भाऊबीजेला सगळ्यांच्या घरी पाहुण्याची लगबग असते. अशावेळी कमी वेळात काय स्वयंपाक करावा हे कळत नाही. फराळ करून आधीच दमछाक झालेली असते. दुपारच्या जेवणाला झटपट तयार होतील असे सोपे पदार्थ या लेखात पाहूया. (Bhaidooj and Dipawali padwa menu) गरमागरम मसालेभात केल्यास तुम्हाला पुरी किंवा चपात्या बनवण्याची गरजही वाटणार नाही.
मसालेभात
साहित्य
२ ते अडीच वाटी तांदूळ, २ ग्लास पाणी, 1 वाटी वटाणे, २ चिरलेल्या बटाट्याच्या फोडी, १ चिरलेला कांदा, १ फूलकोबी,लसणाची पेस्ट, कडीपत्ता, २ ते ३ हिरव्या मिरच्या, लाल तिखट, हळद, मीठ तमालपत्र, फोडणीसाठी तेल.
कृती
सगळ्यात आधी तांदुळ स्वच्छ धुवून घ्या आणि तांदळाच्या दीडपट पाणी उकळून घ्या.
बाकीचे सर्व साहित्य कापून तयार ठेवा.
कुकरमध्ये फोडणीसाठी तेल गरम करा, तेल गरम झालं की त्यात जिर,मोहरी कांदा, कडीपत्ता आणि तमालपत्र परतून घ्या.
वटाणे, बटाटे, कापलेल्या सर्व भाज्या घाला. नंतर त्यात चवीनुसार तिखट, मीठ, हळद, जिरपुड, धणेपूड घालुन भाज्या मिक्स करा.
आपल्या आवडप्रमाणे यात गाजर, सिमला मिरची, टोमॅटो घालू शकता.
नंतर तांदूळ घालून एकजीव करा व गरम पाणी घाला आणि परत मिक्स करा. एक उकळी येऊ द्या व झाकण ठेवून एक वाफ काढा.कुकरचं झाकण बंद करून ३ ते ३ शिट्ट्या होऊ द्या. कुकुर थंड झाल्यानतंर झाकण उघडा तयार आहे मसाले भात...
बासुंदी
कोथिंबीर वडी
बटाटे वडे