Join us  

टाळूला न चिकटणारे-दाणेदार, मऊसूत बेसन लाडू करण्याच्या सोप्या ट्रिक्स, लाडू जमतील परफेक्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2023 11:24 AM

Besan Ladoo Recipe in Marathi (Besan Ladoo kase karave) : बेसनाचे लाडू बनताना काही सोप्या टिप्स वापरल्या तर पदार्थ बिघडणार नाही. दिवाळीत घरातील सगळेचजण लाडू फस्त करतील.

दिवाळीला (Diwali 2023) लाडू आवर्जून बनवले जातात. कोणी रव्याचे तर कोणी बेसनाचे लाडू बनवतात. (How to make besan ladoo at home)  बेसनचे लाडू कधी जिभेला चिकटतात कधी जास्त तुपकट होतात, परफेक्ट गोल न होता खाली चिकटतात. खायला  चविष्ट लागतात पण परफेक्ट बेसन लाडू करणं सर्वांनाच जमतं असं नाही. बेसनाचे लाडू बनताना काही सोप्या टिप्स वापरल्या तर पदार्थ बिघडणार नाही. दिवाळीत घरातील सगळेचजण लाडू फस्त करतील. (Diwal Special Besan Ladoo Recipe)

बेसन लाडू  करण्याची परफेक्ट पद्धत कोणती? (How to make besan ladoo)

१) बेसन  लाडूसाठी अर्धा किलो  हरभऱ्याची डाळ हलकी भाजून घ्या. भाजलेली डाळ थंड करून बेसनाचे पीठ दळून आणा. अर्धा किलो डाळीसाठी,  चारशे ग्रॅम पिठीसारखर आणि दीडशे ग्रॅप तूप लागेल. तुपाचे प्रमाण कमी जास्त होऊ शकते. 

२) सगळ्यात आधी बेसून भाजून घ्या. बेसन भाजण्यासाठी गोल तळाची कढई वापरा. त्यात तूप घाला तूपात बेसनाचे पीठ भाजून घ्या. कढई लहान असेल तर  दोन वेळा पीठ भाजा.  जर कढई मोठी असेल तर एककाच वेळी भाजा.  पीठ भाजत असताना  अजून तूप लागले तर तूप घालून मंच आचेवर खमंग सुगंध येईपर्यंत भाजून घ्या.  १० ते १५ मिनिटांनी बेसन तूप शोषून घेईल. बेसन अजून १० मिनिटं भाजून घ्या.  

१५ मिनिटांत बनेल १ किलो मुरमुऱ्याचा चिवडा, जराही मऊ होणार नाही-घरीच जमेल परफेक्ट खमंग चिवडा

३) चमच्याच्या साहाय्याने पीठ ढवळत राहा.  यामुळे बेसन परफेक्ट भाजून होते. बेसन व्यवस्थित परतवून झाले की त्यात थोडं दूध घालून शिजवून घ्या. यामुळे बेसन छान रवाळ होते. दुधामुळे बेसन  खराब होत  नाही तर छान टेक्सचर येते.

४) गॅस बंद करून बेसन एका ताटात काढून घ्या. हे मिश्रण सेट व्हायला वेळ लागू शकतो. बेसनाचे पीठ एकजीव करून घ्या. त्यात  थोडी थोडी पिठीसारखर घाला. याचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता.  यात अर्धा चमचा वेलची पावडर घालून पुन्हा एकजीव करा.

 १ किलो भाजणीची खमंग चकली कशी करावी? पिठात 'हा' पदार्थ मिसळा; परफेक्ट बनेल चकली

साखर व्यवस्थित एकत्र झाली की या मिश्रणाचे लाडू करून घ्या.  लाडू वळून झाल्यानंतर लाडू थोडे खाली बसल्यासारखे दिसतीत पण भाजताना तूप वपरल्यामुळे लाडू असे दिसतात.  थोड्या वेळाने लाडू पुन्हा व्यवस्थित दिसतील.

टॅग्स :दिवाळी 2023कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सअन्न