Join us  

शनिवार - रविवारची सुटी म्हणून सगळा फराळ एकाचवेळी करता ? ९ टिप्स - फराळ होईल सुटसुटीत - बिघडणारही नाही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2023 7:00 PM

Diwali Faral Preperation Cooking tips Kitchen hacks : वीकेंडचे निमित्त साधून एकाचवेळी अनेक फराळाचे पदार्थ बनवणार असाल, तर त्यासाठी लागणारी बेसिक तयारी आधीच करुन ठेवा...

दिवाळी आता अवघ्या काही दिवसांवरच आली आहे. दिवाळीनिमित्त तयार केल्या जाणाऱ्या फराळाची लगबग आता प्रत्येक घरात सुरु असेलच. घरातील प्रत्येक गृहिणी आता फराळ बनवण्याच्या तयारीला लागली असेलच. रोजची काम, स्वयंपाक, घरातलं आवरुन फराळ बनवण्यासाठी थोडा वेळ राखून ठेवला जातो. काही महिला या वर्किंग वुमन असल्यामुळे त्यांना फराळ करण्यासाठी पुरेसा वेळ नसतो. त्यामुळे आजकाल फराळातील काही मोजकेच पदार्थ घरी बनवले जातात व बाकीचा फराळ विकत आणला जातो. याबरोबरच काही गृहिणी विकेंडचे निमित्त साधून एकाचवेळी फराळाचे एकदम दोन ते तीन पदार्थ बनवण्याचे नियोजन आखतात(Diwali Faral Preperation Cooking tips Kitchen hacks).

फराळ बनवताना एखादा पदार्थ फसला तर फराळ करण्यासाठी जो घाट घातला जातो, तो वाया जातो. एवढेच नाही तर वेळ, मेहनत सगळेच व्यर्थ गेल्याने मनस्तापही भरपूर होतो. अशा प्रसंगी गृहिणींची फार चीड - चीड होते. असे होऊ नये म्हणून जर आपण सुद्धा येत्या विकेंडचे निमित्त साधून एकाचवेळी अनेक फराळाचे पदार्थ बनवणार असाल, तर त्यासाठी लागणारी बेसिक तयारी आधीच करुन ठेवा. जर फराळाचे दोन ते तीन पदार्थ एकाचवेळी बनवणार असाल तर गडबड - गोंधळ (Time saving kitchen tips) उडू नये म्हणून त्यासाठी लागणारी तयारी आधीच केली पाहिजे. अशी बेसिक तयारी आधीच करुन ठेवली तर फराळाचे पदार्थ झटपट बनून तयार होतात. फराळ बनवण्यासाठी बेसिक तयारी नेमकी काय व कशी करावी यासाठी काही खास टिप्स. 

फराळ बनवण्यासाठी बेसिक तयारी नेमकी कशी करावी ?

दिवाळीच्या फराळाची तयारी आगोदरच करावी म्हणजे आयत्यावेळी काही गडबड होत नाही. आपल्याला फराळाचे कोणते पदार्थ बनवायचे आहेत व त्यासाठी कोणकोणते जिन्नस लागणार आहेत याची आधीच यादी करावी व त्याप्रमाणे जिन्नस आणून ठेवावेत.

१. वेलचीपूड : वेलदोडे आणून तवा गरम करून वेलदोडे थोडेसे गरम करून घेवून साखर घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे. मग पूड घट्ट झाकणाच्या डब्यात ठेवावी व फराळ जेव्हा बनवायचा तेव्हा वेलचीपूड वापरावी म्हणजे त्याच्या सुवास तसाच राहील.

२. बेसन : चण्याची डाळ आणून तिला चांगले ऊन दाखवून डाळ दळून आणून बेसन घट्ट झाकणाच्या डब्यात ठेवावे.

३. करंजीचे सारण : नारळ खोवून करंजीचे सारण आधल्या दिवशीच बनवून ठेवावे.

दिवाळीत भेट म्हणून महागडे ड्रायफ्रूट्स पॅक भेट देता ? खरेदी करताना ५ गोष्टी तपासा - फसवणूक टाळा...

चकली भाजणी करण्याचे हे घ्या परफेक्ट प्रमाण ! चकली चुकूनही बिघडणार नाही, फसणार नाही...

४. चकलीची भाजणी : चकलीची भाजणी बनवून घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवावी.

५. चिवडा बनवण्यासाठी : चिवडा करण्यासाठी शेंगदाणे भाजून साले काढून ठेवावीत. सुक्या खोबऱ्याचे पातळ काप करून ठेवावेत. चिवड्याचा मसाला बनवून ठेवावा.

६. पिठीसाखर : लाडू बनवण्यासाठी साखर बारीक करून ठेवावी.

दाणेदार - रवाळ तोंडात टाकताच विरघळणारे बेसन लाडू बनवण्यासाठी ९ टिप्स, लाडू होतील परफेक्ट...

७. ड्रायफ्रुट : काजू-बदामचे पातळ काप करून ठेवावे. लाडू बनवण्यासाठी थोडे कुटून ठेवावेत.

८. अनारसे : अनारसे बनवण्यासाठी आगोदरच अनारस्याचे पीठ बनवून ठेवावे.

९. इतर साहित्य : पोहे, रवा, मैदा, पिठीसाखर ताजी आणून वापरावी.

दिवाळीसाठी यंदा घरीच करा बाकरवडी, झटपट रेसिपी - फराळाचा करा खास वेगळा खुसखुशीत पदार्थ...

टॅग्स :दिवाळी 2023अन्नपाककृतीकिचन टिप्स