Lokmat Sakhi >Food > पातळ पोह्यांचा चिवडा करण्याची खमंग रेसिपी, चिवडा होईल कुरकुरीत-पावसाळी हवेतही सादळणार नाही

पातळ पोह्यांचा चिवडा करण्याची खमंग रेसिपी, चिवडा होईल कुरकुरीत-पावसाळी हवेतही सादळणार नाही

Diwali Faral  Recipe : चिवड्याशिवाय दिवाळीचं फराळ अपूर्ण आहे. पोह्यांचा चिवडा हा असा पदार्थ आहे जो अगदी कमीत कमी साहित्यात तयार होतो आणि हा चिवडा करायला वेळही कमी लागतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 01:50 PM2024-10-22T13:50:13+5:302024-10-22T14:45:26+5:30

Diwali Faral  Recipe : चिवड्याशिवाय दिवाळीचं फराळ अपूर्ण आहे. पोह्यांचा चिवडा हा असा पदार्थ आहे जो अगदी कमीत कमी साहित्यात तयार होतो आणि हा चिवडा करायला वेळही कमी लागतो.

Diwali Faral  Recipe : How To Make Patal Pohe Chivda At Home Poha Chivda Recipe | पातळ पोह्यांचा चिवडा करण्याची खमंग रेसिपी, चिवडा होईल कुरकुरीत-पावसाळी हवेतही सादळणार नाही

पातळ पोह्यांचा चिवडा करण्याची खमंग रेसिपी, चिवडा होईल कुरकुरीत-पावसाळी हवेतही सादळणार नाही

दिवाळी (Diwali 2024) म्हटलं की फराळ आलंच. दिवाळीतही मनभरून फराळ खाण्यात काहीजण काचकूच करतात. कारण ते गोड, तेलकट पदार्थ खाऊन वजन वाढेल असं त्याचं म्हणणं असतं (Diwali Faral Recipe). कमी तेलात आणि पौष्टीक पदार्थ वापरून तुम्ही दिवाळीचं फराळ बनवू शकता (Chivda Recipe In Marathi) चिवड्याशिवाय दिवाळीचं फराळ अपूर्ण आहे. पोह्यांचा चिवडा हा असा पदार्थ आहे जो अगदी कमीत कमी साहित्यात तयार होतो आणि हा चिवडा करायला वेळही कमी लागतो. तेल, मसाले यांचा कमीत कमी वापर करून हा चिवडा बनवला जातो ज्यामुळे पोह्याचा  चिवडा अधिकच हेल्दी बनतो. (How To Make Poha Chivda At Home)

पोह्याचा चिवडा करण्यासाठी लागणारं साहित्य (Poha Chivda Recipe)

१) पातळ पोहे - अर्धा किलो

२) शेंगदाणे- १ वाटी

३) सुकं नारळं- अर्धी वाटी

४) काजू, बदाम- अर्धी वाटी

५) भाजलेली चणा डाळ- अर्धी वाटी

६) कढीपत्ता - १० ते १२

७) हिरवी मिरची- २ ते ४

८) हळद - अर्धा चमचा

९) चाट मसाला - १ चमचा

१०) साखर - १ चमचा

११) मीठ- चवीनुसार

१२) तेल- गरजेनुसार

१३) चिवडा मसाला-  २ ते ३ चमचे

पोह्याचा चिवडा करण्याची खास रेसिपी (How To Make Poha Chivda)

1) पोहे गाळणीत घालून व्यवस्थित चाळून घ्या. कढईत पोहे कडक होईपर्यंत भाजून घ्या. नंतर पोहे कोणतीही मोठी परात किंवा एका ताटात काढून घ्या.

जेवण कमी केलं-बंदच केलं तरी वजन घटत नाही? ‘या’ डाळीचं पाणी प्या-वजन उतरेल झरझर

2) कढईत तेल घालून त्यात काजू, बदाम तळून घ्या. नंतर शेंगदाणे तळून घ्या. शेंगदाणे तळताना काळे होणार नाहीत याची काळजी घ्या.

3) त्याच कढईत चण्याची  डाळ, खोबऱ्याचे स्लाईस हलक्या आचेवर गोल्डन होईपर्यंत तळून घ्या. तिन्ही वस्तू कुरकुरीत झाल्या की त्यात मोहोरी, चिरलेल्या मिरच्या, कढीपत्ता आणि सुके मसाले घालून मिसळा आणि हे मसाले पोह्यात घालून हलक्या हातानं मिसळा.

हाडं कमजोर झाली? पोकळ हाडांना कॅल्शियम देतात इवल्याश्या बिया; चमचाभर खा-निरोगी राहा

4) सगळे तळलेले पदार्थ, भाजलेले पोहे एका भांड्यात काढा त्यावर चिवडा मसाला किंवा घरात उपलब्ध असणारे मसाले अंदाजे घालून एकत्र करा. तयार आहे कुरकुरीत, खमंग चिवडा.

Web Title: Diwali Faral  Recipe : How To Make Patal Pohe Chivda At Home Poha Chivda Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.