Lokmat Sakhi >Food > Diwali Special Besan Laddu Recipe : बेसन भाजताना ही खास ट्रिक वापरा; बेसनाचे लाडू होतील एकदम परफेक्ट

Diwali Special Besan Laddu Recipe : बेसन भाजताना ही खास ट्रिक वापरा; बेसनाचे लाडू होतील एकदम परफेक्ट

Diwali Special Besan Laddu Recipe : बेसनाचे लाडू कधी कडवट लागतात तर कधी  जीभेला चिकटतात. परफेक्ट बेसनाचे लाडू बनवणं सर्वांनाच जमतं असं नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2022 06:21 PM2022-10-21T18:21:04+5:302022-10-21T19:16:59+5:30

Diwali Special Besan Laddu Recipe : बेसनाचे लाडू कधी कडवट लागतात तर कधी  जीभेला चिकटतात. परफेक्ट बेसनाचे लाडू बनवणं सर्वांनाच जमतं असं नाही.

Diwali Special Besan Laddu Recipe : How make perfect besan laddu avoid these mistakes while making besan ladoo | Diwali Special Besan Laddu Recipe : बेसन भाजताना ही खास ट्रिक वापरा; बेसनाचे लाडू होतील एकदम परफेक्ट

Diwali Special Besan Laddu Recipe : बेसन भाजताना ही खास ट्रिक वापरा; बेसनाचे लाडू होतील एकदम परफेक्ट

दिवाळीला (Diwali 2022)  सगळेचजण आपापल्या घरी फराळाचे पदार्थ बनवतात. लाडू, चिवडा, चकली, शंकपाळे या पदार्थांबरोबरच लाडूही बनवले जातात. (How to make besan ladoo)  बेसनाचे लाडू कधी कडवट लागतात तर कधी  जीभेला चिकटतात. परफेक्ट बेसनाचे लाडू बनवणं सर्वांनाच जमतं असं नाही.

फराळ बिघडला किंवा त्यात काही कमी जास्त झालं तर तो इतरांना देतानाही खूप विचार करावा लागतो. बेसनाचा लाडू बनवताना काहीजण कॉमन चुका करतात यामुळे लाडू बिघडतात. म्हणूनच या लेखात लाडू बनवताना कोणत्या चुका टाळायच्या ते पाहूया (How to make perfect besan laddu) 

बेसनाचं पीठ भाजताना या चुका  करू नका

१) बेसनाचे लाडू बनवण्यासाठी सगळ्यात आधी ते व्यवस्थित भाजून घ्या बेसन अनेक स्त्रिया उच्च किंवा मध्यम आचेवर भाजतात पण  ही पद्धत पूर्णपणे चुकीची आहे. 

२)  अनेकदा बेसन नीट भाजलं  जात नाही. व्यवस्थित न भाजलं गेल्यामुळे ते त्वचेला चिकटतं.  बेसनाचं पीठ व्यवस्थित भाजलं जावं यासाठी ते मंद आचेवर भाजावं. 

३) जर तुम्ही  चांगल्या तुपात लाडू बनवत असाल तर सर्व तूप एकाचवेळी टाकू नका. तुम्हाला गरज वाटेल तसे थोडे थोडे बेसन भाजून घ्या आणि थोडं तूप घाला. बेसनाच्या पिठाचा सुगंध यायला लागला की समजायचं त्याचा रंग थोडा हलका तपकिरी झाला आहे. 

४) बेसनाच्या लाडू करण्यासाठी वरून तूप घालू नका. यामुळे लाडूंची चव खराब होऊ शकते.  चर तुम्हाला चांगल्या चवीचे बेसनाचे लाडू खायचे असतील तर बेसन चांगलं भाजून घ्या. त्यात थोडं पाणी शिंपडा बेसन आणखी २ ते ३ मिनिटं परतून घ्या जेणेकरून त्यातलं पाणी व्यवस्थित सुकेल. यामुळे लाडू परफेक्ट व्हायला मदत होईल.

५) तुम्ही साखर पावडर घरी बनवू शकता किंवा पाकही तयार करू शकता. हे करण्यासाठी, आपल्याला एका पॅनमध्ये पाणी आणि साखर शिजवावे लागेल जेव्हा  सिरप तयार होईल त्यातही थोडं तूप मिसळा म्हणजे शुगर सिरपमध्ये गुठळ्या राहणार नाहीत आणि मग थंड होऊ द्या.

Web Title: Diwali Special Besan Laddu Recipe : How make perfect besan laddu avoid these mistakes while making besan ladoo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.