी ज्याला आपण वसुबारस म्हणतो. या दिवशी गायीची पुजा करुन तिला नैवेद्य दाखवून दिवाळीची सुरुवात होते. वर्षानुवर्षे चालत आलेली ही परंपरा केवळ खेड्यातच नाही तर शहरातही पाळली जाते. गायीला आपल्या धर्मात खूप महत्त्व असून गोपूजनाला विशेष महत्त्व आहे. वसुबारसेला घरातील गोधनाची म्हणजेच गोठ्यातील गायींची पूजा केली जाते. मात्र शहरात घरात गाय पाळणे शक्य नसल्याने गोठ्यात जाऊन गायीची पूजा केली जाते. यावेळी गायीला ओवाळून तिला गोडाधोडाचा आणि भाजी- भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. आता भाजी-भाकरीच का असा प्रश्न कदाचित आपल्याला पडला असते. तर त्याची कारणे आणि महत्त्व खालीलप्रमाणे (Vasubaras Diet Importance Diwali First Day Worshiping Cow and Calf Govtsa Dwadashi)... 

(Image : Google)

१. दिवाळी म्हणजे साधारपणे थंडी सुरू होण्याचा कालावधी. थंडीमध्ये साधारणपणे ज्वारी किंवा बाजरी खाल्ली जाते. शरीरातील उष्णता दिर्घकाळ टिकून राहावी यासाठी ही दोन्ही धान्ये अतिशय उपयुक्त असतात. त्यामुळे गायीला या धान्याचा नैवेद्य दाखवला जातो. इतकेच नाही तर आपणही ही धान्ये खाल्ल्याने आपले आरोग्य थंडीच्या दिवसांत चांगले राहते. 

२. पावसाळ्याच्या दिवसांत तुलनेने बाजारात भाज्यांचे प्रमाण कमी असते. किंवा पालेभाज्या, कंदमुळे शक्यतो पावसाळ्याच्या दिवसांत खाल्ली जात नाहीत. मात्र थंडीच्या दिवसांत सर्व प्रकारच्या भाज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने फळभाज्या खाण्यास या काळात सुरुवात केली जाते. भाज्यांमधून शरीराचे पोषण होत असल्याने भाज्या खाण्याची सुरुवात या काळात केली जात असल्याने या नैवेद्यामध्ये भाजी असण्याचे महत्त्व असते. 

(Image : Google)

३. पूर्वी गायीला गोड म्हणून गूळ आणि बाजरीचा नैवेद्य दाखवण्याचीही प्रथा अनेक ठिकाणी होती. थंडीच्या दिवसांत गोड खाल्ल्याने थंडीपासून शरीराचे संरक्षण होण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होतो. म्हणून या काळात गूळ आवर्जून खाल्ला जातो. गुळामुळे शरीराला ऊर्जा तर मिळतेच पण भाकरीसोबत गुळ आणि तूप घालून खाल्ल्यास दिवाळीतील थंडीच्या काळात हा अतिशय उत्तम आहार ठरु शकतो.   

टॅग्स :अन्नदिवाळी 2022आहार योजना