Join us  

१ किलो भाजणीची खमंग चकली कशी करावी? पिठात 'हा' पदार्थ मिसळा; परफेक्ट बनेल चकली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2023 10:41 AM

Diwali Special Chakali Recipe (Chakali bhajani kashi karaychi) : चकलीचे पीठ दळण्यापासून ती तळेपर्यंत कोणकोणत्या  स्टेप्स फॉलो कराव्या लागतील ते पाहूया.

दिवाळी (Diwali 2023)  म्हटली की सगळ्यात आधी डोळ्यासमोर येतं ते म्हणजे फराळ. फराळातील सगळ्यात आवडता कोणता पदार्थ असेल तो म्हणजे चकली. (Bhjani Chakali Recipe) चकलीची भाजणी जर परफेक्ट बनली नाही तर चकली तुटण्याची शक्यता असते किंवा चकली  तेलात व्यवस्थित फुलत नाही.  (Cooking Hacks)

चकली बनवण्याची परफेक्ट पद्धत माहीत असेल घरी बनवलेल्या चकल्या सुद्धा चविष्ट चवदार लागतात. (How to make Perfect Chalali) चकलीचे पीठ दळण्यापासून ती तळेपर्यंत कोणकोणत्या  स्टेप्स फॉलो कराव्या लागतील ते पाहूया. (Diwali Special Bhjani Chakali)

भाजणी चकली करण्याची पद्धत (Bhajani Chakali Recipe)

१) सगळ्यात आधी तांदूळ स्वच्छ धुवून  सुकवून घ्या. ४ ते ५ वाटी भरतील इतका तांदूळ चकलीसाठी तयार ठेवा. एका कढईत हे तांदूळ मॉईश्चर निघेपर्यंत भाजून घ्या. भाजलेले तांदूळ एका ताटात काढून घ्या. 

२) त्याच कढईत १ वाटी चण्याची डाळ पुन्हा भाजून घ्या. कमी गॅसवर डाळी भाजून घ्या.  डाळी भाजल्यानंतर एका ताटात काढून घ्या. नंतर अर्धी वाटी उडीदाची डाळ आणि तांदळाप्रमाणे स्वच्छ धुवून सुकवून घ्या.  ही डाळ मंच आचेवर भाजून घ्या. मग अर्धी वाटी मुगाची डाळ भाजून एका ताटात काढून घ्या. 

१५ मिनिटांत बनेल १ किलो मुरमुऱ्याचा चिवडा, जराही मऊ होणार नाही-घरीच जमेल परफेक्ट खमंग चिवडा

३) एक वाटी स्वच्छ चाळून घेतलेले पोहे भाजून घ्या.  मंच आचेवर पोहे भाजल्यानंतर हाताने चुरून पाहा, पोहे सहज चुरले जात असतील तर समजा पोहे व्यवस्थित भाजले गेले आहेत. नंतर १  चमचा साबुदाणेसुद्धा भाजून घ्या. पाव वाटी कच्चे धणे भाजून घ्या. यामुळे चकली अधिकच स्वादीष्ट लागते. धणे सुद्धा सर्व भाजलेलं साहित्य  ठेवलेल्या ताटात काढून घ्या. 

४) नंतर १ चमचा जीरं भाजून घ्या जीरं जास्त वापरलं तर चकलीला काळपट रंग येऊ शकतो. तयार भाजणीचे साहित्य  एकजीव करून थंड करून घ्या.  थंड झाल्यानंतर हे मिश्रण पिठाच्या गिरणीतून दळून आणा. २ ते ३ वाटी दळलेलं पीठ एका भांड्यात काढून घ्या. 

चकली कडक होईल की वातड-परफेक्ट जमेल ना? भाजणी करताना लक्षात ठेवा ७ टिप्स-कुरकुरीत बनेल चकली

५) ज्या वाटीने तुम्ही तांदूळ मोजले त्याच वाटीने २ वाटी पाणी मोजून गॅसवर पाण्याचे भांडे ठेवा.  यात चवीनुसार मीठ, अर्धा चमचा लाल तिखट, हाताने बारीक केलेला ओवा घाला,  ३ ते ४ चमचे पांढरे तीळ  घाला. तिळाचे प्रमाण कमी जास्त करू शकता. सगळ्यात शेवटी पाव वाटी तेल घाला. 

६) पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस मंद करून त्यात भाजणीचे पीठ घाला.  लाटणी किंवा  मोठ्या चमच्याच्या साहाय्याने पीठ आणि पाणी एकजीव करून घ्या.  पीठ पाण्यात व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर गॅस बंद करा. ८ ते १० मिनिटांनी पीठ एका ताटात काढून ग्लास किंवा वाटीच्या साहाय्याने दाबून घ्या. मग हाताने एकजीव करा. या पद्धतीने हातांना जराही चटके बसणार नाहीत.

७) चकलीच्या साच्याला तेल लावून त्यात हवा शिरायलाही आत जागा नसेल या पद्धतीने पीठ दाबून भरून घ्या. सोरा जास्त उंच किंवा जास्त खाली न धरता मधोमध धरून एका ताटात किंवा पेपरवर चकल्या पाडून घ्या.  चकलीचे सुरूवातीचे आणि शेवटचे टोक  दाबून घ्या जेणेकरून चकली  तेलात  फुटणार नाही.

८)  एका खोलगट कढईत  तेल गरम करून  घ्या. तेल गरम झाल्यानंतर त्यात झाऱ्याच्या मदतीने चकली उचलून घाला आणि कुरकुरीत होईपर्यंत चकली तळून घ्या. तयार आहे कुरकुरीत, खमंग भाजणीची चकली.

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सअन्नदिवाळी 2023पाककृती