Join us  

१ वाटी ज्वारीच्या पीठाच्या करा खमंग-काटेरी चकल्या; कमी साहित्यात-झटपट बनेल परफेक्ट चकली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2023 12:06 PM

Jwarichya Pithachi Chakli Recipe (Jwarichya Pithachi Chakli Kashi Karaychi) : ज्वारीच्या चकल्या कशा कराव्यात याची सोपी रेसिपी पाहूया. ज्वारीची चकली पौष्टीक आणि खायलाही तितकीच उत्तम लागते.

दिवाळीत चकल्या खायला सर्वांनाच आवडते. कोणी भाजणीच्या चकल्या करते तर कोणी गव्हाच्या. चकली कधी कडक होते, कधी जास्त मऊ पडते. (How to Make Jowar Flour Chakli) परफेक्ट चकली बनवण्याच्या सोप्या टिप्स तुमचं काम अधिक सोपं करू शकता. ज्वारीच्या चकल्या कशा कराव्यात याची सोपी रेसिपी पाहूया. ज्वारीची चकली पौष्टीक आणि खायलाही तितकीच उत्तम लागते (Jwarichya Pithachi Chakli Recipe in Marathi)

ज्वारीची चकली कशी करायची? (How to make Jwari Chakali at Home)

1) सगळ्यात आधी एक परात किंवा कुकरचं भाडं घ्या. त्यात कॉटनचे एक कापड घालून त्यावर ३ वाटी ज्वारीचे पीठ घाला. सुती कापडाची घट्ट  गाठ बांधून घ्या.

2) कुकरच्या भांड्यात हे झाकण ठेवून झाकून ठेवा. कुकरमध्ये पाणी घालून त्यावर रिंग ठेवून त्यात कुकरचे भांडे ठेवा त्यावर झाकण ठेवायला विसरू नका. कुकर गरम झाल्यानंतर झाकण लावून घ्या.  मध्यम आचेवर कुकरच्या ३ शिट्ट्या काढून घ्या.  ज्वारीचे पीठ वाफवून घ्या. 

भरपूर पुडाचे, बिस्किटासारखे खुसखुशीत शंकरपाळे करण्याची परफेक्ट रेसिपी-तोंडात टाकताच विरघळतील

3) वाफवलेलं ज्वारीचे पीठ चाळून घ्या. पीठाच्या तयार झालेल्या गाठी  हाताने चाळून घ्या. यात १ चमचा धणे जीरं पावडर,  अडीच चमचे लाल तिखट, ५ चमचे तीळ, चवीनुसार मीठ, १ चमचा ओवा, अर्धा चमचा हळद घाला हे सर्व जिन्नस पीठात व्यवस्थित एकत्र करून घ्या. 

पोह्याचा चिवडा ना मऊ पडणार, ना आकसणार; चटकदार पातळ पोहा चिवड्याची सोपी रेसिपी

4) ज्या वाटीने पीठ मोजलं त्याच वाटीने अडीच वाटी पाणी घालून घ्या. हे पाणी गरम करून घ्या. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करा आणि थोडंथोडं पाणी घालून पीठ छान मळून घ्या.  पाणी घातल्यानंतर पीठ फार गरम लागेल म्हणून थेट हाताने न मळता चमच्याच्या साहाय्याने पीठ एकजीव करा. पीठ सैल झालं तर चकली काटेरी होणार नाही म्हणून जास्त सैल न ठेवता मऊ पीठ मळा.  भाकरी करताना पीठ रगडून मळले जाते तसेच हे पीठ मळून घ्या. 

5) मळून घेतलेल्या पीठामधून थोडं पीठ घेऊन चकलीच्या सोऱ्यामध्ये भरून घ्या. सोऱ्याचे झाकणही घट्ट लावून घ्या. एका ताटात किंवा पेपरवर पाडून घ्या. चकलीचे शेवटचे टोक व्यवस्थित दाबून घ्या. उकळत्या पाण्यात चकलीचे पीठ मळल्यामुळे  चकली साच्यातून खाली पाडताना तुटत नाही. याच पद्धतीने उरलेल्या पीठाच्याही चकल्या पाडून घ्या.

जेवणाबरोबर खायला करा खमंग सुरणाचे काप; सोपी परफेक्ट रेसिपी, साध्या जेवणाचीही वाढेल चव

5) कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा. तेल कडकडीत गरम झालं की त्यात चकल्या घाला. एकावेळी ४ ते ५ चकल्या तुम्ही घालू शकता. चकलीवरचे बुडबुडे कमी झाले की मंच आचेवर चकली तळून घ्या. जेणेकरून जास्तवेळ कुरकुरीत राहील. चकली तळून झाल्यानंतर एका परातीत काढून घ्या. तयार आहे कुरकुरी खमंग ज्वारीची चकली 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सदिवाळी 2023