Lokmat Sakhi >Food > भाजक्या पोह्यांच्या चटकदार चिवड्याची सोपी रेसिपी; कमी तेलात-कमी मसाल्यात खमंग करा चिवडा

भाजक्या पोह्यांच्या चटकदार चिवड्याची सोपी रेसिपी; कमी तेलात-कमी मसाल्यात खमंग करा चिवडा

Diwali Faral Special Bhajake Pohe Chivda Recipe : हा पदार्थ कमी कॅलरीजयुक्त असल्यामुळे तुम्ही पोटभर खाऊ शकता. 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2023 01:23 PM2023-11-11T13:23:25+5:302023-11-11T22:45:52+5:30

Diwali Faral Special Bhajake Pohe Chivda Recipe : हा पदार्थ कमी कॅलरीजयुक्त असल्यामुळे तुम्ही पोटभर खाऊ शकता. 

Diwali Faral Special Bhajake Pohe Chivda Recipe : Bhajkya Pohyancha Chivda Recipe in Marathi | भाजक्या पोह्यांच्या चटकदार चिवड्याची सोपी रेसिपी; कमी तेलात-कमी मसाल्यात खमंग करा चिवडा

भाजक्या पोह्यांच्या चटकदार चिवड्याची सोपी रेसिपी; कमी तेलात-कमी मसाल्यात खमंग करा चिवडा

दिवाळी (Diwali 2023) म्हटलं की लाडू, चिवडा, चकली हे पदार्थ आलेच. चिवडा करायला सोपा आणि खायला चटपटीत असल्यामुळे सगळेजण घरी चिवडा बनवतात. (Bhajake Poha Chivda) चिवडा कुरकुरीत, खमंग होण्यासाठी काही सोप्या टिप्स लक्षात ठेवल्या तर अधिकच चव चांगली लागते. भाजक्या पोह्यांचा चिवडा बनवण्याची सोपी रेसिपी पाहूया. (How To Make Bhajke Poha Chivda At Home) हा पदार्थ कमी कॅलरीजयुक्त असल्यामुळे तुम्ही पोटभर खाऊ शकता. 

१) भाजक्या पोह्यांचा चिवडा बनवण्यासाठी १ किलो भाजके पोहे चाळून स्वच्छ करून घ्या.  हे पोहे आधीच भाजलेले किंवा तळलेले असतात.  म्हणूनच त्यांना पुन्हा भाजण्याची किंवा तळण्याची आवश्यकता नसते.  गॅसवर एक कढईत ठेवून त्यात तळण्यासाठी तेल काढून घ्या. तेल गरम झाले की मंच आचेवर शेंगदाणे तळून घ्या. शेंगदाणे छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतले की पोह्यावर घाला.  

१ वाटी डाळ-तांदूळाचा करा विकतसारखा जाळीदार ढोकळा; जीभेवर ठेवताच विरघळेल-सोपी रेसिपी

२) त्यानंतर तेलात भाजलेली चण्याची डाळ जी प्रत्येक चिवड्यात वापरली जाते ती तळून घ्या. आधीच भाजलेली असल्यामुळे ही डाळ तळायला जास्त वेळ लागत नाही. याच तेलात १ वाटी सुक्या खोबऱ्याचे पातळ काप तळून घ्या.  तेल गरम असल्यामुळे खोबरं तळताना अधिक लक्ष द्या अन्यथा खोबऱ्याचे तुकडे जळू शकतात किंवा लाल होतात. तळलेले सुके खोबरे भाजक्या पोह्यांवर काढून घ्या.  नंतर काजूचे तुकडे तळून घ्या मग त्यात १० ते १२ बदाम घालून हलका सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. मग मनूके तेलात तळण्यासाठी घाला. 

१ वाटी ज्वारीच्या पीठाच्या करा खमंग-काटेरी चकल्या; कमी साहित्यात-झटपट बनेल परफेक्ट चकली

३) त्यानंतर लसणाच्या पाकळ्या लालसर होईपर्यंत फ्राय करा. तळलेला लसूण भाजक्या पोह्यांवर घाला. कढीपत्त्याची पानं तळून घेतल्यानंतर पोह्यावर घाला. सर्व तळलेले साहित्य भाजक्या पोह्यांवर घातल्यानंतर  त्यात १ चमचा कश्मिरी लाल तिखट पावडर, अर्धा चमचा हिंग, अर्धा चमचा गरम मसाला, ४ चमचे चिवडा मसाला, १ चमचा हळद घाला.

४) कडकडीत गरम तेलात ८ ते ९ चमचे तेल गरम करायला ठेवा. त्यात दोन चमचे मोहोरी, दोन चमचे जीरं, दोन चमचे बडीशेप घालून फोडणी तयार करा. गॅस बंद करून त्यात वरील सर्व मसाले घाला. तर तुम्ही  हे मसाले गॅस सुरू असताना घातले तर पदार्थ जळण्याची शक्यता असते. चवीनुसार मीठ आणि ५ ते ६ चमचे पीठी साखर लगेच त्यात घाला. हे सर्व पदार्थ व्यवस्थित एकजीव करून घ्या. अशी फोडणी घातल्यामुळे चिवडा अधिकच चवदार लागतो. 

Web Title: Diwali Faral Special Bhajake Pohe Chivda Recipe : Bhajkya Pohyancha Chivda Recipe in Marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.