Lokmat Sakhi >Food > चीज शंकरपाळे यंदा दिवाळीत करून तर पाहा, पदार्थ असा सरस की दिवाळी यादगार - पाहा रेसिपी...

चीज शंकरपाळे यंदा दिवाळीत करून तर पाहा, पदार्थ असा सरस की दिवाळी यादगार - पाहा रेसिपी...

Diwali Special Cheese Shankarpali : नेहमीच्या त्याच त्या गोड शंकरपाळे करण्यापेक्षा आपण झटपट होणाऱ्या चीज शंकरपाळे बनवू शकतो....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2023 01:12 PM2023-11-11T13:12:59+5:302023-11-11T13:33:22+5:30

Diwali Special Cheese Shankarpali : नेहमीच्या त्याच त्या गोड शंकरपाळे करण्यापेक्षा आपण झटपट होणाऱ्या चीज शंकरपाळे बनवू शकतो....

Diwali Special Cheese Shankarpali, Cheeselings Recipe, Cheese Shankarpali Recipe | चीज शंकरपाळे यंदा दिवाळीत करून तर पाहा, पदार्थ असा सरस की दिवाळी यादगार - पाहा रेसिपी...

चीज शंकरपाळे यंदा दिवाळीत करून तर पाहा, पदार्थ असा सरस की दिवाळी यादगार - पाहा रेसिपी...

संपूर्ण वर्षभर कधीही करुन खाता येणारा कुरकुरीत व स्वादिष्ट पदार्थ म्हणजे शंकरपाळे. दिवाळी सणानिमित्ताने फराळामध्ये सगळेच आवर्जून शंकरपाळे (Diwali Special Cheese Shankarpali) हा पदार्थ करतात. इवलुसे शंकरपाळे तोंडात टाकताच तिच्या स्वादिष्ट चवीने ती अजून खाण्याचा मोह हा सगळ्यांनाच होतो. दिवाळीच्या फराळाच्या पदार्थामध्ये शंकरपाळे नाही असे होऊच शकत नाही. प्रत्येक महाराष्ट्रीयन कुटुंबात दिवाळीच्या सणाला फराळ म्हणून शंकरपाळे हमखास बनवले जातात. संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये चहासोबत खाण्यासाठी शंकरपाळे हा बेस्ट व टेस्टी पर्याय आहे(Cheese Shankarpali Recipe).

पूर्वी शंकरपाळे म्हटलं की तो गोड, तिखट किंवा खारी अशी बनवली जायची. परंतु बदलत्या काळानुसार आता पारंपरिक फराळात देखील नाविन्यता आली आहे. आजकाल फराळाच्या प्रत्येक पदार्थामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर्स बाजारांत अगदी सहजपणे विकत मिळतात. लाडू, करंज्या, चिवडा, शेव अशा अनेक फराळाच्या पदार्थांमध्ये विविध फ्लेवर्स असलेले आपल्याला पहायला मिळतात. यंदाच्या दिवाळीत नेहमीच तोच तो पारंपरिक फराळ देण्यापेक्षा काहीतरी हटके ट्राय करायचे असल्यास आपण चीज शंकरपाळे (Diwali Special Cheese Shankarpali) करु शकतो. नेहमीच्या त्याच त्या गोड शंकरपाळ्या करण्यापेक्षा आपण झटपट होणाऱ्या चीज शंकरपाळे बनवू शकतो. चीज हा लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांचाच वीक पॉईंट असतो. यासाठीच चीज शंकरपाळे बनवून त्यावर ताव मारण्यासाठी याची रेसिपी पाहूयात(Cheese Shankarpali Recipe).

साहित्य :- 

१. साजूक तूप - २ ते ३ टेबलस्पून 
२. मैदा - १५० ग्रॅम 
३. ओवा - १/४ टेबलस्पून 
४. काळीमिरी पावडर - १/२ टेबलस्पून 
५. मीठ - चवीनुसार 
६. चीज क्यूब - १ ते २ (किसून घेतलेले चीज क्यूब)
७. पाणी - गरजेनुसार 

फराळाची राणी नाजूक चंपाकळी ! पारंपरिक सुंदर गोड पदार्थ दिवाळीत करा नक्की, पाहा रेसिपी...

आता अनारसे फसणार नाहीत तर हसणार ! कुरकुरीत, जाळीदार, हलके - फुलके अनारसे होतील सहज सोपे...

कृती :- 

१. सर्वप्रथम एका छोट्या भांड्यात साजूक तूप घेऊन ते हलकेच गरम करून घ्यावे. 
२. आता एका मोठ्या बाऊलमध्ये मैदा घेऊन त्यात हे गरम केलेले साजूक तूप घालावे. 
३. त्यानंतर या मिश्रणात ओवा, काळीमिरी पावडर, चवीनुसार मीठ व चीझ क्यूब किसून घालावेत. 

चकली भाजणी करण्याचे हे घ्या परफेक्ट प्रमाण ! चकली चुकूनही बिघडणार नाही, फसणार नाही...

करंजीचं सारण सैल किंवा कोरडं होतं ? घ्या सोपी रेसिपी, महिनाभर टिकतील करंज्या, सारणही होणार नाही खवट...

४. हे सगळे जिन्नस चमच्याने ढवळून एकजीव करुन घ्यावेत त्यानंतर या मिश्रणात गरजेनुसार थोडे - थोडे पाणी घालून पीठ मळून घ्यावे. 
५. पीठ मळून घेतल्यानंतर या पिठाचे लहान लहान गोळे करून गोलाकार पोळ्या लाटून घ्याव्यात. 
६. या पिठाच्या पोळ्या लाटून घेतल्यानंतर त्याच्या शंकरपाळी पाडून घ्याव्यात. 
७. आता एका कढईत तेल घेऊन ते व्यवस्थित तापवून घ्यावे. या गरम झालेल्या तेलात शंकरपाळ्या दोन्ही बाजुंनी खरपूस हलकाला ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्याव्यात. 

अशाप्रकारे आपले चीज शंकरपाळे खाण्यासाठी तयार आहेत.

Web Title: Diwali Special Cheese Shankarpali, Cheeselings Recipe, Cheese Shankarpali Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.