दिवाळीत सतत गोड, गोड खाऊन कंटाळा आला की काहीतरी चटपटीत खावंस वाटतं. (Diwali faral Recipe) अशावेळी तुम्ही खारट शंकरपाळ्या म्हणजेजच जीरा शंकरपाळ्या खाऊन फराळाचा आनंद घेऊ शकता. जीरा शंकरपाळे हलकेफुलके आणि चवीला भन्नाट असतात. (Namkeen Shankarpali Kaise Banate Hai) मध्यल्या वेळेत भूक लागल्यानंतर खाण्यासाठी किंवा चहाबरोबर खाण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. जीरा शंकरपाळे बनवण्याची सोपी रेसिपी पाहूया. (Namkeen Shankarpali Recipe in Marathi)
खारे शंकरपाळे कसे बनवावेत? (Khare Shankarpali Recipe)
१) सगळ्यात आधी एका भांड्यात २ कप म्हणजे २५० ग्राम मैदा घ्या. चवीनुसार मीठ, २ ते ३ चमचे तीळ, दीड चमचे कलौंजी (काळ्या बीया), बारीक केलेली साखर दीड चमचा, २ ते ३ चमचे जीरं हे साहित्य मैद्यात मिसळून घ्या. त्यात तेलाचे कडकडीत मोहन घाला. (Diwali Faral Recipe in Marathi)
१ किलो भाजणीची चकली- कुरकुरीत, काटेरी चकलीसाठी पिठात 'हा' पदार्थ मिसळा; परफेक्ट बनेल
२) मोहन गरम असल्यामुळे थेट हाताने पीठ एकजीव करायला सुरूवात केल्यास चटका लागण्याची भिती असते. हे टाळण्यासाठी चमच्याच्या साहाय्याने पीठ कालवून घ्या. नंतर हाताने पीठ एकजीव करून त्यात गरजेनुसार पाणी घालून पीठ मळून घ्या. हे पीठ जास्त सैल किंवा घट्ट मळू नका. अन्यथा शंकरपाळ्या तेलात व्यवस्थित फुलणार नाहीत.
३) पीठ मळून झाल्यानंतर तेलाचा हात लावून पुन्हा एकदा मळून घ्या. नंतर २० मिनिटांसाठी पीठ झाकून ठेवून द्या. चपातीच्या पीठाप्रमाणे या पीठाचे गोळे करून घ्या. एक एक गोळा पुन्हा मळून त्याची बारीक पोळी लाटून घ्या पोळी एकदम जाड किंवा पातळ लाटू नका.
जेवणाबरोबर खायला करा खमंग सुरणाचे काप; सोपी परफेक्ट रेसिपी, साध्या जेवणाचीही वाढेल चव
४) मध्यम आकाराची पोळी लाटून त्यावर कटर किंवा सुरी फिरवून घ्या आणि शंकरपाळ्यांचे चौकोन काप करून घ्या. शंकरपाळ्यांचे काप एका ताटात काढून घ्या. कढईत तेल गरम करायला ठेवा. तेल गरम झाले की शंकरपाळे डीप फ्राय करून घ्या.
१५ मिनिटांत बनेल १ किलो मुरमुऱ्याचा चिवडा, जराही मऊ होणार नाही-घरीच जमेल परफेक्ट खमंग चिवडा
५) तेल गरम झालं की एकामागोमाग एक कढईत मावतील इतके शंकरपाळे घालून गोल्डन होईपर्यंत तळून घ्या शंकरपाळे तळताना सुरूवातीला गॅस उच्च आचेवर ठेवून नंतर मंच आचेवर असू द्या अन्यथा शंकरपाळे जळण्याची शक्यता असते. तळलेले शंकरपाळे एका पेपरवर काढून घ्या. जेणेकरून त्यातील एक्स्ट्रा तेल निघून जाईल. नंतर हे शंकरपाळे हबाबंद डब्यात ठेवून द्या.