दिवाळीसाठी (Diwali 2023) फराळ करणार नाही असं एकही घर सापडणार नाही. दिवाळीच्या फराळाचे पदार्थ बाहेरून आणले जात असले चिवडा मात्र घरीच बनवला जातो. (Perfect Makai Chivda Recipe) करायला सोपा- खायला कुरकुरीत चिवडा प्रत्येकालाच आवडतो. (Cornflakes Mixture Recipe) काहीजण पोह्याचा चिवडा करतात तर काहीजण मक्याचा. पण मक्याचा चिवडा कधी आकसतो तर कधी मऊ पडतो. परफेक्ट मक्याचा चिवडा करण्याची सोपी रेसिपी पाहूया. (How to Make Perfect Makai Chivda)
मक्याचा चिवडा करण्याची सोपी रेसिपी (Makai Chivda Making Steps)
१) सगळ्यात आधी एक कढईत तेल गरम करून त्यात शेंगदाणे तळून घ्या. तुम्ही शेंगदाणे जास्त तेलात न तळता हलके रोस्ट करू शकता. दुसरीकडे हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्या आणि कढीपत्त्याची पानं घ्या. खोबऱ्याचे पातळ काप करून घ्या, खारट बुंदीसुद्धा घ्या.
२) चिवड्याचा मसाला तयार करण्यासाठी एक चमचा काश्मिरील लाल तिखट, १ चमचा चाट मसाला, १ चमचा धणे पावडर, १ चमचा आमचूर पावडर, १ चमचा मीठ, १ चमचा हळद एकत्र करून ठेवून द्या. शेंगदाणे कुरकरीत झाल्यानंतर त्यात १ चमचा हा मसाला घालून एकजीव करा.
१ किलो भाजणीची चकली- कुरकुरीत, काटेरी चकलीसाठी पिठात 'हा' पदार्थ मिसळा; परफेक्ट बनेल
३) तेलात मक्याचे फ्लेक्स तळून घ्या. मग एका जाळीच्या चमच्याने काढून घ्या. जेणेकरून त्यातलं एक्स्ट्रा तेल निघून जाईल. गरमागरम मक्याचे पोहे भाजून एका गाळणीत ठेवून द्या. त्यात चमचाभर मसाला घालून एकजीव करून घ्या.
१५ मिनिटांत बनेल १ किलो मुरमुऱ्याचा चिवडा, जराही मऊ होणार नाही-घरीच जमेल परफेक्ट खमंग चिवडा
४) त्याच तेलात खोबऱ्याचे काप तळून घ्या. खोपऱ्याचे काप लाल झाले की लगेच काढा नाहीतर ते करपण्याची शक्यता असते. तळलेल्या मक्याच्या चिवड्यात खोबऱ्याचे काप, तळलेले शेंगदाणे आणि खारट बूंदी मिसळा. आवडीनुसार तुम्ही यात बारीक शेव, जाड शेव किंवा फरसाण घालू शकता.
५) कढईत ३ ते ४ चमचे तेल घालून २ चमचे बडीशेप, १ चमचा धणे, १ चमचा बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कढीपत्ते घालून परतून घ्या. मक्याच्या चिवड्यात १०० ग्राम पिठीसाखर घालून चमच्याच्या साहाय्याने एकजीव करा. मग त्यात परतून घेतलेले पदार्थ घाला आणि हाताने व्यवस्थित एकजीव करा. तयार आहे कुरकुरीत, खमंग मक्याचा चिवडा.