Lokmat Sakhi >Food > रवा-बेसनाचे पाकातले लाडू करताय,पण पाक घट्ट झाला किंवा सैल झाला तर काय कराल?

रवा-बेसनाचे पाकातले लाडू करताय,पण पाक घट्ट झाला किंवा सैल झाला तर काय कराल?

लाडू वळताच येत नाही, पाक बिघडला तर काय करायचे, घ्या खास टिप्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2023 07:45 PM2023-11-02T19:45:18+5:302023-11-02T19:50:23+5:30

लाडू वळताच येत नाही, पाक बिघडला तर काय करायचे, घ्या खास टिप्स

Diwali -Diwali special food : what to do if rava ladoo - ladu gone wrong, What if Laddu is not binding? | रवा-बेसनाचे पाकातले लाडू करताय,पण पाक घट्ट झाला किंवा सैल झाला तर काय कराल?

रवा-बेसनाचे पाकातले लाडू करताय,पण पाक घट्ट झाला किंवा सैल झाला तर काय कराल?

Highlightsलाडवाला रवा बारीकच हवा हा नियम मात्र आधीपासून लक्षात ठेवा.

पाक म्हंटलं की अनेकींना भीती वाटते. नको तो पाक. सैल झाला तर, कडक झाला तर? लाडू वळलेच नाही तर? भगराळे झाले तर? पाक कच्चाच राहिला आणि लाडू वळले गेले नाहीतर ? आणि असं होतंच.
आपण घाईत लाडू करतो आणि सगळं बिनसतं.
दिवाळीत घरांमधे रवा आणि बेसन यांचे लाडू होतात. या लाडूंसाठी रवा आणि बेसन दोन्ही तुपावर भाजले जातात. बेसन चांगले भाजणे हे यातले कौशल्य आहे. घाई केली की रंग मार खातो आणि बेसन कच्चे राहते. मंद आणि संयम ठेवूनच भाजायला हवे. मग बेसनाचा रंग सोनेरी होऊ लागतो. बेसून तूप सोडू लागतं.म्हणजे बेसन भाजण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली असते. तेच रव्याचेही. रवा जितका मंद भाजला जातो तितका तो चांगला फुलतो आणि मुरतोही.
पण पाकात गेल्यावर गडबड झाली तर?

पाक बिघडला तर काय कराल?

सगळ्यात आधी घाबरु नका. पाक बिघडला म्हणजे नेमकं काय झालं हे समजून घ्या,
१. पाक सैल झाला असेल तर अजिबात टेंशन न घेता. सरळ लाडू चांगला ८-१० तास पाकात पडून राहू द्या.
२. लाडू वळायला येईल. छान मुरेल रवा. लाडू बिघडणार नाही.
३. लाडू थोडासा ओलसर राहू शकेल. त्यामुळे जरा ते मिश्रण हलवत राहा.
४. फारच वाटलं तर थोडा रवा पुन्हा भाजून पाकात घाला.
५. आणि पाक घट्ट झाला तर काय कराल? हे जरा जोखमीचं काम आहे.
६. मिश्रणाला अगदी किंचित दुधाचा शिपका मारा. भसकन दूध घालू नका, चिखल होईल. हळू हळू थोडं थोडं मिश्रण घेऊन शिपका मारा.
लाडू वळा.
७. खूपच कोरडा वाटला तर एकदम सैल पाक म्हणजे साखरपाण्याला उकळी आली की लगेच या मिश्रणात ओता. पण त्यानं लाडू थोडा गोड होईल.
८. पाक बेताने घाला. साखर अगदी कमी घ्या. पाक अगोड ठेवा
९. मुख्य म्हणजे पाक बिघडतो तेव्हाच जेव्हा आपण घाईत करतो आणि घट्ट करतो. लाडवाला एक तारी पाक पुरतो. 
१०. लाडवाला रवा बारीकच हवा हा नियम मात्र आधीपासून लक्षात ठेवा.

Web Title: Diwali -Diwali special food : what to do if rava ladoo - ladu gone wrong, What if Laddu is not binding?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.