दसऱ्यानंतर आता सगळ्यांनाचं दिवाळीचे (Diwali 2024) वेध लागले आहे. दिवाळी म्हटलं की पहिली आठवण येते ती फराळाची. दिवाळीत फराळ खाण्याचा आनंद आणि मजा काही वेगळीच असते. दिवाळीनिमित्त तयार केल्या जाणाऱ्या फराळाची लगबग आता प्रत्येक घरात सुरु असेलच. घरातील प्रत्येक गृहिणी आता फराळ करण्याच्या तयारीला लागली असेलच. रोजची काम, स्वयंपाक, घरातलं आवरुन फराळ बनवण्यासाठी थोडा वेळ राखून ठेवला जातो. सध्याच्या काळात कामाच्या घाई - गडबडीत सगळेच फराळाचे पदार्थ घरी करणे शक्य नसते, यामुळे आपण काही मोजकेच पदार्थ घरी तयार करतो. काही गृहिणी विकेंडचे निमित्त साधून एकाचवेळी फराळाचे एकदम दोन ते तीन पदार्थ बनवण्याचे नियोजन आखतात(Diwali Faral Preperation Cooking tips Kitchen hacks).
जर आपण सुद्धा येत्या विकेंडचे निमित्त साधून एकाचवेळी अनेक फराळाचे पदार्थ बनवणार असाल, तर त्यासाठी लागणारी बेसिक तयारी आधीच करुन ठेवा. जर फराळाचे दोन ते तीन (Time saving kitchen tips) पदार्थ एकाचवेळी बनवणार असाल तर गडबड - गोंधळ उडू नये म्हणून त्यासाठी लागणारी तयारी आधीच केली पाहिजे. अशी बेसिक तयारी आधीच करुन ठेवली तर फराळाचे पदार्थ झटपट बनून तयार होतात. फराळ बनवण्यासाठी बेसिक तयारी नेमकी काय व कशी करावी यासाठी काही खास टिप्स(diwali faral preperation cooking tips kitchen hacks diwali faral tips time saving kitchen tips).
फराळ बनवण्यासाठी बेसिक तयारी नेमकी कशी करावी ?
१. दिवाळी फराळाची यादी :- सगळ्यात आधी तुम्ही यंदा कोणता फराळ करणार आहात याची एक यादी करुन घ्या. कारण सगळ्यात महत्वाची पूर्वतयारी असते ती म्हणजे यादी बनवणं. प्रत्येक फराळाला लागणारे जिन्नस रेसिपीनुसार बदलत असतात यामुळे फराळाच्या पदार्थाचे नाव आणि त्याला लागणारे साहित्य अशी एक यादी करुन घ्यावी.
२. साखर आणि वेलची पूड :- फराळाला चव आणणारा आणि खमंग सुवास देणारा पदार्थ म्हणजे साखर आणि वेलची. त्यामुळे जास्तीची साखर आणि पिठीसाखर घेऊन ठेवा. यासोबतच वेलदोडे हलकेच गरम करून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे.
३. सुकं खोबरं :- बऱ्याच फराळाच्या पदार्थांमध्ये सुकं खोबरं वापरलं जात. सुकं खोबरं किसून ते छान भाजून घ्या. त्यानंतर हवाबंद डब्यांत भाजलेलं सुकं खोबरं भरुन ठेवून द्या. त्यामुळे ते जास्त काळासाठी टिकते यामुळे तुम्हाला हवे तेव्हा सुकं खोबरं लगेच वापरता येते.
केशर पदार्थात घालताना तुम्हीही हमखास करताय ‘ही’ चूक, महागडं केशर वापरुनही रंग-स्वाद गायब कारण...
४. डाळी भाजून घ्या :- फराळाचे वेगवेगळे पदार्थ तयार करण्यासाठी अनेक प्रकारची पीठ लागतात. ही पीठ तयार करून घ्यावी म्हणजे आयत्यावेळी फराळ करताना गडबड - गोंधळ उडत नाही. यासाठी लागणाऱ्या डाळी भाजून त्याची पीठ करून घ्यावीत.
५. तेल - तूप खरेदी :- तळणीपासून ते लाडू वळण्यापर्यंत अनेक पदार्थांसाठी आपण तूप वापरतो. त्यामुळे तुपाच्या जास्तीच्या पिशव्या आणून ठेवा किंवा घरचे तूप वापरणार असाल तर तूप आधीच काढून बरणीत भरुन ठेवावे. यासोबतच तेल देखील वापरले जाते यासाठी जास्तीचे तेल आणून ठेवावे.
६. चकलीची भाजणी :- चकलीची भाजणी बनवून घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवावी.
७. चिवडा बनवण्यासाठी :- चिवडा करण्यासाठी शेंगदाणे भाजून साले काढून ठेवावीत. सुक्या खोबऱ्याचे पातळ काप करून ठेवावेत. चिवड्याचा मसाला बनवून ठेवावा.
८. ड्रायफ्रुट :- काजू-बदामचे पातळ काप करून ठेवावे. लाडू बनवण्यासाठी थोडे कुटून ठेवावेत.
मखाणे खा ७ फ्लेवर्सचे, आजच्या काळातले सूपरफूड देईल तुम्हाला सुपरपॉवर, लहान मुलेही होतील गुटगुटीत!
९. बेसन : - चण्याची डाळ आणून तिला चांगले ऊन दाखवून डाळ दळून आणून बेसन घट्ट झाकणाच्या डब्यात ठेवावे.
१०. करंजीचे सारण : - नारळ खोवून करंजीचे सारण आधल्या दिवशीच बनवून ठेवावे.