Lokmat Sakhi >Food > सणसमारंभाला विड्याचं पान नेहमीचंच, दिवाळीत करा झकास पान शॉट, घ्या सोपी रेसिपी - पाहुणेही खुश

सणसमारंभाला विड्याचं पान नेहमीचंच, दिवाळीत करा झकास पान शॉट, घ्या सोपी रेसिपी - पाहुणेही खुश

Food And Recipe: विड्याचं पान तर आपण नेहमीच खातो. आता यंदा दिवाळीत पाहुण्यांसाठी पान शॉट करा (How to make paan shot at home).... 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2023 09:05 AM2023-11-15T09:05:32+5:302023-11-15T09:10:01+5:30

Food And Recipe: विड्याचं पान तर आपण नेहमीच खातो. आता यंदा दिवाळीत पाहुण्यांसाठी पान शॉट करा (How to make paan shot at home).... 

Diwali Food, How to make paan shot at home, easy and quick recipe of making paan shot | सणसमारंभाला विड्याचं पान नेहमीचंच, दिवाळीत करा झकास पान शॉट, घ्या सोपी रेसिपी - पाहुणेही खुश

सणसमारंभाला विड्याचं पान नेहमीचंच, दिवाळीत करा झकास पान शॉट, घ्या सोपी रेसिपी - पाहुणेही खुश

Highlights'पान शॉट' घरी करणंही अगदी सोपं आहे. बघा पान शॉट करण्याची ही सोपी रेसिपी

फळांचा अर्क एका छोट्या ग्लासमध्ये भरायचा आणि तो खवय्यांना द्यायचा.. हा असा 'शॉट' प्रकार सध्या प्रचंड ट्रेण्डी आहे. वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये अनेक वेगवेगळे 'शॉट्स' मिळतात. त्यात जांभळांचा 'जामून शॉट' सगळ्यात हिट आहे. आता 'पान शॉट' हा प्रकारही झपाट्याने लोकप्रिय होत आहे. अनेक हॉटेल्समध्ये जेवण झाल्यानंतर ग्राहकांना 'पान शॉट' कॅम्प्लिमेंट्री म्हणून देतात. वेगळा नविन प्रकार असल्याने ग्राहकही खूश होतात. 'पान शॉट' घरी करणंही अगदी सोपं आहे. त्यामुळे यंदा दिवाळीत (Diwali Food) घरी जेवायला आलेल्या पाहुण्यांना पान शॉट देऊन खुश करून टाका (How to make paan shot at home). बघा पान शॉट करण्याची ही सोपी रेसिपी (easy and quick recipe of making paan shot)...

 

पान शॉट करण्याची रेसिपी
ही रेसिपी foodbbelly या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.

साहित्य

विड्याची ४ पाने

फक्त अर्ध्या तासात करा विकतसारखी चवदार काजूकतली, फराळ खाऊन कंटाळलेलेही मागतील पुन्हा पुन्हा

१ टीस्पून बडिशेप

अर्धा टी स्पून वेलची पावडर

व्हॅनिला आईस्क्रिम २ स्कूप

२ टेबलस्पून गुलकंद

४ ते ५ आईस क्यूब

कृती

 

१. सगळ्यात आधी विड्याची पानं स्वच्छ धुवून, पुसून कोरडी करून घ्या आणि त्यांची देठं काढून टाका.

२. यानंतर पानांचे तुकडे करा आणि ते मिक्सरच्या भांड्यात टाका.

दारासमोर पणतीची रांगोळी काढायची? बघा एकापेक्षा एक सुंदर ७ डिझाईन्स, काढा सुबक- सुंदर पणती

३. त्यासोबतच त्यात गुलकंद, आईसक्यूब, आईस्क्रिम, बडिशेप, वेलची पावडर असं सगळं टाका.

४. सगळं मिश्रण एकत्रितपणे मिक्सरमधून फिरवून घ्या. झाला पान शॉट तयार.

५. काही मिक्सरमध्ये ओले आणि सुके पदार्थ एकत्र टाकले तर सुके पदार्थ व्यवस्थित बारीक होत नाहीत. तुमच्याही मिक्सरचा हा प्रॉब्लेम असेल तर बडिशेपची आगोदर पावडर करून घ्या आणि त्यानंतर इतर पदार्थ टाकून सगळं एकत्र फिरवा.

 

 

Web Title: Diwali Food, How to make paan shot at home, easy and quick recipe of making paan shot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.